गुरुदेव श्री श्री रवि शंकर । मराठी
बुद्धाची चार सत्ये | श्री श्री रविशंकर (The 4 Truths That Buddha Discovered)
असे म्हणतात की वैशाखी पौर्णिमेला जेव्हा गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्यावेळी ते आठवडाभर मौनातच होते. तिक शब्दही बोलले नाहीत. पुराणात असे म्हटले आहे की, सर्व देवाता घाबरल्या. त्यांना हे माहित होते की सहस्त्रकात एखादाच असा बहरू शकतो. आणि आता तर ते मौनात गेले आहेत. मग देवतांनी त्यांना काही तरी बोलण्याची विनंती केली. ते म्हणाले,
“ज्यांना माहित आहे त्यांना मी न सांगताही माहित आहे आणि ज्यांना माहित नाही त्याना मी सांगूनही काही कळणार नाही. अंध व्यक्तीला प्रकाशाचे वर्णन करून काही उपयोग नाही. ज्यांनी जीवनामृत चाखलेलेच नाही त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही त्यामुळे मी शांत आहे. इतकी जिव्हाळ्याची आणि व्यक्तिगत गोष्ट मी कशी सांगू शकेन? ते शब्दात सांगता येणार नाही. आणि अनेक प्राचीन ग्रंथात असे म्हटलेच आहे की जिथे सत्य सुरु होते तिथे शब्द संपतात.”
तेव्हा देवता म्हणाल्या,
“तुम्ही म्हणता ते योग्य आहे. पण जे लोक सीमारेषेवर आहेत, जे पूर्णपणे ज्ञानी झालेले नाहीत आणि पूर्णपणे अज्ञानीहि नाहीत त्यांचा विचार करा. त्याना काही शब्दांनी फायदा होईल. त्यांच्यासाठी तुम्ही बोला आणि तुमच्या प्रत्येक शब्दाने शांतता निर्माण होईल.”
शांतता निर्माण करणे हाच शब्दांचा हेतू आहे. जर शब्दांनी जास्त गोंगाट निर्माण झाला तर त्यांचा हेतू सफल झाला नाही. बुद्धांच्या शब्दांनी नक्कीच शांतता
निर्माण होईल कारण बुद्ध हे शांतीचे प्रतिक आहे. शांती हाच जीवनाचा स्रोत आहे आणि व्याधींवर उपाय आहे. जेव्हा लोक रागात असतात तेव्हा ते मौनात आधी ते ओरडतात आणि मग शांतता होते. जेव्हा लोक दु:खी असतात तेव्हा ते स्वत:ला एकटे सोडायला सांगतात आणि मौनात जातात. त्याचप्रमाणे जर शरम वाटत असेल तरी ते मौनात जातात. जर एखादी व्यक्ती शहाणी , सुज्ञ असेल तरी तेथे शांतता असते.
जेव्हा येशूला विचारले गेले की, “तू देवाचा पुत्र आहेस कां ?” तेव्हा तो शांत राहिला आणि तोच शहाणपणा होता. जर तुम्ही कुणाला सांगत असाल की तुमच्या पायात वेदना आहे आणि ते तुम्ही त्याचा पुरावा द्यावा असे जर कुणाला वाटत असेल तर ते कसे शक्य आहे?
जर वेदनेसारखी गहिरी गोष्ट तुम्ही सिद्ध करू शकत नसलात तर ब्रह्म ज्ञान किंवा दैवत्व तुम्ही कसे सिद्ध करणार? आनंद आणि समाधान शांती निर्माण करते तर मागणी आवाज निर्माण करते.
तुमच्या मनातल्या आवाजाकडे लक्ष द्या. अश्याबाद्द्ल आवाज आहे ? जास्त पैसा, जास्त प्रसिद्धी, जास्ती लोकप्रियता, समाधान, नाते संबंध ? आवाज हा कशासाठी तरी असतो शांती अशासाठी नसते. शांती हा तळ आहे आवाज हा वरवरचा आहे.
अगदी सुरवातीपासून बुद्धाचे जीवन अतिशय समाधानी होते. सर्व सुखे पायाशी लोळण घेत होती. एक दिवस ते म्हणाले, “मला बाहेर पडून जग काय आहे ते बघायचे आहे.”
