[16/08, 08:34] N.R. kharad: आपण डोळ्यांनी बघतो ते दृष्य आणि डोळसपणे बघतो तो दृष्टिकोन.जसा दृष्टीदोष असतो तसा दृष्टी कोन दोषही असतो.आपणास आहे ते दिसत नाही.आपण बघतो तसे दिसते.जसे ढगांकडे बघितले
की हवे ते दिसते.ढग तेच असतात , दृष्टीकोन वेगळा
असतो.
प्रत्येक व्यक्ती स्वत:ला निर्दोष व इतरांना दोषी मानतो.आपण चूकतो असे कुणाला वाटतच नाही.
कुणी चूक दाखवली की राग येतो.लगेच अनेक तर्क
आणि स्पष्टीकरण देऊन तो आरोप आपण परतून
लावतो.चूक सांगणारा व्यक्ती शत्रु वाटू लागतो.फक्त
आपली स्तुति करतो तोच फक्त आपला असे आपण
समजू लागतो आणि हिच फार मोठी चूक ठरते.
अनेक बाबतीत आपण इतरांपेक्षा मागे असतो,दूय्यम
असतो.इतरांच्या काही जमेच्या बाजू असतात.गुण असतात.आपणास ते दिसले पाहिजे.एका निरपेक्ष
नजरेला ते दिसते.मी जेव्हा प्रथम होतो तेव्हा आपण
गुणग्राहकतेची दारे बंद केलेली असतात.
आपल्या अवतीभवती अशा असंख्य गुणवानांची फळी
असते परंतु आपण ते गुण वाखाणत नाही.त्याकडे
दूर्लक्ष करतो.घरातली गृहिणी उत्तम स्वयंपाक करत
असेल तर कधीतरी त्याचा उल्लेख करावयास पाहिजे.
'त्यामध्ये काय इतके,करतच असतात.' अशी वक्तव्ये
केली जातात.कुणाचे सुंदर अक्षर बघून मला माझ्या
कुरुप अक्षरांची जाणीव होते तेव्हा ,मी सुंदर अक्षरांची
प्रशंसा न करता ,'अक्षराला काय महत्त्व आहे.'असे
बोलून उलट त्याचीच अवहेलना करतो.
जे जे चांगले ,उत्तम, श्रेष्ठ आहे ते आपल्या नजरेत
अगोदर आले पाहिजे.इतरांकडे काही विशेष आहे
असे आपणास वाटतच नाही.प्रत्येकाकडे तुच्छतेने
बघण्याची सवय झाली आहे.मीच तेवढा श्रेष्ठ .मीच
सर्वगुणसंपन्न बाकी सगळे गुणहीन.आपला दृष्टिकोन
इतका बुरसटलेला असतो.आपल्यापेक्षा कुणी कशातच पुढे असू नये असे आपणास वाटते.एखाद्याचे
गुण नाकारण्यासाठी त्याचे दोष आपण पुढे करतो.
आपणास त्रास आपल्यापेक्षा निम्न लोकांचा होत नाही,तर वरचढ लोकांचा होतो.तुम्ही कुणाचेही
मोठेपण नाकारता तेव्हा तो चिडतो तो याच कारणाने.
कुणी म्हंटले,"अरे तो फार उत्तम गातो." आपण लगेच
म्हणतो,"अरे कित्येक पडलेत." आपणास गरीबांविषयी दया असते मग श्रीमंतांचा द्वेष का?
आजारी माणसाला बघून हळहळतो मग तंदुरुस्त
माणसाला बघून आनंद का वाटत नाही.आपण इतरांच्या उणीवावर बोट ठेवतो मग आपणास
गुण का दिसत नाहीत.कारण आपली दृष्टी सदोष
आहे हा दृष्टिकोनदोष आहे.
इतरांचे धन फुकटचे वाटते.इतरांचे ज्ञान पोकळ वाटते.
इतरांचे धाडस मूर्खपणा भासते.चारित्र्य संशयास्पद
वाटते.सौंदर्यं बनावटी वाटते.प्रसिद्धी खोटी वाटते.
यश चूकीचे वाटते.इतरांबद्दलचा हा दृष्टिकोन एक
मनोरोग आहे.
दृष्टिकोन स्वच्छ असावा.पूर्वग्रहदोषाची धूळ बाजूला
सारावी.नाकरणे सोडून स्विकारण्याची वृत्ती बाळगावी.लहानांचे कौतुक करता यावे.सहमती आणि
समर्थन करायचे जमले पाहिजे.गुणांची कदर करण्यास
कंजुषी करु नये.दिव्यत्वाची प्रचिती घडावयास हवी.
प्रत्येकामधले चांगले अगोदर दिसावे.चांगल्याचे चांगले
मान्य करावे.विशाल दृष्टिकोन ठेवावा.सर्वांना सामावून
घेणारे मन असले की बघा ,किती आल्हाददायक
वाटते.मग कपाळावर आठ्या रहात नाही.आपण अधिक प्रगल्भ बनतो.प्रसन्न बनतो. एवढा प्रयोग कराच.
ना.रा.खराद,अंबड
[16/08, 09:53] N.R. kharad: उपकार
हर इन्सान पर बहुतों के उपकार होते हैं। जिसे कृपा, अनुग्रह,
एहसान, आशिर्वाद भी कह सकते हैं।कभी इस बात पर
आत्मचिंतन करें तो पता चले कि मैं जो हूं कितनों की बदौलत हूं।जन्म से यह सिलसिला शुरू होता है और मौत पर
थमता है। मृत्यु के बाद भी दूसरों के कंधों के सहारे मरघट तक पहुंचते हैं।
उपकार की यह फेहरिस्त बहुत लंबी होती है।मगर हम उसे
याद नहीं करना चाहते।हम मानने को राजी नहीं होते कि
हमारी तथाकथित सफलता में किसीका योगदान है।
किसी के एहसान को भूला देना एहसान फरामोशी है,
कृतघ्नता है। विभिन्न तरीकों से जो लोग काम आए उन्हें
कभी कभार याद कर लेना चाहिए।केवल शब्दों में कर्मों
न हो मगर कृतज्ञता प्रकट करनी चाहिए।
कोई व्यक्ति इतना सामर्थ्यवान नहीं होता कि अपने बूते पर
वह सफल बने । मददगारों की एक लंबी सूचि होती है। लेकिन वह माने तब वह सामने आए।
उचित समय पर मिली राय,सलाह ने कईयों की जिंदगी
संवारी है।जिस धरती पर हम कदम रखते हैं ,उस इंचभर
जमीन का भी हमपर उपकार होता है।मौत के मुंह से हमें
किसीने लाया होता है।किसी की प्रेरणा से कुछ किया होता
है,किसी की कृपा से कुछ पाया होता है।इन सबके प्रति कृतज्ञता भाव रखना ,हमारा कर्तव्य है।
ना.रा.खराद अंबड
[17/08, 08:27] N.R. kharad: अनुभव
नोकरीच्या अनेक जाहिरातींमध्ये ,'अनुभव पाहिजे.'अशी अट असते.दुकानाच्या पाटीवर ,"अनुभव हिच खात्री."
अशी आर्जव असते.आयुष्यभर सातत्याने मिळणारी एकच गोष्ट म्हणजेच अनुभव.वयोवृद्ध माणसे अनुभवामुळे मार्गदर्शक ठरतात."उगीच पांढरे नाही झाले.". हा ताठाही उगीच नसतो.
अनुभव केवळ एखाद्या कामाचा नसतो.मनुष्य जितका
उचापतीखोर तितका अनुभवी असतो.एकाच गोष्टीचा
खुप अनुभव असणे वेगळे आणि अनेक गोष्टींचा थोडा
अनुभव असणे वेगळे.
प्रत्येक गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नसतो.इतरांच्या
अनुभवांचा अनुभव घ्यावयाचा असतो.ज्ञानचक्षुने तो
घ्यावयाचा असतो.पोहता येत नसेल तर मनुष्य पाण्यात
बुडतो,हे प्रत्यक्ष बघायचे नसते.हत्ती वजनदार असतो,हे
उचलून बघायची गरज नसते.मनुष्य मरतो हे अनुभवाविना आपण मान्य केलेले असते.
ज्या क्षेत्रात आपण काम करतो तिथला आपणास अनुभव असतो.मनुष्य अनुभवाची देवाणघेवाण करतो.मनुष्य शिकतो म्हणजेच अनुभव घेतो.अनुभवाचा
एक वारसा असतो.काही अनुभव हे मोजक्या लोकांना
येतात.बरेच अनुभव सर्व सामान्य असतात.काही असामान्य असतात.आपले अनुभव इतरांना सांगावेसे
वाटतात.मागील अनुभवाची शिदोरी घेऊनच पुढील
आयुष्य कंठायचे असते.आपले जे ज्ञान आहे,ते अनुभव
आहे,त्याच्या आधारे आपण मार्गक्रमण करत असतो.
अनुभवाविना बोलणे बडबड समजली जाते.
जितके कार्यक्षेत्र मोठे, तितके अनुभव जास्त.संकटात
अनुभव जास्त येतात.अडचणी आणि दु:ख माणसाला
बरेच काही शिकवून जाते.जे शिकवून जाते त्यास अनुभव
म्हणतात.
