[04/12, 08:01] N.R. kharad: पुरस्कार मिळाला की पुरस्कृत व्यक्ति सर्वांना माहीत होते.अभिनंदन, कौतुक, शुभेच्छा
याचा वर्षाव होतो.पुरस्काराची रक्कम मोठी असेल तर अधिकच गाजावाजा होतो.पुरस्कारानंतर त्याच्या कामाविषयी जाणून घेतले जाते हे विशेष.आपल्याच गल्लीतल्या एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळतो आणि मग आपण त्याचे महात्म्य शोधतो.इतरांनी दखल घेतल्याशिवाय आपण पुढे धजावत नाही.कुठलाही पुरस्कार हा तो
मागितल्याविना मिळत नाही.आपण त्या स्पर्धेत उतरायचे,आपले कार्य पटवायचे तेव्हा
तो मिळू शकतो.देणारे तर देण्यासाठीच बसलेले असतात.ते कुणाचाही शोध घेत नाहीत.बाजारात मांडल्याशिवाय मोलभाव
होत नाही.बैलाची किंमत ठरवावी तशी माणसाची किंमत ठरवली जाते.पैसेवाले,पदवाले ती किंमत ठरवतात.हा
गौरव, हे मोठेपण त्या पैशाचे किंवा पदाचे असते,त्याव्यक्तिचेनसते.गुणवंत,प्रतिभावंताचा कुणी शोध घेत नाही.जे पुरस्कार शोधतात त्यासाठी प्रयत्नकरतात त्यांना तो मिळतो.कित्येक पुरस्कारांमध्ये शाल आणि श्रीफळ देऊन बोळवण केली जाते.एखाद्या कवी, साहित्यिकाचे तोंडभरून कौतुक होते
परंतु त्याचे साहित्य वाचण्याची तसदी कुणी
घेत नाही.हारतुरे घालून लोक मोकळे होतात,त्यांना साहित्याचा गंध नसतो.
एखादी विश्वसुंदरी ठरते तेव्हा ती बाई जगातल्या सर्व बायांतून निवडलेली नसते तर
स्पर्धेत उतरलेल्या पाच पन्नास बायांतून असते
परंतु तीस 'विश्वसुंदरी' म्हंटले जाते.
पुरस्कारांचा जो बाजार मांडला आहे तो अनाठायी, अवास्तव आहे.कुणीही कुणाला कोणत्याही नावाने पुरस्कार देत आहे.तो असतो तरी काय? निदान जाण्यायेण्याचे भाडे तरी मिळावे? देणाऱ्याचे आणि घेणाऱ्याचे फूकट नाव करण्याचा हा उद्योग असतो.
पुरस्कारदात्यांनी गुणीजनांचा शोध घेतला पाहिजे,गुणीजन पुरस्कारांच्या शोधात नसले
पाहिजे.
