धमकी महात्म्य
मनुष्य हा धमकावणारा प्राणी आहे. दैनंदिन जीवनात तो कितीतरी धमक्या देतो किंवा ऐकतो.धमकी देण्यासाठी धमक असावी लागते.आपले इच्छित साध्य करण्यासाठी अथवा इतरांचे इच्छित साध्य न होऊ देण्यासाठी धमकीचा वापर होतो.तसे प्रत्येक जन धमकी देतो.विशेषतः आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीवर ती चांगला परिणाम करते.अनेकवेळा धमकीनेच काम भागते.धमकीचे यश बघता तीची सार्थकता
लक्षात येते. एखाद्यास घाबरविणे धमकीचा
उद्देश असतो.
धमकीचा परिणाम हा देणाऱ्याच्या ताकतीवर
अवलंबून असतो.जन्मापासूनच धमकी सुरू
होते.आई वडील आपल्या अपत्यास धमकी
देतात. आई म्हणते,"दूध पी नाही तर तुला चोर मारेन." "हात पाय धुवून ये ,नाहीतर जेवायला नाही देणार." वडील देखील धमकी
देतात. "शाळेत नाही गेला तर पोलीसाकडे देईल." "अंघोळ नाही केली तर मास्तराला सांगेल." धमकीचे बाळकडू घरामध्येच मिळालेले असते. उद्देश जरी चांगला असला
तरी धमकी ही वाईटच असते. धमकीने काम
होते हा संस्कार नकळत होतो.पुढे तो मुलगाही धमकी देवू लागतो."मला सायकल नाही दिली तर मी शाळेत जाणार नाही."मला
सहलला जाण्यासाठी पैसे नाही दिले तर मी घर सोडेन."
शाळेत शिक्षकांकडून तर इतक्या धमक्या दिल्या जातात की धमकी देण्यावर शासनाने
बंदी आणली तर शिक्षकांना आपले काम करणे कठीण होईल."टि.सी. देवू." " वर्गाच्या
बाहेर काढू." "कानामागे देईल "वगैरे.
पोलिस तर सतत धमक्या देत असतात. गुन्हेगारास घाबरविणे हा त्यांचा उद्देश असतो. "आत टाकू" अत्यंत भयंकर धमकी
दिली जाते. नेहमीच्या गुन्हेगारावर त्याचा परिणाम होत नाही. पोलिसांना आपले व्यावसायिक कौशल्य धमकीने प्राप्त होते.
बहुतेक लोक धमकीला घाबरून गुन्हा करत
नाहीत.
गुंडाना तर धमकी शिवाय पर्याय नसतो. गर्दी च्या ठिकाणी धमकी दिली की दहशत तयार
होते. ज्याची भिती वाटते तोच खरा गुंड.धमकी देण्याचे कसब गुंडाकडे असतेच.
फाडून टाकीन, जाळून टाकीन, गाडून टाकीन
असे काहीही करायचे नसतांना तशी धमकी
द्यायची असते तेव्हा दहशत निर्माण करता येते.
दोन देश एकमेकांना धमकावतात. कामगार
मालकाला काम बंद करण्याची धमकी देतात.
बायको नलऱ्याला माहेरी जाण्याची धमकी देते.नवरा घरातून हाकलून देण्याची धमकी देतो.वीजमंडळवाले वीज कट करण्याची धमकी देतात. राजकीय पक्ष पाठिंबा काढण्याची धमकी देतात.
नोकरीवरून कमी करण्याची धमकी,बदली करण्याची धमकी.जाळून घेण्याची धमकी.
आयुष्यभर धमकी देणे आणि ऐकणे जगण्याचा एक भाग बनला आहे. धमकी
शिवाय जगणे अशक्य झाले आहे. आपण धमकी देणे बंद करुया.प्रेमाचे साम्राज्य निर्माण करुया.
ना.रा.खराद
बायकांचे प्रकार
आजपर्यंत आपण 'बायकांचे प्रकार' कोणत्याच ग्रंथात वाचले नसतील.बायकांबद्दल लिहिणे फार धाडसाचे
असते. फक्त पुरुष अथवा नवरा या विषयांवर
लिहिण्याची मुभा आहे. संसाराच्या रथाची हि
दोन चाके.दोन्ही सारखेच अथवा कमीजास्त
जवाबदार असतात किंवा कुणी एकही असू शकते.
मी इतरांप्रमाणेच स्री जातीचा सन्मान करतो.पुरुष जातीचा सन्मान करणे शक्य नाही. वारंवार अपमानित होणाऱ्या व्यक्तीचा
सन्मान तो काय करणार. स्रियांना एस.टी.आपल्या शेजारी जागा देणे,तिच्या मागे फिरणे,तिच्याकडे बघणे,तिची मदत करणे ,तिची स्तुती करणे,तिचे ऐकून घेणे,तिची कामे ऐकणे,हा तिचा सन्मान तर आहे! मुलगी,आई,बहिण, बायको या सर्व नात्यात ती वावरते.पुरुष देखील बाप,भाऊ,मुलगा,नवरा या नात्यात वावरतो.