संपर्कात येणाऱ्या माणसांचाही आपणास अनुभव असतो.माणसाला ओळखून असणे म्हणजे त्याचा अनुभव असणे.अनुभवाने कार्यकुशलता वाढते.नुसते
वय वाढणे म्हणजे अनुभव नव्हे.प्रत्यक्ष इतरांच्या ठिकाणी स्वत:ला बघून अनुभव घेता आला पाहिजे.
संवेदनशील मन जास्त अनुभव घेते.इतरांच्या भाव भावना ओळखता येणे खरा अनुभव आहे.कवी,लेखकांकडे ही प्रतिभा असते.
अनुभव सर्वा़चे सारखेच असतात,असे नव्हे.एकाच व्यक्तिबद्दल अनेकांची मते भिन्न असण्याचे तेच कारण
आहे.अनुभव घेण्याचाही एक दृष्टिकोन आपण बाळगून
असतो.
कळलेले वळल्याशिवाय अनुभव येत नाही.प्रत्येकवेळी
प्रत्येक गोष्टीचा एकसारखा अनुभव येत नसतो,तो प्रत्येक
वेळी नवाही असू शकतो.अनुभव कधी जूना ताकतीचा
असतो कधी नवा.अनुभव एकमेकांना काटत असतात.
मी पाहिले,मी ऐकले असे बोलले जाते.पहिला अनुभव
रोमांचित करणारा असतो.प्रथमच समुह बघितला की
काय अवस्था होते.समुद्र किनारी रहाणारास तसे
होत नाही.सायकल शिकतांना येणारा अनुभव आपण
विसरत नाही.आठवणीच्या रुपाने अनुभव जिवंत रहातात.गत आयुष्य हा आपला अनुभवच असतो.
ज्या गोष्टींचा अनुभव नसतो त्याची जिज्ञासा कायम असते
काही अनुभव चूकीचेही असतात.अज्ञानी आणि मूर्ख व्यक्ति अनुभवी नसते.ते अनुभव कधीच उपयोगी पडत
नाही.काळाच्या कसोटीवर ते टिकत नाही.
मला याचा अनुभव नाही,असा प्रामाणिकपणा काहींकडे
असतो तर अनुभव नसून तो असल्याचा कांगावा केला
जातो.अर्धवट अनुभवी ही असतात.
अनुभव सहज मिळणारे तसे फार मोबदला घेऊन जाणारे
असतात.अनुभवाचे ज्ञान टिकाऊ असते.अनुभवी लोकांकडून सल्ले घेतले जातात.अनुभव नसेल तर सल्ला
देण्याचा मोह टाळता आला पाहिजे.
अनुभवाचे आदान प्रदान करायचे असते आणि जीवन
अधिक समृद्ध करायचे असते.इतरांकडून शिकण्यासारखे
खुप असते.अंहकारी ते मान्य करत नाही म्हणून तो कायम अज्ञानी रहातो.
अनुभवी व्यक्तिचे बोल ताकतीचे असतात.अनुभवाचा
सुगंध त्या ठिकाणी असतो.प्रत्यक्ष अनुभव असल्याविना
आपण मान्य करण्यास तयार नसतो, किंबहुना ज्या गोष्टींचा अनुभव नाही ,त्या अमान्य करण्याकडे आपला
कल असतो.अनुभव घेण्यासाठी देखील बुद्धी,मन तसे
असावे लागते."दिल्ली में रहकर भाड झोकनेवाले" कमी
नसतात.संपर्क आणि सहवासात देखील अनुभव येतात.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ,असे उगीच म्हणत नाही.अनेक गोष्टीतले दु:ख आणि आनंद याचा आपणाकडे अनुभव नसतो.इतरांना आपण चूक ठरवितो.
अनुभवांची एक उंची असते.काहींना ती गाठता येते.ते
वंदनीय ठरतात.बुद्धाला बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त
झाले याचा अर्थ प्रत्येकालाच ते होईल असे नाही.
ज्याची त्याची योग्यता आणि अनुभव असतात.माणसाचे
हे वेगळेपण त्यास महत्त्व प्राप्त करुन देते.
जीवन म्हणजे अनुभवाचे संचित असते.अनुभवाचे
गाठोडे घेऊन परलोकात जायचे असते,तिथले अनुभव
घेण्यासाठी.
ना.रा.खराद
मत्स्योदरी विद्यालय,अ़ंबड
[17/08, 13:43] +91 96890 87218: *खरोखरच वाचण्यायोग्य आहे*....
*॥एका वडीलांचा तारूण्यात प्रवेश करणाऱ्या मुलास महत्वपुर्ण संदेश॥*
*माझ्या लाडक्या मुला*
मी जे पत्र तुला आज लिहितोय, .....
*ते तु निट वाच आणि ठरव.!!!*हवे तर,हे पत्र तु जतन करून ठेव*
*०१)* बेटा,जगणं,नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाहीत.सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी ही सांगू शकत नाही.त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोलायलाच हव्यात.
*०२)* मी जनम्दाता आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते कदाचित तुला इतर कुणीही कधीच सांगणार नाही.
*०३)* मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट,जिवाचे चटके आणि मनाचा त्रास खुपच कमी होईल.
*०४)* बेटा,प्रथम हे सतत लक्षात ठेव की,कधीही कोणत्याच माणसां विषयी मनात आकस ठेवू नकोस.कुणाचा ही द्वेष करू नको स.तुझ्याशी सर्वांनी कायम चांगलं च वागलं पाहिजे अशी सक्ती आपण कुणावरही करू शकत नाही.त्यामुळे ते असंच का वागतात ? असं म्हणून कधीही तणतणू नकोस.तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची *जबाबदारी फक्त तुझ्या आईबाबांचीच आहे.* तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात,त्यांच्याशी तर चांगलं वागच.परंतु जे तुझ्याशी तुसडेपणाने वागतात त्यांच्याशी देखील तु वाईट वागु नकोस. *पण हे देखील कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट,कुठल्या ना कुठल्या हेतु पोटी करीत असतो.* त्यामुळे जी माणसं गोड बोलतात,तुझ्याशी कायम चांगली वागतात त्यांना तु खरंच आवडत असशीलच असे ही नव्हे,हेतु पुर्तीसाठी कदाचीत ते असे वागु शकतात.
*तेव्हा माणसं जरा तपासून बघत जा.पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची कदापी ही घाई करू नकोस*. विश्वास घाताचा फटका बसु शकतो.
*०५)* जगणं कशानंच कुणा मुळेच थांबत नाही.त्यामुळे माणसं तुम्हाला सोडून जातील.नाकारती ल,झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तुम्ही जीव तोडून प्रेम केलय ते तुमच्या आयुष्यातून निघून ही जातील.तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की,कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नसते.आणि कधीच थांबतही नाही.
*०६)* आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज तु वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाऊ शकते.त्यापेक्षा आजच मनापासून,भरभरून जग, आनंदी रहा.आनंदी जगणं उद्यावर अजीबात ढकलु नकोस.
*०७)* प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे.ती काळा प्रमाणे आणि मूडप्रमाणे बदलते. ज्यांच्यावर तु जिवापाड प्रेम करतो ते समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर.काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतात.माझी आई म्हणजे तुमची आजी गेल्यानंतर मी कित्येक दिवस अस्वस्थ होतो. परंतु कालांतराने मी देखील सेट झालोच ना ? या करीता काळ हे सर्वोत्तम औषध आहे.हे मनावर बिंबव.सदैव लक्षात ठेव.
प्रेमात पडला म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं कधीही समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खाला जास्त कवटाळून ही बसू नकोस.
*०८)* अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं,तरी ते यशस्वी झालेत.अशा कहाण्या तु वाचल्या असशील,पण याचा अर्थ असा नाही की,शिक्षण सोडलं की तु यशस्वीच होशिल. *नॉलेज,ज्ञान हे एक शस्त्र आहे हे सदैव लक्षात ठेव,ते मिळव ण्याचा प्रयास सातत्याने करा.* शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय,पण कुठल्या तरी शून्या पासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!
*०९)* माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तुम्ही मला सांभाळावं,मी ही तुला जन्मभर पोसणार नाहीच.तेव्हा तु स्वत: च्या पायावर उभा राहू शकशील तो र्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी नैतिक जबाबदारी.त्यानंतर तुम्हाला बसमधून फिरायचं की रोल्स राईस किंवा लिमोझीन मधून, *गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तुच घ्यायचाय.*
*१०)* आणखी शेवटचं एक, मी ही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं,पण ते कधीच लागलं नाही.एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. *श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते.जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.*
- तुझे बाबा 🌿
(नाशिकचे निष्णात मानस शास्रतज्ञ डॉ.शिरीष राजे यांनी आपल्या मुलांना लिहीलेले हे पत्र सर्वच पाल्यांसाठी उपयुक्त आहे म्हणुन शेयर केले... )
👍🏼👍🏼
[18/08, 17:24] N.R. kharad: स्तुति
मी शाळेत पाचवीच्या वर्गात असतांना ,आमचे इंग्रजी विषयाचे शिक्षक ,अक्षर चांगले काढले की
Good असा शेरा द्यायचे.त्यामुळे चांगले अक्षर काढून 'गुड' मिळवायची असाच सर्वांचा प्रयत्न असायचा.इतर मुलांमध्येही जाणून घ्यायची उत्सुकता असायची.चेहऱ्यावरील हास्य बघून
चाणाक्ष मुले ओळखायची.काही मुले वही दाखल
म्हणायचे.आतापर्यंत मिळालेल्या 'good' चा हिशोब व्हायचा.या स्पर्धेत पाच सहा मुले असायची,इतर मुले कधीच good न मिळालेली
असायची.ती स्पर्धेत नसायची.कविता सुरात गायली,उजळणी तोंडपाठ असली की शिक्षक छान,शाबास असे कौतुक करायचे. ती एक प्रेरणा
असायची.चांगले काही केले की मोठी माणसेही
शाबासकी द्यायची.बालमनावर त्याचा खोलवर
परिणाम व्हायचा.पुढे याचे अनेक कंगोरे उलगडत
गेले.आज स्तुति,प्रशंसा, कौतुक, अभिनंदन,गौरव,प्रशस्तिपत्र, अभिष्टचिंतन,
या शब्दांनी चोहोबाजूंनी उच्छाद मांडला आहे.