ना.रा.खराद
मत्स्योदरी विद्यालय अंबड
[04/12, 17:44] N.R. kharad: मेहमान के बच्चे
त्योहार का मौसम है।इसीसे मेहमानों की आवाजाही शुरू हो जाती है।प्रिय,अप्रिय मेहमानों का तांता लग जाता हैं।उनकी खिदमत करना , मेजबानों का परम कर्तव्य होता हैं।यह मेहमानों की संख्या और फीतरत
पर निर्भर होता है कि मेहमाननवाजी रास आयी या नहीं।
कुछ मेहमान बतलाकर आते हैं,वे खुली चुनौती देनेवाले शत्रु की तरह होते हैं। परिणामजो भी हो मगर छुपकर वार नहीं करतें।इत्तलाकरनेवाले मेहमान निश्चिंत रहते हैं, चिंता तोमेजबान करें।अब उन्हें यह पूरा हक होता हैकि वे चाहे जितने आए और सब मिलकरपरेशान करे।
आनेवाले अपनी फूरसत से आते हैं। आपके
फूरसत की वे परवाह नहीं करते। मेजबान जो
ठहरा,सेवा ही उसका धर्म है। मेहमानों का अगर एक पूरा कुनबा हो, बच्चों से लेकर बूढ़ों
तक पधारें हो तो मेजबान अग्निपरीक्षा से गुजरता है। सहनशीलता की परीक्षा , सबसे कठीन होती है।
मेहमानों के अपने घर की वस्तूओं के प्रति जिज्ञासा उनके ज्ञान ग्रहन की क्षमता को दर्शाती हैं।हर वस्तु को छुकर,खोलकर,चलाकर , उलट-पुलट किए बगैर ज्ञान की सीमा तक वे नहीं पहुंच पाते। चूंकिवे बच्चें मेहमान हैं, उन्हें डांट फटकार लगा नहीं पाते,केवल आंखों के इशारे वे अनदेखेकरते हैं।घर की सारी व्यवस्था को बिगाड़देते हैं,तहस नहस कर देते हैं।
चांर पांच बच्चे कोई मामूली ताकत नहीं होती।घर में आते ही इनकम टैक्सवालों की तरह हरचीज खंगाली जाती हैं। कहीं कोई कोर कसरनहीं।उनकी दृष्टि बताती है कि अब खैर नहीं।
जरा सी अनदेखी क्या हुई,समझो बरसों से जतन की हुई कोई चीज धराशयी हो गई।
ये बालसैनिक बहुत उपद्रवी होते हैं।घर में घुसते ही चारों तरफ नजर फेरते है, फिर मोर्चासंभालते हैं। किताबें, डिब्बे, अलमारी खोलकर देखते है।टेप,टी.वी., कंप्यूटर चलाकर देखते हैं।कुर्सी, मोटर साइकिल ,कार में बैठकर देखते हैं। कुछ खाकर, कुछ पीकर देखते हैं।
उनका उधम किसी डाकूओं की टोली से कम नहीं होता।सभी आईनों में वे सुरत देखते हैं। कोई कंघीअछुती न रहे,इसका ख्याल रखते हैं। घर काहर कोने को तलाशते हैं फिर भी तस्सली नहींहोती। फिर सीढ़ीयां चढ़कर छत पर पहुंचते हैं।
जिस अलमारी को मैंने कभी खोलकर। देखा
नहीं, बच्चों से बच न सका।ताला था तो चाभी
ढूंढने लगे,इसी दौरान उनकी दृष्टि अन्य वस्तुओं पर भी पड़ी।सोचा था कुछ चीजें बच्चों की पहुंच से दूर हैं मगर यह तो भ्रम निकला,बच्चे चूंकि जिज्ञासु होते हैं इसलिए
हर चीज को टटोलते हैं। कोई चीज पटककर
देखते हैं। उसके मुख्य उपयोग को नजरंदाज
करके अन्य सारे उपयोग करके देखते हैं।
जोरआजमाइश तो बच्चों का गुणविशेष हैं।हर चीज को खिंचकर ही दम लेते हैं।यह सारा
उधम उनके मां बाप खुली आंखों से देखते हैं।
मेजबान अपना मौनव्रत निभाता है। मेहमान
के बच्चे हैं, हमेशा तो नहीं आते।अब आ गये तो कुछ निशान छोड़कर जा रहें हैं।
तोड़ना, खिंचना, मरोड़ना आदि सब तरह की
उपद्रवी क्रियाएं वे समाप्त करते हैं फिर उन्हें
भूख लगती हैं।वे भरपेट खाना खाते हैं और
लौटते समय जब अलविदा करते हैं तो जैसे
युद्ध में हमें परास्त करके जानेवाले दुश्मन
की तरह लगते हैं।
ना.रा.खराद
मत्स्योदरी विद्यालय अंबड
८८०५८७१९७६
[05/12, 08:22] N.R. kharad: रुमाल
- ना.रा.खराद
आपल्या कायम सोबतीला असलेला रुमाल फारच मोलाचा आहे.जवळ रुमाल नसलेला
मनुष्य फार मागास वाटतो, तुच्छ समजला
जातो.रुमाल हा नेमका कोणत्या कामाचा आहे,हे सांगणे देखील कठीण,कारण तो
बहुपयोगी आहे.जवळ बाळगायला सोपा.