एक व्याधीग्रस्त माणूस, एक जरा जर्जर माणूस आणि एक मृत्यूशय्येवरील माणूस पाहून ते विचार करू लागले. ह्या तीन घटना पाहून त्यांना याचे ज्ञान झाले की जग दु:खाने भरलेले आहे. जेव्हा त्यांनी व्याधीग्रस्त माणूस पाहिला तेव्हा ते म्हाणाले, “ मी हे अनुभवले आहे.” एक वृध्द माणूस आणि एक मृत्यू शय्येवरील माणूस यांना क्षणभर पाहून बुद्ध म्हणाले, “जीवनात आनंद नाही, मी मृत झालो आहे,जीवनात काहीही अर्थ नाही. मला परत जाऊ दे.” मग ते राजमहाल, पत्नी आणि मुलगा याना सोडून एकटेच सत्याच्या शोधात निघाले. जितके मौन चांगले तितके त्यातून निर्माण होणारे प्रश्न सामर्थ्यवान. त्यांना काहीच थोपवू शकले नाही. त्याना हे माहित होते कि त्यांना दिवसा उजेडी कुनिहीही जाऊ देणार नाही त्यामळे ते रात्रीच्या वेळी हळूच निघून गेले. त्यांचा शोध अनेक वर्षे सुरु होता. चार सत्याचे ज्ञान होईपर्यंत, लोक जे म्हणतील ते सर्व काही त्यांनी केले. अनेक ठिकाणी भ्रमण केले, उपास तापास केले, अनेक मार्ग चोखाळले.
१. जगात दु:ख आहे.
जीवनात दोन शक्यता आहेत. एक म्हणजे आपल्या भोवतालच्या जगाचे निरीक्षण करा आणि इतरांकडून जाणून घ्या.
दुसरे म्हणजे स्वत: अनुभवा आणि केवळ दु:खच आहे हे जाणा.
तिसरी शक्यता नाही. जर तुम्ही संवेदान्शिलासाल तर तुम्हाला त्या सर्वातून स्वत: जाण्याची गरज नाही. जे दु:ख भोगत आहेत त्याना बघून तुम्ही शहाणे होऊ शकता.
२. दुसरे सत्य हे आहे की, ‘दु:खाला कारण असते.’ तुम्ही कारणाशिवाय आनंदी असू शकता. खुशिला कारण लागत नाही. हसण्यासाठी विनोद लागत नाही पण दि:खासाठी कारण लागते.
३. तिसरे सत्य हे आहे की, ‘दु:ख दूर करणे शक्य आहे.’
४. चौथे सत्य हे आहे की, ‘दु:खापासून दूर जाण्याचा मार्ग आहे.’
चार सत्ये सांगितल्यानंतर त्यांनी खरी समता, खरी दृष्टी, खरे मौन, खरे ध्यान यासाठी आठ मार्ग सांगितले. बुद्धांनी तीन गोष्टी पाळायला सांगितल्या.
शील, समाधी आणि प्रज्ञा
भारताच्या इतिहासातील एका विशिष्ठ काळात बुद्धाचा जन्म झाला. त्यावेळी भारतात खूप सुबत्ता होती तत्वज्ञानाच्या विचाराने परिसीमा गाठली होती. अतिशय बुद्धिमान समाजात लोकाना वाटते की त्यांना सर्व काही माहित आहे. खरे तर त्याना काहीच माहित नसते. भारतात अशीच परिस्थिती होती. त्यावेळी बुद्ध म्हणाले, “या माझ्याकडे तुमच्यासाठी एक सोपे तंत्र आहे. तुमच्या संकल्पना तुमच्या जवळ ठेवा, पण फक्त येऊन इथे बसा.”
मग बुद्धांनी चार पायर्या सांगितल्या. त्या अशा.....
१. कायानु पश्चना ... शरीराचे निरीक्षण करा.
२. वेदानानु पश्चना ...संवेदनांचे निरीक्षण करा.
३. चीत्तानु पश्चना ... मनाच्या प्रवाहाचे निरीक्षण करा.
४. धम्मानु पश्चना ... तुमच्या खर्या स्वभावाचे निरीक्षण करा.
बुद्ध अनेक वर्षे बोलले आणि शिकवले. हजारो लोक स्थिर बसून ध्यान करत आणि मुक्त होत. बुद्ध कोणत्याही तत्वाद्न्यानाच्या चर्चेत पडत नसत. मला वाटते, प्रत्येक मानस शास्त्रज्ञाने बुद्धाचा अभ्यास कारायलाच हवा. बुद्धाने माणसाच्या मनाबद्दल आणि त्याच्या कार्याबद्दल जे जे काही जाणून घ्यायला हवे ते सर्व काही रीतसरपणे सांगितले आहे.
मन आवाज आहे ; मनाचा स्रोत शांती आहे. म्हणूनच बुद्ध म्हणाले, ‘न मन’ मनात सतत घोळत असलेल्या विचारांच्या साखळी बद्दल ते बोलत होते. ज्यावेळी अतिशय सुबत्ता होती अशा वेळी बुद्धाने त्याच्या मुख्य शिष्यांना भिक्षेचे पात्र हातात दिले आणि त्यांना भिक्षा मागायला सांगितले ! त्यांनी राजांणा देखील त्यांची राजवस्त्रे बाजूला ठेऊन भिक्षा पात्र हातात घ्यायला लावले. त्यांना अन्नाची गरज होती म्हणून नाही तर त्यांना, मी ‘कुणी तरी’ आहे पासून ‘कुणी नाही’ हा धडा शिकवायचा होता म्हणून. तुम्ही कुणी नाही, या विश्वात नगण्य आहात. त्यावेळी जेव्हा राजे आणि प्रज्ञावंतांना भिक्षा मागायला लावली तेव्हा ते करुणा सागर बनले.