जिकडे तिकडे समर्थक, चाहते,पारखी ,गुणपुजक,
कलाप्रेमी, साहित्य रसिक अशा गुणी लोकांना
हेरुन वरीलपैकी एक प्रदान करुन मोकळे होत
आहेत.देशातील पुरस्कारांची संख्या लोकसंख्येनुसार वाढत आहे.घेणाऱ्यांपेक्षा देणारे
उतावीळ आहेत.त्यांनी स्थापन केलेल्या संघटना, संस्था,मंच वगैरेंचा लौकिक त्याशिवाय होणार कसा?
आता जवळजवळ सर्वच कलाकार पुरस्कार प्राप्त
आहेत.किमान गल्लीतल्या गणेश मंडळ आयोजित
काव्यवाचन मध्ये त्यास 'कवीभूषण' हा पुरस्कार मिळालेला असतो.भले रक्कम पन्नास रुपये असेल
परंतु पुरस्कार पैशात मोजत नसतात असेच नेहमी
देणाराकडून ऐकलेले आहे.
स्तुति सर्वांना प्रिय असते म्हणतात.म्हणूनच ती कुणाचीही केली जाते.आपली होणारी स्तुति खरी
आहे की खोटी? स्तुति करणाराला अक्कल आहे
की नाही?स्वत:चा मोठेपणा वाढविण्यासाठी तर
ती स्तुति नाही ना? असली शंका कुणी घेत नाही.
आता मुलगा दुसरीत पहिला आला तरी अभिनंदनाचा वर्षाव होतो.लग्न लागताच वधू वरांना
शुभेच्छा देण्यासाठी रांग लागते.लग्न करुन त्यांनी
कोणता तीर मारलेला असतो!
कुणी दुचाकी खरेदी केली की , अभिनंदन आणि
शुभेच्छा दिल्या जातात की ,'आपण उशीर केला
असे वाटायला लागते.' मुल झाले लगेच अभिनंदन.
काही हौसी वाढदिवसाच्या शुभेच्छा चौकात पोस्टर
लावून देतात.इतरांना खुश करण्यासाठी ही खुशामतकला फार फोफावली आहे.
आपल्या प्रत्येक गोष्टीला चांगलेच म्हटलं पाहिजे,असा एक अट्टाहास दिसत आहे.दोनशे
रुपयांची सापडलेली पिशवी परत केली म्हणून
सर्व थरातून त्याचे कौतुक होते.प्रामाणिकपणा
दूर्मिळ झाला असेच त्यावरुन दिसते.आता फक्त
निमित्त लागते.कुणी कुणाचीही आणि कशाचीही
ऊठसुट स्तुति करते आहे.एकाही महापुरुषांच्या
वाट्याला जे आले नाही ते आता सहज सुलभ झाले
आहे.मोठ्या तपश्र्चर्येने जे ऐकायला मिळत नव्हते
ते आता एखादे झाड लावले तरी कुणीतरी,'वृक्षमित्र' म्हणून गौरव करतेच.एखादे
गाणे गायले की ',भावी लता ' हे बिरुद लावणारे
कुणीतरी गुणपारखी असतेच.राजकारणात पडलेले
कित्येक कायम 'भावी' असतात.
स्तुति सहज ,खरी असेल तर तीचे मोल आहे.कित्येक लोक एखाद्या लेखकाचे पुस्तक न
वाचताच स्तुति करतात,"आपण अप्रतिम लिहिता."
पुरस्कार मिळाला म्हणून पुन्हा आठवडाभर त्याचे
सत्काराचे कार्यक्रम चालतात.एकदा एखादा पुरस्कार मिळाला किंवा मिळवला की आजन्म
ते शेपूट लागते.मग अमुकभूषण तमूक भूषण पासून तर हे रत्न ते रत्न असले हजारों शेपटं
कायम चिकटलेले असतात.एकदा मोठा पुरस्कार
मिळाला की त्यापेक्षा लहान पुरस्कार त्यास देता
येत नाही.ज्यांना लहान मिळतो त्यांना मोठा मिळत
नाही.सर्व प्रकारच्या शुभेच्छा देखील स्तुतिच असते.एखाद्यास प्रसन्न करण्यासाठी जे केले जाते
ती स्तुतिच. मुलांचे जावळ काढले तरी अभिनंदनाचा वर्षाव होतो.कुणाचा बाप मेला तरी
अत्यंत आनंदाने,"भावपूर्ण श्रद्धांजली" असा मेसेज
पाठवतात.
स्तुति करण्यामागे कित्येक वेळा स्वार्थ दडलेला असतो.कुणी कुणाची अकारण स्तुति करत नाही.
क्वचितच ती निरपेक्ष असते.जिथे स्वार्थ तिथे ती
करणे अपरिहार्य असते.ऐकणारे शंका घेत नाहीत,
यामुळे ती यशस्वी होते.
स्तुतिसुमनं तर फार उधळली जातात.नको त्या माणसाबद्दल , त्याच्यामध्ये मूळीच नसलेल्या गुणांबद्दल ऐकून घ्यावे लागते.एखाद्यास मोठे करण्यासाठी मोठी माणसेही स्तुति करतात.
आपलीच माणसे मोठी करण्यासाठी स्तुति केली
जाते.
प्रेमी आपल्या प्रेमीकेची,नवरा बायकोची स्तुति करतो. स्तुति खरी असो की खोटी पण तीची
महिमा अपरंपार आहे.जे डोळे झाकून स्विकारली
जाते.करणारे शहाणे असतील परंतु ती ऐकणारे
तसे असतीलच असे नाही.
ना.रा.खराद,अंबड
[19/08, 12:54] N.R. kharad: पिताजी कहते हैं हमारे- " ईश्वर ने हमारा निर्माण किया हैं और जिसने हमारा निर्माण किया हैं हम उसका निर्माण वापस कभी नहीं कर सकते।"
उनकी ये बात मुझे बहुत हद तक सत्य लगी-
"ईश्वर हमारा निर्माता हैं तो हम कभी उसका निर्माण नहीं कर सकते।"
और अब लग रहा कि हम इंसान सालों से यहां नींद में हैं,इतने अंधे हो गए हैं कि हमने यहां सालों लड़ाई-झगड़ों में गँवा दिए उसी ईश्वर का निर्माण करने में जिसने हमारा निर्माण किया हैं।
हमे यहां बागों में खिलखिलाते सुन्दर फूलों में ईश्वर नहीं दिखते बल्कि हम उन्हीं ईश्वर निर्मित फूलों को तोड़कर हमने बनाएं ईश्वर के द्वार पर चढ़ा देते हैं।
हमारा ईश्वर ये कभी नहीं चाहेगा की हम उसी के निर्मित फूलों को तोड़े।
हमे यहां इस अवनी पर पहले से ईश्वर ने सजाएं विविध रंग,हर ऋतु में संग रहते नहीं दिखते बल्कि हमें उन्हीं रंगों को बांटकर धर्म के झंडे लहराने हैं।
हमे यहां हर पत्थर में,इस अवनी के हर कण कण में ईश्वर नहीं दिखते बल्कि हमें एक ही पत्थर की बनी मूर्ति चाहिएं उसे पूजने के लिए।
इस धरा पर ईश्वर का स्मरण करने के लिए प्रार्थनाएं की जाती हैं,इसका अर्थ यही है कि हमें ईश्वर सदा याद नहीं रहते क्योंंकि याद तभी किया जाता है जब हम कुछ भूलें हो।
कितनी मूर्खतापूर्ण बात है ये की हम ईश्वर का निर्माण हर गली हर मोहल्ले में कर रहे हैं, हम चाहते है कि हमारा ईश्वर ज्यादा से ज्यादा हमारे पास रहे/पास दिखे।
पर हमने कभी ये नहीं देखा कि हमारी सांसें कैसे चलती हैं।
हमारी सांसों में ईश्वर रहता हैं।
आपको ईश्वर का निर्माण करने की कोई ज़रूरत नहीं है क्योंकि हमारा निर्माण उसने किया है।
"उनसे हम हैं, हमसे वो नहीं!"
~सुजाता नारायण खराद
[20/08, 10:09] N.R. kharad: राग
माणसांमध्ये व इतर सर्व जीवांमध्ये आढळणारी भावना राग होय.अनेक नावाने तो ओळखला जातो.क्रोध,आवेश,संताप,
चीड,त्रागा ही त्याचीच रुपे.प्रसंगी प्रत्येक व्यक्ती रागावते.कुणी राग गिळून घेते.कुणी राग समजून घेते.राग व्यक्त करते.राग संयमाने व्यक्त करणारेही असतात.राग चेहऱ्यावर दिसतो.रागाने डोळे लाल होतात.आवाज चढतो.काहींचा स्वभाव 'रागीट'असतो.ज्ञानी लोक रागाला विकार
मानतात.