खरेदीला स्वस्त.
रुमालाचा वापर कोण कशासाठी करेल सांगता येत नाही.गरजेच्या वेळी प्रथम आठवतो तो रुमाल.आकाराने लहान मोठे, विविध रंगांचे रुमाल उपलब्ध आहेत.आवडी
आणि गरजेनुसार त्याची निवड होते.रुमाल
देखील लिंगभेद करतात.लेडिज रुमाल जो
आकाराने लहान, नाजूक स्त्रीसुलभ असतो.
तो तितकाच हळूवार हाताळला जातो.
प्रथम भेटीची आठवण म्हणून कित्येक रुमाल
धन्य पावले आहेत.एकमेकांचे रुमाल जवळ
बाळगणे हे प्रेमीयुगुलांच्या सोयीचे असते.
रुमालाचा सर्वांत जास्त संपर्क नाकाशी येतो.
नाकाचे आणि ओठांचे अंतर फार कमी, अशावेळी रुमाल धाव घेतो आणि नको असलेला ओघ थांबवतो.अनेकांचे अश्रूं पुसणारे कुणी नसते अशावेळी रुमालच हळहळतो आणि आपले अश्रू पुसतो.
दादा लोक रुमाल गळ्याभोवती बांधतात,त्याने
दादापणाचा एक वेगळा लूक तयार होतो.
राजकीय पक्षांनी देखील रुमालाचे महात्म्य
ताडले ,सर्वच पक्षांनी आपले रुमाल प्रचारात
आणले.रुमालाचे आकार आणि प्रकार शेंकडों
आहेत.रुमालाच्या वापरावरुन देखील ओळख
पटते.यू.पी., बिहारी लोकांची ओळख रुमालाने पटते.विशिष्ट धर्माचे लोक वैशिष्ट्यपूर्ण रुमाल वापरतात.रुमाल हे कट्टरपंथी लोकांचे प्रतिक आहे.
लग्नात वधू वरांचे रुमाल असतात.वधूची
पहिली गाठ रुमालाशी पडते.
भाजीपाला,फळे यांचे वहन करण्याचे काम देखील रुमाल करतो.ऐनवेळी आपली गरज
भागवितो तो रुमालच.कपड्यावरची धूळ झटकण्याचे काम तो करतो.तोंडावरुन फिरवला की बरे वाटते.कुठे जमीनीवर अंथरुन
त्यावर आपण आसनस्थ होतो.कधी डोक्याखाली , उन्हात डोक्यावर, पावसाळ्यात
ओले अंग कोरडे करतो.तोंड लपवण्यासाठी
देखील रुमालाचा उपयोग होतो.
रुमालाचा झोळी म्हणून उपयोग करता येतो.
डोके दुखु लागले की रुमाल डोक्याला बांधला
जातो.हाड मोडले,रक्त वाहू लागले की रुमाल
मदतीला येतो.इतकेच नाही चपलेचा अंगठा तुटला किंवा बूट रुतू लागला की रुमाल कामी
येतो.
रुमाल आपल्या अत्यंत उपयोगाची वस्तू आहे.
सर्वांनी ती जवळ बाळगली पाहिजे.तिच्याविषयी कृतज्ञ व्हावे म्हणून हा
लेखन प्रपंच!