इथे मानवीय दूर्गूणांविषयी चर्चा करावयाची
आहे. दुर्गूण लिंगभेद करत नाहीत. गुण दुर्गूण सदैव आपली स्वतंत्र जात दाखवतात. बायकांच्या दुर्गुणांची चर्चा बायकाच करतात. पुरुषांना तो अधिकार नाही. किंबहुना तसे करून तो घर की बात बाहेर आणत नाही. परंतु गुण असो वा दोष इतरांना ठाऊक होतात. दोषांचा प्रचार झपाट्याने होतो.
गुणी ती बायको आणि दोषी तो नवरा हा अन्याय आहे. हे मत एकांगी आहे. बायकांमध्ये सुधारणा न होण्याचे ते प्रमुख कारण आहे. बायकांना त्रासलेले लोक रागामध्ये बायकोला काय बोलतात हे ऐकले
की मग कळते.
हा लेख बायकांना दोष देण्यासाठी नाही तर
बायकांचे दोष समोर आणण्यासाठी आहे.
खिल्ली उडविणे हा उद्देश अजिबात नाही तर
एकांगी विचार मोडून काढणे हा आहे. दोष दूर करून जीवन अधिक सुखा समाधानाचे
कसे होऊ शकते याचा हा खटाटोप आहे. ज्ञान, विवेक हा फक्त पुरुषांकरता नसतो.अनेक विदुषी स्रिया आहेत. सदगुणी आहेत. म्हणून संपूर्ण स्रीजात महान ठरत नाही. महानता लिंगभेद पाळत नाही. आतापर्यंत संसारात पुरुषांचे दुर्गूण खुप चर्चिले गेले. कधीतरी दूसरी बाजूही तपासली
पाहिजे. स्रियांचा मान पुरुषांनी नेहमीच राखला आहे. तो आईविना भिकारी असतो,बहिणीची काळजी घेतो,पत्नीचे तर
सगळे ऐकतो.मुलगी तर खुप लाडकी असते.
अनेक कुटुंबे सुखी नसण्यामागे त्या घरातील
स्री अर्थात बायको कारणीभूत असते. यशस्वी
पुरुषांमागे स्री असते तशी ती अयशस्वी पुरुषांमागेही असते.छळ फक्त पुरषांकडूनच होतो,असे भासवले जाते.कायदे स्रियांच्या बाजूने आहेत. स्वभावदोष कुणातही असू शकतो.परंतु या दोषांपायी संसारात दुःख निर्माण होते. हे दुःख कमी करण्यासाठी दोष दूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी दोष कोणते
आहेत हे तपासणे गरजेचे आहे.
आळसी बायको,आळस हा शत्रू मानला जातो.घरामध्ये अनेक प्रकारची कामे स्रियांना
मोठ्या तत्परतेने करावी लागतात. अनेक ठिकाणी तत्पर स्रिया असतात. परंतु जिथे आळसी बायको असते तिथे काय अवस्था असते हे जर बघितले तर कळते.आळस हा शत्रू का आहे. शत्रू घरामध्ये असल्यासारखे वाटते.कचरा,जाळी,अस्तव्यस्त वस्तूं,भांडी जिकडे तिकडे घाणच घाण.किती उदासीन वाटत असेल अशा घरात. झोपेतून उठायचा आळस,झाडझूड करायची नाही. उठताच जांभई द्यायची.दिवस उगवला याचा आनंद
होण्याऐवजी दुःख झाल्यासारखे उठायचे.काम करावे लागणार म्हणून चेहऱ्यावर बारा वाजलेले.सांगा अशा घरामध्ये
कसे प्रसन्न वाटेल.घरात कोणतीच स्वच्छता न
ठेवणे, अगदीच जे करावेच लागते तेवढीच कामे करणे,कामात उत्साह नसणे हे दोष कुटुंबातील प्रत्येकाला उदासीन बनवतात. आळस हा घराचा नाश करतो.आळसी लोकांच्या घरात थांबावे वाटत नाही. कामे वेळेवर न केल्याने, कामे उत्साहाने न केल्याने
त्या कुटुंबात कधीच सुख नसते. आळसी बायको हा फार मोठा ताप असतो.बायकोच्या
आळसाला कंटाळून अनेक ठिकाणी नवरा पडेल ते काम करतो.बाहेर डरकाळी फोडणारे वाघ घरी मात्र शेळी बनतात. हा सोस सोसावा लागतो.अवघड जागेचे हे दुखणे कुणीच कुणाला सांगत नाही. बायको
आळसी असेल तर नवरा आळसी असून चालत नाही. सकाळी'अगं उठ, सात वाजले.'
असे केविलवाणे म्हणणारा नवरा ,तो का सुखी असेल.झोप झाल्यानंतर प्रसन्न मुद्रा असण्याऐवजी ,अजून झोप बाकी आहे अशा
पडल्या चेहऱ्याने अंथरूण सोडत असेल तर
अशी बायको म्हणजे मोठी ब्यादच आहे.
बायकांच्या इतर दोषांवर प्रकाश पुढील लेखात .तूर्तास एवढेच.
कुणासी हा दोष जुळत असेल तर योगायोग
समजावा.
ना.रा.खराद ,अंबड
8805871976