रागामध्ये तोल सुटतो.क्षणिक रागाने फार मोठे अनर्थ घडतात.रागात बोललेले वर्मी लागते.राग सर्वत्र बघायला मिळतो.भाजीत मीठ जास्त झाले की बायकोवर राग .पोरांनी
गोंगाट केला की राग.पेपर उशिरा आला की राग.दूधात पाणी जास्त असले की राग.चहा थंड झाला की राग.बायकोही रागावते, मुलेही
रागावतात.बसमध्ये चढतांना कुणी पायावर पाय दिला राग.सीटवरचा रुमाल फेकला राग.
कधी तो नुसताच मुद्रेने व्यक्त होतो.कधी शिव्यांनी आणि अपवादाने लाथाबुक्क्यांनी.
रागावणे हा स्वभावधर्म आहे.रागाची कारणेही तितकीच महत्त्वाची असतात.इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध असलेली
चीड आपण चुकीची मानत नाहीत.सीमेवर सैनिक त्वेषाने शत्रुंवर तुटून पडतात.तिथे तो
पराक्रम मानला जातो.अन्याय,अत्याचाराची
चीड कधीच चूकीची मानली जात नाही.
राग हा सर्व वयात असतो.लहान मुले देखील
रागावतात.चिडून बाहुली फेकतात .आदळआपट करतात.म्हातारी माणसेही खुप रागावतात.अनेक ठिकाणी राग
व्यक्त करता येत नाही.अधिकारी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांवर रागावतात परंतु कर्मचारी रागावू शकत नाही.
राग विधायक असतो तसा विघातकही.रागाचा योग्य वापर करता यावयास हवा.राग हा स्वभाव बनू नये.गरजेपुरता त्याचा वापर व्हावा.तो मौलिक आहे , जपून वापरावा.रागात घेतलेला निर्णय चूकू शकतो.नेहमी रागराग करणे योग्य नसते तसेच कधीच न रागावणे देखील योग्य नसते.सहनशीलता आणि क्षमा
हे गुण असतील तर राग कमी येतो.सौजन्यशिलतेमुळे देखील राग नियंत्रित
रहातो.
राग नेहमीच चूकीचा असतो असे नाही पण तो चूकीचा असु नये.माफकता असावी.रागामध्ये द्वेष असता कामा नये.
ना.रा.खराद,अंबड
[20/08, 21:15] N.R. kharad: भारत की गरीबी, गरीबों का भारत
भारत देश की सबसे बड़ी समस्या गरीबी है।इसी गरीबी को राजनीतिक स्वार्थ के लिए सीढ़ी बनाया जाता है। उन्हीं की भलाई का वास्ता देकर चुनाव लड़ें जाते हैं और जीते जाते हैं। गरीबों का शोषण आसानी से किया जा सकता है। उसे आर्थिक गुलाम बनाया जाता है , फिर वह सर उठाकर जी नहीं पाता।अगर समाज में गरीबी,अज्ञान, अंधविश्वास न हो तो उनका शोषण संभव नहीं इसलिए एक षड़यंत्र के तहत गरीबी दूर
नहीं की जाती। आर्थिक सबल लोग आपस में
हाथ मिला लेते हैं।फिर जैसा चाहे वैसा गरीबों
का शोषण करते हैं। गरीबी और सादगी का सम्मान दिखाते हैं ताकि गरीब अपनी गरीबी
के चलते विद्रोही न बने। चौतरफा गरीबों का शोषण किया जाता है मगर उसकी आंखों में
धूल झोंककर। गरीबी हटाने की बात हर राजनीतिक दल करता है, यहीं एक तबका है,जिसे चुनावी नारों में लुभाया जा सकता है।
लोकतंत्र के आने से गरीबों के वोट अहम हो गये। नेताओं के पीछे जो हुजूम होता है,वह गरीबों का होता हैं।
किसी गरीब को प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपति बना देते हैं ताकि यह संदेश मिले कि
गरीबी खराब नहीं होती और उसीकी आड़ में
सारा खेल चलता है। किसी शौचालय के उद्घाटन में नेता पहुंचे तो आगे पीछे शेकडों गाडियां रहती है।वो भी आलिशान,एक या दो
संवारी लेकर। कोई सवाल नही करता।गरीब
आंखें फाड़कर देखता हैं मगर कुछ कर नहीं
पाता क्योंकि वह कमजोर है।गरीब रिक्शा में
भी एक सवारी ज्यादा बैठे तो अपराध,कानूनी
कारवाही। पुलिस का डंडा भी उसीपर पड़ता
है।सारा खेल गरीबों के शोषण का हैं। सड़क
गरीब बनाते हैं,उसपर गाडियां अमीरों की दौड़ती हैं। मैं यह नहीं कहता की तुम अपनी
संपत्ति गरीबों में बांट दो। मैं यह कहता हूं कि
संपत्ति आपके पास आयी कहां से है?
स्कूली और महाविद्यालयीन शिक्षा के पाठ्यक्रम में साधु-संतों, महापुरुषों, विचारकों
के आदर्श छात्रों के सामने रखे जाते हैं । हकीकत में कुछ और ही वे देखते हैं।तब सारे
पाखंड या ढोंग की पोल खुल जाती है।
समाज के विचारकों , विद्वानों को इनाम,सम्मान या कोई पद या पुरस्कार देकर
उसकी ज़बान बंद कर दी जाती है। फिर वह
उन्हीं का गुणगान गाकर अपना उल्लू सीधा
कर लेता हैं।
गरीबी की दाहकता बहुत तकलिफदेह होती है।अमीर जमीन पर नजर नहीं आते।वे हवाई
जहाजों में, आलिशान गाड़ियों में दुनिया की
सैर करते हैं।गरीब बेचारा खेत खलिहानों में,
कारखानों में दिन-रात श्रम कर रहा है।कार बनाता है मगर खरीदता नहीं।
गरीबों को मदद करके ही अमीर उनका विश्वास हासिल करते हैं।उनकी सेवा का ढोंग
रचाकर समाजसेवी कहलाते।हर तरफ से हर
कोई गरीबों का बचाखुचा खुन चूस रहा है।इतनी कुशलता से कि उसे पता तक नहीं हो
रहा है। गरीबों को खाना खिलाकर लोकप्रियता हासिल की जाती है। गरीबों को
दान देकर तुम दाता कहलाते हो। कोई गरीबों
का मसिहा है तो कोई उनका नेता।हर कोई
अपने तरीके से उसका इस्तेमाल कर रहा है।
गरीबी का कारण ढूंढना हो तो अमीरी का कारण ढूंढिए।
देश आजाद हुआ है मगर आर्थिक गुलामी से नहीं। गरीबों के खाते में पांच सौ रुपए डाले
जाते हैं तो कितना ढिंढोरा । अमीरों के तिजोडीयां विदेशों में ,कोई आहट तक नहीं।
गरीब छटपटा रहा है।पहले राजाओं ने उसका
शोषण किया,अब नेता कर रहें हैं।उसका कोई
मददगार नहीं।
गरीब को यह समझना होगा।बगावत पर उतरना होगा।तभी यह स्थितियां बदलेंगी। वर्ना कोई उम्मीद नहीं बची हैं।
नारायण खराद,
अंबड
[21/08, 08:21] N.R. kharad: संकल्प_ बायकोशी न भांडण्याचा
मी तसे अनेक संकल्प कुठलाही नशापान न करता करतो.नशा न करण्याचाही संकल्प मी
तसाच केला होता.परंतु माझा कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही.मोठे संकल्प जाऊ द्या अगदी छोटे संकल्प देखील तडीस
जात नाहीत.माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या
आड येतो.शपथ वगैरे मी कधीच घेत किंवा खात नाही.पैज वगरै लावतो परंतु हारलो तरी
कुणालाही छदाम दिल्याचे मला आठवत नाही.या सर्व संकल्पाच्या यादीमध्ये जो संकल्प कधीच अल्पसा देखील यशस्वी झालेला नाही आणि कधी होईल अशी आशा
देखील मी आता बाळगत नाही.दरवेळी अधिक दृढ संकल्प मी करतो.कधी नववर्षाचा.कधी वाढदिवसाच्या निमित्ताने तर
कधी लग्नाच्या वाढदिवसाला.लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यामध्ये वाढच झालेली
दिसून येते.आता अधिक न ताणता सांगूनच टाकतो."बायकोशी न भांडण्याचा संकल्प."
मी तसा भांडणाच्या विरोधात आहे.विरोध करण्यासाठी देखील भांडावे लागते तो भाग
वेगळा! आयुष्यात खुप भांडावे लागते.काही
भांडणात आपला विजय होतो,काहींत पराभव होतो.पुन्हा नव्या जोमाने भांडणात
उतरायचे असते.असो.
बायको सोबतच्या भांडणात माझा कधीच विजय होत नाही.नेहमी पानीपत होते.माघार
घेणे,क्षमा मागणे ,करार करणे ,गुडघे टेकणे हे
जागतिक युद्धाचे सगळे प्रकार या घरगुती भांडणात बघायला मिळतात.बायकोशी भांडणे सोपे नसते.माहेरच्या लोकांचा सरकारला बिनशर्त पाठिंबा असतो.नवरा करतो तोच फक्त छळ मानला जातो.या देशातील कायदे देखील स्रियांवरच फिदा आहेत.