8805871976
[08/12, 08:27] N.R. kharad: मेहमान के बच्चे
त्योहार का मौसम है।इसीसे मेहमानों की आवाजाही शुरू हो जाती है।प्रिय,अप्रिय मेहमानों का तांता लग जाता हैं।उनकी खिदमत करना , मेजबानों का परम कर्तव्य होता हैं।यह मेहमानों की संख्या और फीतरत
पर निर्भर होता है कि मेहमाननवाजी रास आयी या नहीं।
कुछ मेहमान बतलाकर आते हैं,वे खुली चुनौती देनेवाले शत्रु की तरह होते हैं। परिणामजो भी हो मगर छुपकर वार नहीं करतें।इत्तलाकरनेवाले मेहमान निश्चिंत रहते हैं, चिंता तोमेजबान करें।अब उन्हें यह पूरा हक होता हैकि वे चाहे जितने आए और सब मिलकरपरेशान करे।
आनेवाले अपनी फूरसत से आते हैं। आपके
फूरसत की वे परवाह नहीं करते। मेजबान जो
ठहरा,सेवा ही उसका धर्म है। मेहमानों का अगर एक पूरा कुनबा हो, बच्चों से लेकर बूढ़ों
तक पधारें हो तो मेजबान अग्निपरीक्षा से गुजरता है। सहनशीलता की परीक्षा , सबसे कठीन होती है।
मेहमानों के अपने घर की वस्तूओं के प्रति जिज्ञासा उनके ज्ञान ग्रहन की क्षमता को दर्शाती हैं।हर वस्तु को छुकर,खोलकर,चलाकर , उलट-पुलट किए बगैर ज्ञान की सीमा तक वे नहीं पहुंच पाते। चूंकिवे बच्चें मेहमान हैं, उन्हें डांट फटकार लगा नहीं पाते,केवल आंखों के इशारे वे अनदेखेकरते हैं।घर की सारी व्यवस्था को बिगाड़देते हैं,तहस नहस कर देते हैं।
चांर पांच बच्चे कोई मामूली ताकत नहीं होती।घर में आते ही इनकम टैक्सवालों की तरह हरचीज खंगाली जाती हैं। कहीं कोई कोर कसरनहीं।उनकी दृष्टि बताती है कि अब खैर नहीं।
जरा सी अनदेखी क्या हुई,समझो बरसों से जतन की हुई कोई चीज धराशयी हो गई।
ये बालसैनिक बहुत उपद्रवी होते हैं।घर में घुसते ही चारों तरफ नजर फेरते है, फिर मोर्चासंभालते हैं। किताबें, डिब्बे, अलमारी खोलकर देखते है।टेप,टी.वी., कंप्यूटर चलाकर देखते हैं।कुर्सी, मोटर साइकिल ,कार में बैठकर देखते हैं। कुछ खाकर, कुछ पीकर देखते हैं।
उनका उधम किसी डाकूओं की टोली से कम नहीं होता।सभी आईनों में वे सुरत देखते हैं। कोई कंघीअछुती न रहे,इसका ख्याल रखते हैं। घर काहर कोने को तलाशते हैं फिर भी तस्सली नहींहोती। फिर सीढ़ीयां चढ़कर छत पर पहुंचते हैं।
जिस अलमारी को मैंने कभी खोलकर। देखा
नहीं, बच्चों से बच न सका।ताला था तो चाभी
ढूंढने लगे,इसी दौरान उनकी दृष्टि अन्य वस्तुओं पर भी पड़ी।सोचा था कुछ चीजें बच्चों की पहुंच से दूर हैं मगर यह तो भ्रम निकला,बच्चे चूंकि जिज्ञासु होते हैं इसलिए
हर चीज को टटोलते हैं। कोई चीज पटककर
देखते हैं। उसके मुख्य उपयोग को नजरंदाज
करके अन्य सारे उपयोग करके देखते हैं।
जोरआजमाइश तो बच्चों का गुणविशेष हैं।हर चीज को खिंचकर ही दम लेते हैं।यह सारा
उधम उनके मां बाप खुली आंखों से देखते हैं।
मेजबान अपना मौनव्रत निभाता है। मेहमान
के बच्चे हैं, हमेशा तो नहीं आते।अब आ गये तो कुछ निशान छोड़कर जा रहें हैं।
तोड़ना, खिंचना, मरोड़ना आदि सब तरह की
उपद्रवी क्रियाएं वे समाप्त करते हैं फिर उन्हें
भूख लगती हैं।वे भरपेट खाना खाते हैं और
लौटते समय जब अलविदा करते हैं तो जैसे
युद्ध में हमें परास्त करके जानेवाले दुश्मन
की तरह लगते हैं।
ना.रा.खराद
मत्स्योदरी विद्यालय अंबड
८८०५८७१९७६
[08/12, 18:23] N.R. kharad: नाद
- ना.रा.खराद
नाद,ध्वनि किंवा आवाज सतत आपल्या कानावर पडत असतो.कुणाचे बोलणे देखील नाद असतो,इतकेच नाही तर स्वत:चे बोलणे
देखील आपण स्वत: ऐकतो.केवळ बोलणेच
नाही,ओरडणे ,खेकसणे व इतर वाणीवाटे निघणारे सर्व आवाज, ज्यामध्ये घोरणे,खोकणे
हे सर्व आले.सतत कानी पडणारे आवाज आपल्या ओळखीचे होऊन जातात,प्राणी देखील ते ओळखतात.
