जीवन जगण्याची कला शिकवणारे गुरूदेव श्री श्री रविशंकरजी
ज्ञानाशिवाय जिवन अपुरे आहे . आणि हेच ज्ञान वंश, धर्म, संस्कृती, राष्ट्र या पलीकडे जाऊन मानवी समाजाला विशाल दृष्टीकोन देऊन आपण दिव्यतेचे अंश आहोत याची जाणीव करून देणारे
जगतगुरु श्री श्री रविशंकर आज सर्वांना ज्ञात आहे. 43 वर्षाच्या कार्यकाळात जगाच्या काना कोपऱ्यात सुदर्शन क्रिया व भारतीय अध्यात्मिक ज्ञान पोहचविण्यात ते यशस्वी झाले.
साधना, सेवा, सत्संगाच्या माध्यमातून 180 देशातील करोडो लोकांच्या जीवनात अध्यात्मिक ज्ञान रुजवून 'वसुधैव कुटुंबकम' ची प्रचिती त्यांनी आणून दिली.
अज्ञानामुळे आपण छोट्या मनाचे होतो . अतिरेकीपणा आणि कठोरता आपल्याला दिव्यतेपासून दूर नेतात . आज जगभर दहशतवादामुळे मानवी मूल्यांचा बळी जात आहे. संपूर्ण जग विनाशाच्या भीतीने होरपळत आहे . केवळ ' माझाच मार्ग खरा ' ही धारणा जीवणाबद्दलचा सन्मान आणि मानवी मूल्याचा ऱ्हास करते . या परिस्थितीत गुरुजी श्री श्री रविशंकर मैत्री, करुणा, सहकार, आपलेपणाची भावना आणि अध्यात्म या मानवी मूल्यांचे ज्ञान संपूर्ण जगाला देत आहे. करुणा , प्रेम, परहीत आणि स्वीकार या मानवी मूल्यांचे ते बीजारोपण करताहेत.
श्री श्री म्हणतात जगभर आज जो धार्मिक आतंकवाद फोफावला आहे त्यामागे इतर धर्मा बद्दल अज्ञान आहे. त्यांच्या या शिकवणी मुळे मागिल तेरा वर्षाच्या गुरुसानिध्यात सर्व धर्माच्या अभ्यासामुळे एक गोष्ट लक्षात आली ति म्हणजे एकच प्रेममयी सर्वोच्च चेतना वेगवेगळ्या व्यक्तीद्वारे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने प्रकट झाली आहे.
आपली मुख्य ओळख नाव , राष्ट्र, लिंग, संस्कृती , व्यवसाय ही नसून आपण प्रथम दिव्यतेचा अंश आहोत आणि त्यानंतर मानव आहोत.
प्रत्येक धर्माचे ग्रंथ वाचा आणि त्याकडे नव्या दृष्टीने पहा . सर्वधर्म आपल्याला प्रेम , करुणा आणि आनंद या जीवन मूल्यांकडेच घेऊन जातांना दिसतील . असा एक ही धर्म आपल्याला सापडणार नाही जो सत्य , शांती , सेवा आणि दया यांची शिकवण देणार नाही. जगभरातील लोकांना मानवी मूल्यांचे शिक्षण दिल्या शिवाय आपण सुरक्षित राहू शकत नाही.
गुरुजीं सोबतच्या 19 वर्षाच्या सहवासात माझ्या हे लक्षात आले आहे की आजच्या जगासमोरील समस्यांचे उत्तर त्यांच्या सामाजिक सुधारणामध्ये आहे. कदाचित त्यामुळे जगातील सर्व धर्माच्या व्यासपीठावर गुरुजी श्री श्री विविध विषयांवर मार्गदर्शन करतात . त्यांचा दृष्टिकोन दहशतवाद , आतंकवाद, अतिरेकी, धर्म, शिक्षण इत्यादी २१ व्या शतकातील प्रश्नांची समज आणि उकल होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
आज गुरुपौर्णिमे निमित्त आपल्याला आपला दृष्टिकोन विशाल करण्याची गरज आहे. त्यामुळे मनात प्रेम, समन्वय आणि अहिंसेचा प्रादुर्भाव होईल.
जगातून आतंकवाद नष्ट करण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षणाची आधारशीला व्यापक करणे , बहू सांस्कृतिक आणि बहुधार्मिक करणें की ज्यामुळे येणाऱ्या पिढीच्या विकासशील मनावर फक्त आपलाच मार्ग सत्य असा ठसा पडणार नाही. विशाल दृष्टिकोन आणि ज्ञान , श्रद्धा , धार्मिक शिक्षण आणि संस्काराच्या क्षितिजांचा विस्तार या मुळे विश्वातील आतंकवाद संपुष्टात येईल.
धन्यवाद !
- फ़िरोज़ खान ( दि आर्ट ऑफ लिविंग स्वयंसेवक )