बायकोशी भांडायचे नाही,माझा हा संकल्प अयशस्वी होण्यामागची कारणेही शोधली पाहिजेत.क्रिकेटमध्ये हारलेली टीम जशी
आत्मचिंतन करते अथवा युद्धांत पराभवाची
कारणे शोधली जातात .
कधी कधी न भांडण्याचा संकल्प यशस्वी होण्याच्या अगदी जवळ येतो आणि पुन्हा ठिणगी पडते.मी नाही भांडलो तरी ,"सालं मी
केव्हाची वटवट करते तरी तोंड उचकटत नाही." यामधले 'सालं' आणि 'उचकटणे' हे शब्द उचकटण्यासाठी असतात हे मी अनुभवाने ओळखत होतो.भांडणाचे कुठलेही
कारण नाही असे समजून मी आनंदाने घरात
शिरतो , मांजराच्या तावडीत उंदीर सापडावा
तसा बायको ,"काय झालं एवढं दात काढायला,भेटली काय एखादी सटवी." एखाद्या दिवशी मी गंभीरपणे घरात शिरतो.
बायको,"घरात मी दिसले की चेहरा पडतो,बाहेर सारखे खिंदळत असतील." बायकोचे संशय कधीच संपत नाहीत.तरीही
बायको संशयी आहे असे म्हणता येत नाही.
मात्र नवरा इतके जरी म्हणाला ,"तुला फार
वेळ लागला ." तर नवरा संशयखोर ठरतो.संशय घेण्याचा मूलभूत अधिकार देखील त्यास मिळत नाही.
दूधवाला दूधात पाणी टाकतो यामध्ये नवरोबाचा काही दोष असतो का? तिथेही बायको,"तुम्हाला त्याला बोलता येत नाही का?" बायकोची ही कटकट दूधवाल्याच्या कानापर्यंत गेलेली असते.दूधवाला विवाहित
असल्याने बायको नावाचा हा हिंस्त्र प्राणी घरात बाळगणे किती जिकिरीचे असते हे तो
जाणून होता.नवरा बायकोची भांडणे शेजारी
ऐकू जात नाही.आपल्या घरातील भांडी आवाज करत असली की शेजारच्या भांड्याचा आवाज येत नाही.जे भांड्याचे तेच
भांडणाचे असते.
कशावरून भांडायचे हे महत्त्वाचे नसते.भांडणे महत्त्वाचे असले की कशावरूनही भांडता येते,हे 'आखिल भारतीय विवाहित महिलांना'ठाऊक असते.
मोठ्या शिताफीने नवरा भाजीपाल्याची पिशवी घेऊन घरी येतो.भरलेली पिशवी बघून
बायको आनंदी होईल असा त्याचा कायम गैर
समज असतो.बायको पिशवीमध्ये काहीतरी
शोधू लागते.सर्व भाजीपाला ,कांदे बटाटे बाहेर काढते.काय शोधते सांगत नाही.मलाही
प्रश्न पडतो.काय विसरलो नाही ,सगळे बघून
घेते आणि मग विसरलेला 'कढीपत्ता' भांडणास कारणीभूत ठरतो.पुन्हा न भांडण्याचा संकल्प मोडीत निघतो.
एकदा तर मला कसला तरी पुरस्कार भेटला.मोठ्या आनंदाने शाल,श्रीफळ घेऊन
घरी आलो.वाटले बायको आता तरी मांडणार
नाही . यापूर्वी नेहमी टोमणे असायचे,"त्या फलान्याला पहा किती पुरस्कार भेटलेत,एक
तुम्ही वेंधळे साधी शाल पण तुम्हाला कधी भेटली नाही." शालजोडीतून मारण्याचे हे कसब साहित्यिक नसतांना बायकांकडे कसे असते हे उमगत नाही.शाल आणि श्रीफळाकडे तिने केलेला कानाडोळा मला भलतेच सांगून गेला,ती शोधक दृष्टीने बघत
होती,"पाकिट कुठे आहे?" मी म्हणालो ,"कसले पाकिट?" " मग काय नुसताच दीड दमडीची शाल घेऊन आलात!"
असल्या शाली आणि नारळं ढिगारभर पडलीत आपल्या घरात." तिथेही माझा भ्रमनिरास झाला.
लग्नात गुण जुळले तरी दूर्गुंन जुळवलेले
नसतात.ते लग्नानंतर जुळवायाचे असतात.
ना.रा.खराद
मत्स्योदरी विद्यालय,अंबड
८८०५८७१९७६
[22/08, 15:45] N.R. kharad: तारतम्य
तारतम्य बाळगणे हे शहाणपणाचे
प्रमुख लक्षण आहे.ती शहाण्या माणसाची खरी ओळख आहे.जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी तारतम्य बाळगावे लागते,नसता आपले हसू होते, फजिती किंवा नुकसान होते.स्वभावातल्या कोणत्याही 'अति'मुळे तारतम्य सुटते.तारतम्य हे एक संतुलन आहे,
तारेवरची कसरत आहे.
आपल्या अवतीभवती तारतम्य नसलेली कित्येक माणसे वावरतात.अशांना ताळतंत्र
नसलेली माणसे देखील म्हणतात.तारतम्य किंवा ताळतंत्र नसणे हे मूर्खपणाच्या लक्षणांपैकी एक आहे.लहान लहान गोष्टींमध्ये देखील तारतम्य बाळगावे लागते.हा
शब्द जरी लहान असला तरी त्याचा पसारा
खुप मोठा आहे.
तारतम्य नसलेली माणसे इतरांसाठी करमणूक असते.अनेकवेळा डोकेदुखी देखील! शितावरून जशी भाताची परीक्षा होते तशी तारतम्याने शहाणपणाची होते.
पत्रिकेवर ,"लग्न वेळेवर लागेल ." अशी टिप
होती.दहा मिनिटे अगोदर पोहचलो.साडेबाराचे लग्न .लगेच जेवण मिळणार.उपाशीच गेलो.बघतो तर काय, अजुन नवरदेवाची स्वारीच पोहचलेली नाही.
दोन वाजता वऱ्हाडी आले.बाजा वाजू लागला.इकडे पोटात कावळे ओरडू लागले.
लग्नघटीका जवळ आली.मध्येच संताचे आशिर्वाद आणि नेत्यांचा सत्कार.एक तास गेला.तीन वाजले.पुन्हा वधुपित्याने आभार
मानले.भारतामध्ये रेल्वे आणि लग्न कधीच
वेळेवर नसते.ह्याची पुन्हा खात्री पटली.
लग्न वेळेवर लागेल ,लिहिलेली पत्रिका घेऊन
मी वधूपित्यास गाठले.तो म्हणे,"तसे लिहावे लागते ." " वेळेवर लागले तर त्यांचे चूकणार नाही का?" वधूपित्याने अनेक मुलींचे लग्न
असेच उरकल्यासारखे वाटत होते.
'या लोकांना काही तारतम्य आहे का?' असे
अनेकजण पुटपुटत होते.
एका आयोजित कार्यक्रमाला गेलो.एक तासात सगळे उरकण्यात येणार ,असे आयोजकांकडून कळाले होते.त्यामुळे मोठ्या
महत्त्वाच्या कामातून वेळ काढून आलो होतो.
संपूर्ण कार्यक्रम संपण्याच्या मार्गावर होता फक्त आभार प्रदर्शन शिल्लक होते. आभारास प्रदर्शन का म्हणत असावेत याची
त्यादिवशी प्रचिती आली.ज्या इसमाकडे ही
जवाबदारी दिली ती त्याने अत्यंत बेजवाबदारीने तडीस नेली.मुख्य वक्त्याच्या
भाषणापेक्षा आभारच जास्त झाले.श्रोते जागा सोडू लागले तरीही याचे लांबलेले आभार तो काही आखडते घेईना.तारतम्य नसले की कसे हसू होते.
गर्दी नसतांना जागेसाठी धडपड कशासाठी?
बसस्थानकावर हे नेहमी बघायला मिळते.
ताटामध्ये मीठ किती असावे.कुठे आणि किती बोलावे.कुणाशी काय बोलावे यासाठी
तारतम्य लागते.प्रसंगोचित वागणे ,बोलणेच
शहाणपणाचे असते.
अति हावरटपणा,आपलपोटेपणा,अति शहाणपणा यामुळे तोल सुटतो म्हणजेच तारतम्य रहात नाही.मी एकदा गरम जिलेबी
आणली .घरात सर्वांसमोर ठेवली.पाच सदस्य
होते.मी बघत होतो.कोण काय करते ते.एकाने बघितले जिलेबी किती आहे.प्रत्येकाच्या वाट्याला किती येईल.त्याप्रमाणे त्याने आपला वाटा उचलला.
एका हावरटने अर्धी जिलेबी घेतली आणि
खाऊ लागला.त्यातील एकाने उरलेला एक तुकडा उचलला आणि मला देऊ लागला.
म्हणे,"मला आवडत नाही." तारतम्य काय
असते.मला त्याही प्रसंगातून कळाले.
सर्वंकष व सर्वांगिण विचार करून निर्णय घेणे
हेच तारतम्य असते.ते सर्वांनी अंगिकारले तर
बरे होईल.