आपले सर्व जीवन विविध प्रकारच्या आवाजाने किंवा ध्वनिने व्यापलेले आहे.हा नाद एक प्रकारचे संगीत आहे.कोणतातरी आवाज 👂 कानी पडल्याशिवाय कर्ण समाधान पावत नाही.सतत उघडे असलेले कान शेंकडों प्रकारचे आवाज आपल्या पर्यंत
पोहचविण्याचे कार्य करते.कळत नकळत आपण या आवाजाभोवती गुरफटलेले असतो.
रोज पहाटे गल्लीमध्ये तोंड धूतांना एखाद्या
वृद्ध माणसाचा आवाज वातावरणात एक नाद
उत्पन्न करतो.जाग येण्यापूर्वी पक्षांची किलबिल माणसाचे एकटेपण घालवते.आपल्यासोबतीला अजून कुणीतरी
आहे याची जाणीव करुन देते.पहाटे नळावर
भांड्यांचा नाद कानात घुमतो.तो ऐकल्याविना
पहाट कशी सुनी लागते.
मस्जिदीमधील अजान असो किंवा मंदिरातले
भजन असो गावभर त्याचा नाद घुमतो .
शाळा भरण्याची आणि सुटण्याची घंटा गावभर आपला नाद पसरविते.मुले त्या आवाजाने आंदोलीत होतात.गाववासियांना
देखील त्या आवाजाची सवय होऊन जाते.
घरामध्ये देखील विविध भांड्यांचा आपला एक
नाद असतो.चहाची कपबशी वाजली की अंग रोमांचित होते.विविध चमचे,ताटल्या वगैरे संगीत साहित्यच आहे.
कुठे लग्न वगैरे असले की बाजा वाजतो.गालभर त्याचा नाद पसरतो.आनंदाला
भरते येते.गावात एखाद्या येणाऱ्या बसचा आवाज कुतुहलाचा विषय असतो.मन उचंबळत असते.नियमितपणे मंदिरासमोर वाजणारा डफ असो की आरतीची घंटी असो.
वातावरण मंगलमय करते.
नको असलेले अनेक आवाज कानी पडत असतात.मोटर वाहने, कारखाने परिसरात
एक नाद निर्माण करतात.रात्रीच्या निरव शांततेत कुत्र्यांचे भूंकणे एक वेगळाच नाद
निर्माण करतो.
वारे सुटले की झाडांचा ध्वनि मनामध्ये एक
वेगळाच कैफ तयार करतो.एखाद्या धबधब्याचा किंवा समुद्राच्या लाटांचा आवाज
वातावरण दणाणून सोडतो.घरामध्ये लहान
मुलांची किलबिल किंवा 🐈 मांजरांचा आवाज जगण्यातील गोडी वाढवतो.
घड्याळाची टिकटिक कातर वाटू लागते.पहाटे
कोंबड्याची बाग आपणास नवा उल्लास देते.
गायी वासरांचे हंबरणे आपणास वात्सल्याची
जाणीव करुन देते.
