श्री श्री रविशंकर निसर्ग प्रेमी आध्यात्मिक गुरु
फिरोज खान - मो.नं. 7588089623
जगातील वेगवेगळ्या भागात लोक वेग- वेगळ्या कारणाने असुरक्षित आहेत. बहुधा लोकानां गरीबी, पर्यावरणाचा नाश आणि साथीचे रोग त्याच बरोबर राष्ट्रा राष्ट्रातील युद्धे, तर काहीनां गृहयुद्धाची भीती वाटते. केवळ विकसित देशातच नाही तर अन्य देशातही लोकांना आंतरराष्ट्रीय दहशतवादाची भीती वाटते. खरे तर हे धोके परस्पर संबंधित आहेत. या पासनू सुटण्यासाठी वैश्विक कार्य करण्याची आवश्यकता आहे.
म्हणनू हे वैश्विक कार्य श्री श्री रविशंकर विश्व विख्यात आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या माध्यमातनू करत आहे. ते या द्वारे जीवननिष्ठ असे आध्यात्मिक ज्ञान जगभर देत आहे. श्री श्री च्या मते सत्यातच ईश्वराचे दर्शन होत असते म्हणनू जे काही डोळ्यांनी दिसतं ते सत्य चैतन्यमय आहे. मानवाचे जीवन, निसर्ग आणि सुर्ष्टि यांच्यात सळसळणारे चैतन्य एकच आहे. हा एकच चैतन्य प्रवाह त्यांना
एकत्र बाांधतो त्या चैतन्य शक्तीला स्वतःची अशी एक लय आहे. त्या चतैन्यशक्तीला स्वतः मध्ये अनुभवण्या साठी गुरुजी श्री श्री रविशंकर सुदर्शन क्रिया शिकवतात.
मनुष्यप्राणी, पशु, पक्षी, वृक्षवल्ली, पाणी, शेती, आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये श्री श्री मागील 38
वर्षा पासून भरीव कार्य करीत आहे. त्यांच्या निसर्ग व सौंदर्यनिष्ठ अध्यात्म विचाराचा गाभा आहे माणसू . म्हणुनच त्यांनी आपल्या सांस्थेला व्यक्ती विकास असे नाव दिले. माणसाला माणसू म्हणुन त्याचा महीमा पटवून देणे, माणसुकीला बाधा आणणारे सारे दुर्गुण दूर करणे त्याच्या आतलं प्रेम जागवणे तसेच निसर्गावर प्रेम करणे हे त्यांच्या साधनामार्गाचं उदिष्ट आहे.
श्री श्री रविशंकर यांचा अध्यात्म विचार हा एकेश्वरवाद, द्वैतवाद आणि उत्कट भक्ती, बौद्ध तत्वज्ञान,
भारतीय दर्शनातील तत्वशोध, सुफिंची गूढता आणि ईश्वर प्रिती या सर्वाचा उत्कृष्ट्ट संगम घडवून आणतो आणि
त्या मध्ये निसर्गाला सामावून घेतो. त्यामुळेच त्यांना वैश्विक स्वरूप प्राप्त झाले. सुदर्शन क्रियेची तर
पश्चिमात्यांना अक्षरश मोहीनी पडली म्हणनू 156 देशातील लोक या आध्यात्मिक ज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचत आहे. अश्या या थोर प्रेममयी ज्ञानसागराचा आज 63 वा वाढदिवस निसर्गाची जपवणकू करून जगभर साजरा होत
आहे.