ना.रा.खराद,अंबड
[23/08, 18:44] N.R. kharad: बाळकडू
लहानपणी मिळणारे शिक्षण,संस्कार किंवा वळण बाळकडू मानले जाते.पुढे तोच त्याचा
स्वभाव बनतो.एकदा बनलेला स्वभाव बदलणे शक्य होत नाही.तो बरा वाईट जसा असेल तसा त्याच्या सोबतीला असतो.जसे
सर्व प्रकारचे दगड उपयोगी असतात तसे सर्वच माणसे भले ते कसेही असो कशाच्या आणि कुणाच्या तरी कामाची असतात.अशा
विपरीत गुण अवगुणांच्या लोकांचेही एक टोळके बनते,जे सर्वथा स्वार्थावर आधारित
असते.आपल्या अवगुणाचेही कौतुक झाले की तो मनुष्य आपलासा वाटतो.निंदा किंवा
टीका झाली की आपणास तो शत्रु वाटू लागतो.
आपल्या आजच्या वर्तनामागे आपणास मिळालेले बाळकडू काम करतअसते.
हा असा का,तो तसा का या प्रश्नांची उत्तरे हे
बाळकडूच.बालपणी अनेकांनी आपणास संस्कार दिलेले असतात.नकळत तेच आपल्या कायम सोबतीला असतात.संस्काराचे बाळकडू मिळाल्याने पुढे
पराक्रम गाजवणारे अनेक पराक्रमी पुरुष आपणास ठाऊक आहेत.आपण बरे किंवा वाईट वागलो की विचारले जाते ,"तू कुणाचा पोरगा?" आई बाप विचारले जातात कारण त्यांनीच बाळकडू दिलेले असते.बाप आपले
संस्कार मुलांवर बिंबवत असतो.जसे मुलावरुन बापाची परीक्षा होते तशी बापावरुन मुलांची होते.ज्या घरात,ज्या लोकांत मुल वाढले तेच संस्कार त्यास कायम
चिकटतात.
बापाचा वारसा मुले पुढे रेटतात.बाप काटकसरी असेल तर मुलांना उधळपट्टी करु
देत नाही.बाप उधळा असेल तर मुलांना काटकसर कर म्हणू शकत नाही.घरी आलेल्या पाहुण्यांना पैसे मागायला लावणारे
संस्कार असतात तसे पाहुण्यांना पैसे मागितले तर चोप देणारेही संस्कार असतात.
आई वडीलांवर पूर्णतः विसंबून असलेले बालक ,त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वाहक बनते. हे बाळकडू शिक्षणाने फक्त वाढीस लागते ,बदलत नाही. शाळेत शिकवले जाते
ते फक्त परीक्षेपुरतेच वापरले जाते.घरात जे शिक्षण मिळते तेच जीवनात वापरले जाते.
हे बाळकडू कुठल्याही औषधाने काढता येत
नाही.वीज चोरुन वापरणे,दूधात पाणी मिसळणे,खोटे बोलणे,चोरी करणे वगैरे सर्व
घरातले संस्कार असतात.
अनेक गुणवंत घरातील संस्कारातून निर्माण
झालेले असतात.स्वाभिमान,साहस,प्रेम,त्याग,उदारता
हे गुण जन्मजात असतात किंवा नसतात.त्याचे बाळकडू रक्तातच असावे लागते.
बाजारात वस्तू मिळतील.पैसा मिळेल परंतु
संस्कार घरात मिळतात.ज्याच्याकडे जे अभिजात असते ते त्याच्याकडेच असते.
इतरांचे गुण आपण घेऊ शकत नाही.
आपण मुलांना कोणते वळण लावतो.त्यांच्यामध्ये कोणते संस्कार रुजवतो
यावर त्यांचा पुढील प्रवास अवलंबून असतो.
कुणाची लहान मुले कशी वागतात यावरून
मोठी माणसे कशी असावीत ह्याचा अंदाज
येतो. बालकांना घरातून जे बाळकडू मिळते तेच कायम टिकते.
ना.रा.खराद
[25/08, 12:33] N.R. kharad: सहनशीलता
माणसांच्या अनेक गुणांपैकी सहनशीलता हा एक प्रमुख गुण आहे.तो प्रत्येकाच्या ठिकाणी
कमी जास्त प्रमाणात असतो.अपवादाने सहनशीलता अजिबात नसलेली माणसेही असतात.जीवनभर याच गुणाच्या जोरावर आपण मार्गक्रमण करतो.
आपल्या इच्छेनुसार या जगात काहीच घडत नसते.मनाविरुद्ध घटनांचे आपण साक्षीदार बनतो.जिथे नाइलाज असतो तिथे सहन करणे याशिवाय पर्याय नसतो.तडजोड जिथे
तिथे सहन करणे असते.अनेक ठिकाणी ,अनेक प्रसंगी आपण खूप काही सहन करतो.जिथे विरोध शक्य असतो तिथेही
आपण सहन करतो.नसलेली कटकट नको म्हणून सहनशीलता दाखवतो.इतरांशी संपर्क
आला की खुप काही सहन करावे लागते.
गर्दीमध्ये तर आपण काय काय सहन करतो.
कुणी धक्का मारतं,पाय तुडविते,थूंकते तरीही
आपण गर्दीमध्ये असे चालायचेच म्हणत ते सर्व सहन करतो.कुणी मोठ मोठ्याने बोलते,अगदी कानठळ्या बसतात तरीही त्याचे ऐकूण घेतले जाते.घरामध्ये नवरा बायको एकमेकांचे खुप काही सहन करत असतात.सहनशीलतेमुळेच संसार टिकून असतो.
भारतीय लोक तर फारच सहनशील आहेत.शेकडों वर्षे राजेशाही,नंतर इंग्रजांनी
दिडशे वर्षे गुलाम बनवले सर्व सहन केले.
सहनशीलता कधी गुण म्हणून वावरते तर कधी दोष.आपण कुणाचे काय आणि का सहन करतो यावरुन तीचे मोल ठरते.मालक
नोकरांना शिव्या देत असेल आणि तो सहन
करत असेल तर यामागची कारणे,त्यास कामाची गरज आहे.मालक आहे बोलतच असतात किंवा तो नोकर चुकलेला असेल.
गरजवंतला सहन करावेच लागते.अन्याय सहन केला जातो कारण विरोध करण्यासाठी
लागणारे बळ नसते अथवा त्यामागे स्वार्थ
असतो.
आई आपल्या मुलांचे संगोपन करतांना खूप काही सहन करते ते प्रेमामुळे.देशभक्तांनी शिक्षा सहन केली देशासाठी.सहनशीलतेलाही
मर्यादा असतात.सहनशीलतेचाही उद्रेक होत
असतो.काहींना आयुष्यात खुप काही सहन
करावे लागते.दुष्काळाचे चटके सहन करावे
लागतात.गरीबीच्या झळा सोसाव्या लागतात.
अपमान सहन करावा लागतो.
इतक्या तितक्या कारणावरून हमरीतुमरीवर येणे योग्य नसते , म्हणूनच सहनशीलता उपयोगाची ठरते.एखाद्या आजाराच्या वेदना,मनातली सल सहन केली जाते.जगात
वावरतांना सगळे काही मनाप्रमाणे घडत नसते.मनाविरुद्ध जे आहे ते सहन करावेच लागते.
सहनशीलता अनेकवेळा दोष ठरतो.इतरांच्या
भल्यासाठी किंवा सुखासाठी त्रास सहन करणारी महान माणसेही असतात.सत्यासाठी
न्यायासाठी झटणारे लोकांचा रोष सहन करत
असतात.गुंडाकडुन होणारा छळ सहन केला
जातो.अनेकांना भूक सहन करावी लागते.
जिथे त्रास आहे तिथे सहनशीलता आहे.
सुन सासुचा,सासु सुनेचा छळ सहन करते.
कुणी होणारी निंदा सहन करते.निसर्गाकडून
होणारे नुकसान सहन करावे लागते.
कुठे शेजाऱ्याचा त्रास सहन करावा लागतो.
एखाद्याचे न आवडणारे भाषण सहन करावे लागते.जीवन ऐच्छिक कमी अनैच्छिकच जास्त असते.सहनशीलतेच्या जोरावरच त्यावर मात करता येते.सहनशीलतेच्या अभावामुळे कित्येक आत्महत्या होतात.
सहन होण्यासारखे सहन केलेच पाहिजे.जे
सहन होत नाही,तिथे विरोध केला पाहिजे.
सहनशीलता जिथे गुण आहे तिथेच त्याचा
अवलंब व्हावा.जिथे तो दोष ठरेल तिथे ती
मुळीच असू नये.
ना.रा.खराद,अंबड
[27/08, 08:09] N.R. kharad: झोपेतली माणसे
झोपेत मनुष्य अनभिज्ञ असतो, म्हणूनच अनभिज्ञ माणसाला,"तू झोपेत आहेस का?" असे बोलले जाते.झोप ऐच्छिक नसल्याने
प्रत्येकास झोपावेच लागते.कितीही ताठर माणसाला झोप आडवी करते.मी पणाचा विसर पाडते.शरीर आणि मन शांत करण्यासाठी झोप आवश्यक असते.झोपेत मनुष्य अर्धमेला होतो.झोपेत देखील तो जीवंत असतो.तो झोपलेला असला तरी बरेच
काही सुरू असते.