विविध प्रकारच्या आवाजाने जीवन समृद्ध
झालेले असते.हा नाद जीवनसंगीत आहे.
[10/12, 22:51] N.R. kharad: गरज
~ ना.रा.खराद
गरज या विषयावर लिहिण्याची गरज भासली म्हणून हा शब्द प्रपंच! तसे गरजेशिवाय कुणी
काही करत नाही.गरज या शब्दाचा सर्व खेळ आहे.माणसाला माणसाची गरज आहे म्हणून
माणसे एकमेकांसाठी काही करतात.माणसे गरजा इतरांकडून पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात.गरज ही शोधाची जननी असते,असे
म्हंटले जाते,त्याचा अनुभव सर्वांना आहे.
गरजवंतला अक्कल नसते,असेही म्हणण्याचे
धारिष्ट्य दाखवले आहे.गरज सरो आणि वैद्य
मरो , असे उगीच बोलले जात नाही.
एकंदरीत गरज या शब्दाभोवती जग फिरते
आहे.गरज प्रत्येकाला असते.गरज कुणाचीही
असू शकते.गरजेमुळे माणसे एकमेकांशी सौजन्याने वागतात.
कोणत्या वेळी,कुणाची गरज पडेल सांगता
येत नाही.गरजेच्या वेळी माणसाला आपली
माणसे कळतात.गरजेपुरती असलेली माणसे
असतात.प्रत्येकाची गरज वेगळी असू शकते.
मनुष्य गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो.
गरजा कधीच संपत नाहीत.नवनवीन गरजा
निर्माण होतात.गरजेमधूनच महत्त्व दिले जाते.
गरजेच्या वेळी अल्प मदत विसरता येत नाही.
कुणाची काय गरज आहे, हे लक्षात आले पाहिजे.वेळकाळ गरज ठरवते.गरजेनुसार
निर्णय घेणे चातुर्य मानले जाते.गरजेपुरतेच
वापरणे स्वार्थ असतो.जिथे सुईची गरज तिथे
दाभन उपयोगाचे नसते.गरजेनुसार मोल ठरते.
आपण जास्त गरज दाखवली की समोरचा भाव खातो.माणसांना गरज असते म्हणून
मनुष्य खुप सहन करतो.गरजेचा गैरफायदा
घेतला जातो.गरज असेल तर मनुष्य तडजोड
करतो.गरज दोघांनाही असेल तर दूधात साखर असते.गरजेतून माणसे एकत्र येतात.
गरजेच्या वेळी कुणी अडवणूक करते.कुणी
गरज भागवते.जगण्यासाठी गरजेपुरते असावे
लागते.काहींच्या गरजा कमी असतात.
सर्वांच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही.मनुष्य
गरजांसाठी प्रयत्नशील असतो.
गरजेपुरते असावे.अधिकचे वाया जाते.
गरजवंताचे शोषण केले जाते.गरजाचांही एक
क्रम असतो.गरज माणसाला सर्व काही करायला लावते.मनुष्य गरजेचे सामान जवळ
बाळगतो.गरजेच्या वेळी माणसाला आणि वस्तूंना मागणी असते.जितकी ज्याची गरज, तितके महत्व जास्त.गरज माणसाला लाचार
बनवते .
माणसे एकमेकांच्या गरजा भागवितात.
गरज आहे म्हणून माणसे एकमेकांशी सौजन्याने वागतात.आपली किती गरज आहे
यावर माणसांचे महत्त्व आहे.
[11/12, 07:38] N.R. kharad: एस.टी.चा प्रवास जितका सुलभ
तितकाच गंमतीशीर असतो.बसची वाट बघत बसलेले प्रवासी तिचे आगमन होताच असे धावतात जसे लग्नात पाहुणे जेवणासाठी धावतात.
म्हातारी माणसे,बाया, मुलं,तरुणी, आजारी,अपंग,भिकारी, चोरटे,दादा वगैरे. विविधता काय असते बघायला मिळते.