तुमच्या खऱ्या स्वभावाचे निरीक्षण करा. तुमचा खरा स्वभाव कसा आहे ? शांती, करुणा, प्रेम, मित्रत्व, आणि आनंद आणि हे सर्व शांतीतूनच निर्माण होते. दु:ख, दोषीपणाची भावना, क्लेश या सर्वाला मौन गिळून टाकते. आणि आनंद, करुणा आणि प्रेम जन्माला येते. दु:ख, दोषीपणाची भावना, भीती, उर्मटपणा, अज्ञान हे सर्व घेऊन टाकण्यासाठी आणि शहाणपणा, सामर्थ्य, सौंदर्य, ज्ञान आणि शांती देण्यासाठी बुद्ध आले होते.
कृष्ण म्हणजे अतुलनीय प्रेम | श्री श्री रवि शंकर (Janmashtami Special Article)
कृष्णाकडे असलेली विवेकबुद्धी, नम्रता आणि प्रेम अतुलनीय आहे. कृष्णाला कुठूनही बघा, त्याच्या व्यक्तीमत्वात एक पूर्णता, एक विशेषता आहे. हे असे दर्शवते की तुमच्या सर्वात आत असलेल्या गाभ्यात सर्व गुण आहेत जसे सूर्य किरण, ज्यात सर्व रंग असतात एकदा कुंती, (पांडवांची आई) कृष्णाला म्हणाली,
“मी आणखी जास्त त्रासात असते तर बरे झाले असते. कारण जेव्हा जेव्हा मी त्रासात होते तेव्हा तू माझ्या सोबत होतास. तू बरोबर असण्यातल्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही, ना उपभोगात ना, सुखात. तू असताना कोणतेही दु:ख सहन करता येते. तुझ्या बरोबरच्या एका क्षणासाठी मी जागात्ल्या सर्व सुखांचा त्याग करायला तयार आहे.”
कृष्णाने तिला अस्तित्वाबाद्द्ल्चे आणखी ज्ञान दिले. “ मी तू बनून तुझ्यातच आहे. विश्वात अशी एकाही जागा नाही जिथे मी नाही. लोक माझ्याकडे एक शरिर म्हणून बघतात आणि माझे खरे रूप त्यांना कळत नाही. शरिर आठ तत्वांनी बनले आहे. पृथ्वी, आप तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. मी नववे तत्व आहे आणि मी या सर्वांच्या पलिकडे आहे. मी सर्वव्यापी आहे. मूढांना हे माहित नाही. त्यांना वाटते की मी एक मनुष्य आहे. मी जरी शरीरात असलो त…
श्रीकृष्ण तुमच्यातच आहे | श्री श्री रवि शंकर (Janmashtami Special Article)
असा अवतार की ज्यात ज्ञान, प्रेम, आणि खोडकरपणा हे सर्व सामावलेले आहे तो श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. श्रीकृष्णाच्या जन्मदिनी तुम्ही सर्वांनी भगवद्गीता वाचण्याचा संकल्प करायला हवा. संपूर्ण भगवद्गीता पहिल्याच वाचण्यात समजेल अशी अपेक्षा करू नका. आयुष्यभर गीतेची पारायणे करत राहाल तेव्हाच तुम्हाला ती पूर्णपणे कळेल. आपल्या मनाची आणि बुद्धीची प्रगल्भता जसजशी विकसित होत जाते तसतशी भगवतगीतेची समजही वाढत जाते.
जर कुणाला गीतेचा दहावा अध्याय समजला असेल तर त्यांना अद्वैताचे ज्ञान प्राप्त झालेले असेल. यालाच विभूती योग म्हणतात. जीवन विभूतीमय होऊन जाते. विभूती म्हणजे फक्त कपाळावर लावण्याचे पवित्र भस्म नाही तर विभूतीचा अर्थ चमत्कार असाही होतो.
भगवद्गीता वाचून असे वाटेल की श्रीकृष्णाचा काळ हा मौज, मजा, आनंद, प्रेम आणि भक्ती यांनी बहरलेले होते. पण या सगळ्या गोष्टींबरोबरच खूप सारे वैराग्य देखील आहे. श्रीमद्भगवद्गीता हा वैराग्य, अनुराग, ज्ञान, आणि भक्ती यांचा अतिशय असाधारण आणि असामान्य असा संगम आहे. हे सर्व एकमेकाच्या विरोधी वाटत असले तरीही.
श्री कृष्ण हा आकर्षणाचा केंद्र बिंदू होता. पण श्रीकृष्णाच्या स…