बरीच माणसे अंथरुणावर अंग टाकले की घोरायला लागतात.मी अधूनमधून घोरतो असे
मला सांगण्यात आले परंतु मी ते मान्य करत
नव्हतो."स्वत:चे घोरणे स्वत:ला कळत नसते." असा नवीन वाक्प्रचार आस्तित्वात येण्यास हरकत नसावी. 'घोरणे' हा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडतो.अशा लोकांच्या
सानिध्यात झोपायचे असेल तर त्यांच्या अगोदर आपण झोपायचे.काहींचे घोरणे सौम्य असते,तर काही रेडा ओरडल्यासारखे
घोरतात.इतरांची झोप त्यांनी उडवलेली असते.झोपेत थोडीही हालचाल न करणारे,कुस देखील न बदलणारे आणि श्वासोच्छ्वासाचा देखील आवाज न येणारे काही झोपाळू असतात.ते दूर्मिळ प्राणी असतात.कायमचे झोपले की काय ,अशी शंका येण्याइतपत ते निपचित पडलेले असतात.
झोपेत बरळणारी काही मंडळी असते.जागेपणी कधीच तोंड न उघडणारी ही
रहस्यमय माणसे झोपेत मात्र 'नार्को टेस्ट' प्रमाणे सर्व बडबडत असते.अनेक मोठी रहस्ये त्यांच्याकडून उलगडली जातात.झोपेत पुटपुटणारी माणसे , जागेपणी
देखील काटकसरीने वाणी खर्च करणारी असतात.
कुणाला झोपेत चालण्याची सवय असते.हा फार अघोरी प्रकार आहे.शेजारच्या माणसाला तुडवले की जाग येते.असले हे
निशाचर झोपाळू कधी मुंडक्यावर पाय देतील
सांगता येत नाही.त्यांच्या शेजारी हेल्मेट घालून झोपलेलेच बरे.अनेकांना झोपेची जागा
सोडण्याची सवय असते.झोपतांना एका अंथरुणावर आणि सकाळी दूसऱ्याच अंथरुणावर दिसतात.हे घरंगळत जाणारे चल
झोपाळू असतात.पलंग वगैरेच्या मर्यादा ते पाळू शकत नाही.
झोपेतून अचानक उठून बसणारेही काही जागृत देवस्थाने असतात.आपण जिवंत असल्याची खात्री करुन पुन्हा झोपतात.
कुणाला शेजारच्यावर टांग टाकून झोपण्याची
सवय असते.कुणाला तशी टांग टाकून घेण्याची सवय असते.हा योग जुळला तर दोघे
सुखाने झोपतात.
बऱ्याच झोपाळूंना झोपेत डेंजर स्वप्न पडतात.ते घाबरून जातात.त्यांना झोपेत घाम फुटतो.जाग आली मग भीती दूर होते.
काही माणसे झोपेत हसतात.जागेपणी न हसू
शकलेले असतात कदाचित.झोपेत दात खाणारे भयानक रस निर्माण करतात.भूतप्रेत
असल्याचा भास होतो.स्मशानभूमित झोपल्यासारखे वाटते.अहिंसक असणारी ही
माणसे दात का खात असतील याचा अजून
थांगपत्ता लागलेला नाही.
पोटावर झोपणारी काही मंडळी असते.पाठीवर भार वाहिलेली ही माणसे पाठीला थोडा आराम देत असावीत.उतानी झोपणारी ही माणसे असभ्यपणाचा कळस असतात.पादवायु मोकळेपणाने विसर्जित करतात.वायुप्रदुषण होते.
कुणी अत्यंत वाकडेतिकडे झोपते.अगदी खेकड्यासारखे.शेजारचा माणसाच्या अंगावर
हा नेमके कोणते अंग टाकेल सांगता येत नाही.
कुणी आपले डोके गुडघ्याजवळ घेऊन झोपते.अजगरासारखा वेटोळा केलेला असतो.ही जमात तुरळक प्रमाणात आढळते.
काहींना झोपेत खाज सुटते.झोपेतच गाजत
रहातात.कुणी पाय आदळते.
झोपेतल्या या सर्व क्रिया अपरिहार्य आहेत.
याकडे गंमत म्हणून बघायचे असते.त्रास म्हणून नव्हे.
ना.रा.खराद
मत्स्योदरी विद्यालय,अंबड
[28/08, 09:55] N.R. kharad: धांदल..
आजकालचे जीवन धावपळीचे झाले आहे.कुठेच थांबता येत नाही.जिथे जावे तिथे रांगा.उसंत अशी नसते.रांगेत मिळते तेवढीच
उसंत मानायची, पुन्हा पळायचे.निवांतपणा असा कुठेच नाही.वेळेचे बंधन पाळणे आणि
त्यासाठी पळणे नित्याचेच झाले आहे.
गरजेनुसार घाई ,धावपळ किंवा धांदल करावी
लागते परंतु गरज नसतांना जेव्हा ती केली जाते तेव्हा ती हास्यास्पद ठरते.
धांदल हा काहींचा स्वभाव असतो."अति झालं आणि हसू आलं." या प्रकारात ते मोडते.
माझे एक शिक्षक मित्र असेच अति धांदली आहेत. .या धांदलीमुळे त्यांच्या हातून कितीतरी कपबशा फुटल्या असल्याची माहिती त्यांच्या अतिशांत सौ कडून मिळाली.
"लग्नाच्या वेळी शेवटचे मंगलाष्टक संपण्याच्या अगोदर माझ्या गळ्यात माळ टाकून मोकळे झाले होते." हाही पराक्रम त्यांच्या नावी आहे.त्यांच्या धांदली स्वभावाचे
अनेक किस्से अनेकांनी ऐकवले आहे.पैकी
माझ्याकडेही ते कमी नाहीत.
"अति घाई ,काम वाया जाई." हा फलक आम्ही त्यांच्या घरासमोर लावला होता.त्या
कामात त्यांनी देखील मदत केली होती.
त्यांनी घाईघाईने वाचले ,त्यांना ते कळाले नाही.साधे कुलूप लावतांना एक दोनदा ते हातातून निसटते.कडीमध्ये तीन चार प्रयत्नानंतर ते अडकविण्यात त्यांना यश येते.
चावीचे छिद्र अचूक सापडत नाही.चावी छिद्रात घातल्याविना चावी फिरवली जाते.कित्येकवेळा ते कुलूप तसेच निमुटपणे
लटकत रहाते.
धांदल ही त्यांची मुख्य ओळख आहे.इतर सर्व
गुण अवगुण धांदलीत गायब झाले. त्यांचे वर्गातले अनेक किस्से विद्यार्थीसांगतात.डस्टर
चार-पाच वेळा खाली पडते तेव्हाच ते फळ्यापर्यंत पोहचते.लिहितांना खडू हातातून
निसटला नाही,असे कधीच घडले नाही.खडू
उचलण्यासाठी एक विद्यार्थी जवळच बसलेला असे.वही तपासणी वेळेस इतकी
धांदल की पान उलटून ठेवलेले असले तरी पाने उलटली जातात.तपासलेली पाने पुन्हा
तपासली जातात.बऱ्याच वेळा ते दूसऱ्याच
वर्गीवर शिकवून यायचे.लघवी नंतर चैन लावणे तर ते कायम विसरायचे.एकदा तर घरून शाळेत निघतांना फक्त अंडरवेअरवरच
निघाले होते.गनिमत खिशातून चावी काढतांना त्यांच्या ते लक्षात आले.एकदा तर
मोठी गंमत झाली.बसस्थानकावर ते घाईने
महिलेच्या शौचालयात घुसले.आरडाओरडा
झाला.चपलेचा प्रसाद घेऊनच बाहेर!
त्यांच्या या स्वभावापायी त्यांचे हसू तर होतेच,
संकटालाही सामोरे जावे लागते.
बसस्थानकावर बस थांबण्याअगोदरच पायरीवर पाय ठेवण्याची घाई.मग लक्षात येते,"अरे खाली तर पायरीच नाही." कित्येकवेळा गर्दीमध्ये दूसऱ्यांची मुले हाताला
धरुन घरी आणली आहेत.आपली सोडून दूसऱ्याच बसमध्ये बसल्याचे ,त्यांचे अनेक
प्रसंग आहेत.
अंथरुन तर त्यांना टाकताच येत नाही.पसरविणे आणि लगेच जमा करणे अशी धांदल असते.आपण झोपलो की नाही
हे देखील जागे होऊन बघतात.ते चहा घेऊन
आले की माणसे उठून चहा घेतात.त्यांनी दिलेला चहा म्हणजे,सांडलेला चहा .'भीक नको पण चहा आवर 'अशीच भावना असते.
त्यांच्या हातामध्ये कोणतीच वस्तू थोडावेळ
देखील स्थिर रहात नाही.पैसे मोजणे तर त्यांना जमतच नाही.शेवटची नोट मोजतांना
पुन्हा विसर पडतो.अंघोळ तर इतकी घाईत असते की काही भाग कोरडा घेऊनच बाहेर.
विजेचे बटन तर कधीच अचूक दाबता आले
नाही.नको ते त्यांच्याकडून सुरू झालेले आहे.
धांदलीमध्ये जोडे तर इतके बदलले जातात की मूळ जोडा कुणाचे पदस्पर्शाने पुनीत झाला कळू शकत नाही.एकदा तर लेडिज चप्पलच घालून घरी.बायकोने पुन्हा लेडिज
हिसका दाखवला.
शेकहैंड तर एका हैंडमध्ये कधीच नाही.बऱ्याच प्रयत्नाने हस्तयोग जुळतो.
गिअर टाकतांना तर त्यांची भीती वाटते.ब्रेक वगैरे मध्ये इतकी धांदल की यमसदनीच.