जागा धरणे हे एक दिव्य असते.त्यासाठी जवळ असलेल्या कुठल्याही वस्तूचा वापर करता येतो.शक्य नसल्यास खिडकीत मावेल एवढे मुल आत ढकलले तरी चालते.
तरूणींना जागा धरण्याची गरज नसते.तो
भार तरूण मुले उचलतात.दरवाजातून घुसेल तो तरुण कसला? खिडक्यांचा दूहेरी उपयोग ते दाखवून देतात.संकटकाळी बाहेर
पडण्याच्या मार्गातून ते आत पडतांना दिसतात.रिकाम्या सीटवर एखादी तरुणी बसेल अशी तरूण आशा बाळगून असतात.
म्हातारी बाया माणसे कुरकुर करतात.कुणी
जागा देतं का जागा? बसलेल्या लोकांना शिव्याशाप देत ताडकळत असतात.मध्येच
कुणालातरी माणूसकीचा पाझर फूटतो.इतरांपेक्षा आपण चांगले आहोत असं
तो समजतो.
थोडं टेकू द्या म्हणणारे टेकल्यावर मात्र सैल
बसतात, हे इंग्रजांनी पण दाखवलं होतं.
सवलतीचे पासवाले आणि वाहक यांचे जसे
हाडवैर असते.अकारण हुज्जत ठरलेली असते.सुटे पैशावरून हूज्जत हा अविभाज्य
भाग आहे.वाहकास त्याची सवय झालेली असते.
काही प्रवासी सोबत खुप सामान घेऊन प्रवास करतात.त्यांचे काही तरी विसरलेले
असते.साहेबाला न विचारता ते बेल वाजवतात.चालक तेव्हा खेकसतो.अस्मिता
काय असते कळते.
शाळकरी मुले शाळेत गप्प असतात म्हणून
बसमध्ये गप्प नसतात.मुलींवर प्रभाव टाकण्यासाठी अनेक उपाय करतात.
काही प्रवासी गंभीरपणे वर्तमानपत्र वाचत
असतात.फूकटे वाचक एखादं पान देता का?
अशी विचारणा करतात.
काही खादाड प्रवासी खानावळीत बसल्यासारखे हासडत असतात.
लहाण मुलं विक्रेते बघून हट्ट करतात.आया
समजावून सांगतात.काही आया चोप देतात
मुलं भोकाड पसरतात.एक वेगळे संगीत अनुभवायला मिळते.जागेवरून ,धक्का लागला म्हणून बायकांची भांडणे होतात.कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी बायकांची भांडणे ठरलेली असतात.माणसे
बायकांच्या भांडणात पडत नाहीत.
नारायण खराद अंबड
[12/12, 08:33] N.R. kharad: हुरडा पार्टी
पार्टी म्हंटले की हल्ली मद्य पार्टी,डान्स पार्टी ,ढाब्यावरची पार्टी आठवते ,मात्र एकेकाळी सुगीच्या दिवसातील सर्वश्रुत पार्टी
म्हणजे 'हुरडा पार्टी'.खेडेगावातील या पार्टीची
मज्जा काही औरच असते.माझ्या बालपणी मी या पार्ट्यांचा मनमुराद आनंद लुटला आहे.
हुरडा पार्टीचे आयोजन, नियोजन मोठी माणसे करायची, आम्ही बच्चे कंपनी फक्त पोटभर हुरडा हासाडायचो.या पार्टीसाठी कुठलाही खर्च नसायचा.चटनी,दही नसले
तरी नुसते मीठ चवीसाठी पूरेसे असायचे.एखादे सोबतीला पोते,काडीपेटी असली की झाला मेळ.पार्टीची वेळ बहुदा सायंकाळची असायची.अंधारपडेपर्यंत पार्टी
चालायचे.गप्पाटप्पा , हास्यविनोद याने पार्टीला रंगत यायची.मोठी माणसे बोलायची
आम्ही ते ध्यानपूर्वक ऐकायचो.