जेवण वाढतांना तर धमाल होते.कढीच्या वाटीत श्रीखंड टाकल्याशिवाय ते स्वस्थ बसत
नाहीत.हात धूण्यापूर्वीच त्यांनी ताट उचललेले
आहे.शर्टचे बटन खालीवर लावणे तर रोजचेच
आपल्या अवतीभवती अशा प्रकारची स्वभाव
वैशिष्ट्ये असलेली माणसे असतात.जीवनात
गंमत यामुळेच आहे.
ना.रा.खराद
[28/08, 17:14] N.R. kharad: धांदल..
आजकालचे जीवन धावपळीचे झाले आहे.कुठेच थांबता येत नाही.जिथे जावे तिथे रांगा.उसंत अशी नसते.रांगेत मिळते तेवढीच
उसंत मानायची, पुन्हा पळायचे.निवांतपणा असा कुठेच नाही.वेळेचे बंधन पाळणे आणि
त्यासाठी पळणे नित्याचेच झाले आहे.
गरजेनुसार घाई ,धावपळ किंवा धांदल करावी
लागते परंतु गरज नसतांना जेव्हा ती केली जाते तेव्हा ती हास्यास्पद ठरते.
धांदल हा काहींचा स्वभाव असतो."अति झालं आणि हसू आलं." या प्रकारात ते मोडते.
माझे एक शिक्षक मित्र असेच अति धांदली आहेत. .या धांदलीमुळे त्यांच्या हातून कितीतरी कपबशा फुटल्या असल्याची माहिती त्यांच्या अतिशांत सौ कडून मिळाली.
"लग्नाच्या वेळी शेवटचे मंगलाष्टक संपण्याच्या अगोदर माझ्या गळ्यात माळ टाकून मोकळे झाले होते." हाही पराक्रम त्यांच्या नावी आहे.त्यांच्या धांदली स्वभावाचे
अनेक किस्से अनेकांनी ऐकवले आहे.पैकी
माझ्याकडेही ते कमी नाहीत.
"अति घाई ,काम वाया जाई." हा फलक आम्ही त्यांच्या घरासमोर लावला होता.त्या
कामात त्यांनी देखील मदत केली होती.
त्यांनी घाईघाईने वाचले ,त्यांना ते कळाले नाही.साधे कुलूप लावतांना एक दोनदा ते हातातून निसटते.कडीमध्ये तीन चार प्रयत्नानंतर ते अडकविण्यात त्यांना यश येते.
चावीचे छिद्र अचूक सापडत नाही.चावी छिद्रात घातल्याविना चावी फिरवली जाते.कित्येकवेळा ते कुलूप तसेच निमुटपणे
लटकत रहाते.या गृहस्थाला सूईमध्ये धागा कधीच टाकता आला नाही.सावधानमध्ये उभे
रहाता आले नाही.हा गृहस्थ वैद्यकीय क्षेत्रात
नसल्याने अनेक अनर्थ टळले असेही बोलले जाते.कुणाचा खांदेकरी हा कधीच नसतो.
धांदल ही त्यांची मुख्य ओळख आहे.इतर सर्व
गुण अवगुण धांदलीत गायब झाले. त्यांचे वर्गातले अनेक किस्से विद्यार्थीसांगतात.डस्टर
चार-पाच वेळा खाली पडते तेव्हाच ते फळ्यापर्यंत पोहचते.लिहितांना खडू हातातून
निसटला नाही,असे कधीच घडले नाही.खडू
उचलण्यासाठी एक विद्यार्थी जवळच बसलेला असे.वही तपासणी वेळेस इतकी
धांदल की पान उलटून ठेवलेले असले तरी पाने उलटली जातात.तपासलेली पाने पुन्हा
तपासली जातात.बऱ्याच वेळा ते दूसऱ्याच
वर्गावर शिकवून यायचे.लघवी नंतर चैन लावणे तर ते कायम विसरायचे.एकदा तर घरून शाळेत निघतांना फक्त अंडरवेअरवरच
निघाले होते.गनिमत खिशातून चावी काढतांना त्यांच्या ते लक्षात आले.एकदा तर
मोठी गंमत झाली.बसस्थानकावर ते घाईने
महिलेच्या शौचालयात घुसले.आरडाओरडा
झाला.चपलेचा प्रसाद घेऊनच बाहेर!
त्यांच्या या स्वभावापायी त्यांचे हसू तर होतेच,
संकटालाही सामोरे जावे लागते.
बसस्थानकावर बस थांबण्याअगोदरच पायरीवर पाय ठेवण्याची घाई.मग लक्षात येते,"अरे खाली तर पायरीच नाही." कित्येकवेळा गर्दीमध्ये दूसऱ्यांची मुले हाताला
धरुन घरी आणली आहेत.आपली सोडून दूसऱ्याच बसमध्ये बसल्याचे ,त्यांचे अनेक
प्रसंग आहेत.
अंथरुन तर त्यांना टाकताच येत नाही.पसरविणे आणि लगेच जमा करणे अशी धांदल असते.आपण झोपलो की नाही
हे देखील जागे होऊन बघतात.ते चहा घेऊन
आले की माणसे उठून चहा घेतात.त्यांनी दिलेला चहा म्हणजे,सांडलेला चहा .'भीक नको पण चहा आवर 'अशीच भावना असते.
त्यांच्या हातामध्ये कोणतीच वस्तू थोडावेळ
देखील स्थिर रहात नाही.पैसे मोजणे तर त्यांना जमतच नाही.शेवटची नोट मोजतांना
पुन्हा विसर पडतो.अंघोळ तर इतकी घाईत असते की काही भाग कोरडा घेऊनच बाहेर.
विजेचे बटन तर कधीच अचूक दाबता आले
नाही.नको ते त्यांच्याकडून सुरू झालेले आहे.
धांदलीमध्ये जोडे तर इतके बदलले जातात की मूळ जोडा कुणाचे पदस्पर्शाने पुनीत झाला कळू शकत नाही.एकदा तर लेडिज चप्पलच घालून घरी.बायकोने पुन्हा लेडिज
हिसका दाखवला.
शेकहैंड तर एका हैंडमध्ये कधीच नाही.बऱ्याच प्रयत्नाने हस्तयोग जुळतो.
गिअर टाकतांना तर त्यांची भीती वाटते.ब्रेक वगैरे मध्ये इतकी धांदल की यमसदनीच.
जेवण वाढतांना तर धमाल होते.कढीच्या वाटीत श्रीखंड टाकल्याशिवाय ते स्वस्थ बसत
नाहीत.हात धूण्यापूर्वीच त्यांनी ताट उचललेले
आहे.शर्टचे बटन खालीवर लावणे तर रोजचेच
आपल्या अवतीभवती अशा प्रकारची स्वभाव
वैशिष्ट्ये असलेली माणसे असतात.जीवनात
गंमत यामुळेच आहे.
ना.रा.खराद
[29/08, 14:56] N.R. kharad: जूतें और हम
जूते इन्सान के शरीर का अभिन्न अंग बने हैं।आदमी पैरों के बगैर जी सकेगा मगर जूतों
के बगैर नहीं।जैसे चोली दामन का साथ,वैसे
कदम और जूतों का।मुहावरों में उसे भले, पैर की जूती कहकर कम आंका है मगर असलियत कुछ और है।
जन्म के कुछ माह बाद ही जूतें हमारे साथ होते है।नन्हें से पैरों में पंपशू ।
जूतों में हर किसी की जान होती है।जूतें इन्सान की पहचान होती है।जब कोई किसीको देखता है तो पहले पैर के जूतें देखता हैं।पैरों का.मोल एकसा मगर जूतों का
अलग।
राम बनवास गये तो भरत ने राम के खडाऊं
की पूजा की।पादूकाओं की पुजा तो बहुत जगह देखी हैं।मंदिर में जाने से पहले जूतें हारवाले के पास सुरक्षित रखे जाते है।हार तो
बहाना है।मंदिरों में भी नजर जूतों पर होती है। पत्नी के खोने पर आदमी इतना परेशान नहीं होता ,जितना जूतों के खोनेपर होता है।
शादी में जोडा़ और उनका जोडा़ अहम है।इसलिए सालियां जोडा़ छिपाती है।पति पत्नी
तलाक ले सकते.है मगर जुतों की जोडी़ सदा सलामत रहती है।पलभर भी जूदा नहीं।कदम से कदम मिलाकर।एक का अंत हुआ तो दूसरा भी जान निछावर करता है।
जूतें केवल पैरों के रखवाले नहीं अपितु पैरों की शान भी हैं।उसके अन्य उपयोग भी कम महत्त्व.के नहीं।उसका शस्त्र की तरह उपयोग
है।औरतें,लडकियां ,जूतों.से मारुंगी कहती है।
जूतें हर आकार के होते है,यूं कहे जितने पैर उतने जुतें।जूतें हर कोई पहनता है।जनसंख्या की गिनती जूतें गिनकर भी की जा सकती हैं।
पुराने जूतें मरम्मत से ठीक किए जाते है।किसी के जिंदगी का साथ निभातें है।बस उसके मूल अवशेष नष्ट हो जाते है।
सिपाहीयों के जूतें मजबूत होते है।दूल्हन के नाजूक।
कुछ सभाओं में वक्ता को जूतें फेंककर मारें जाते है।जूतें खाए जातें है।जूतें बडे़ अनमोल
होते है।चीजों का उपयोग ही उसका मोल
हैं बाकी कौडी़मौल हैं।
.
ना.रा.खराद
मत्स्योदरी विद्यालय,अंबड