सर्वप्रथम शेतात आखटी खोदली जायची,गोवऱ्याचा शोध घेतला जायचा मग
त्यांची व्यवस्थित मांडणी केली जायची.कुणीतरी उभ्या पिकांचे ज्वारीची
निवडून कणसे काढायची ,विस्तवामध्ये ती
कणसे खुपसायची आणि चांगली भाजली की
बाहेर काढायची.ती गरम कणसे हातावर चोळायची, बाहेर दाने पडले की सर्वजन थोडी थोडी उचलायची आणि पार्टीला रंगत
चढायची.सोबतीला हरबऱ्याचा टहाळ,बोरे,ऊस असा रानमेवा असायचा.पाळलेले कुत्रे बाजूला बसलेले असायचे.सूर्य मावळतीला गेला की आम्ही
पाऊलवाटेने घराकडे परतायचो.
जीवन किती साधे सरळ होते.
ना.रा.खराद
[12/12, 18:47] N.R. kharad: भूलक्कड पत्नी
वैसे पत्नियां कई किस्मों की होती हैं।पति को
परेशान करने का हुनर हर किसी पत्नी पास होता हैं,इसी ऐब के बूते वह दिन गुजारती है।
शायद भगवान की यही मंशा रही होगी कि
शादीशुदा मर्द घर में ही परेशान रहे ताकि वह
बाहर किसीको परेशान न करे।
हर किसीके पत्नी के ऐब बाहर के लोगों से
छिपे रहते हैं। औरों को बाहर की औरतें बड़ी
गुणवान लगती हैं।काश की सांस लेते हैं।
मगर केवल दूर ढोल ही सुहावने नहीं होते।
पत्नी की जिस हरकत को पति द्वारा उसका
ऐब कहा जाता है, पत्नियां उसीको अपना हुनर मानती हैं।वे भलिभांति जानती है कि पत्नी अगर गुणवान हो तो पति के दोष बढ़
जाते हैं इसलिए दंपति में संतुलन बनाए रखने
के लिए कोई ऐब पालना जरुरी है।
कोई मर्द अपनी औरत के ऐब सार्वजनिक नहीं
करता,इसे सभ्यता कहे या घर की इज्ज़त कहें
या पत्नी का खौफ कहे, अपने पैरों पर कुल्हाड़ी कौन मारेगा भला?
मैंने आज साहस जुटाया कि चाहें अंजाम जो
भी मैं अपनी वेदना या भड़ास इस कलम के
जरिए प्रकट करुं और अपना और अपने जैसे
तमाम पतियों को सांत्वना दूं।यह डर भी सताता है कि इस लेख का हवाला देकर नारी
आंदोलन न छिड़ जाएं और आखिल शादीशुदा
औरतें मेरा पुतला न फूंक दे।ऐसी दशा में पुरुषों का भी समर्थन नारी को ही मिलता हैं।
इसलिए कोई भी पति चूं तक नहीं करता।
मैं अपनी पत्नी के जिस ऐब से पीड़ित हूं ,वह
है उसका भूलक्कडपन। वैसे इस ऐब के कई
सारे फायदे भी हैं, बातचीत से पता चला है
कि कई सारे शादीशुदा मर्द इस ऐब को गुण
मानते हैं और हर बात याद रखना दोष।
उनकी पत्नियां छोटी-छोटी बातों को याद रखती हैं और अक्सर मौके बेमौके उन्हें याद
दिलाकर परेशान करती हैं।अब भूलक्कडपन
दोष या है या गुण इस पर राष्ट्रीय बहस होनी चाहिए ,तभी कोई नतीजा हाथ लगे।
मैं कोई चीज भूलता नहीं और उसे याद रहता
नहीं ,शायद इसी को संतुलित दंपति माना जाता हो।हम दोनों एक-दूसरे को इस बात को लेकर ताने मारते हैं और अपने ऊसुलों पर अड़े रहते हैं।समाज में,संसद में नारी के हक
में बड़े कड़े कानून बन रहें हैं उससे समूचा पति
वर्ग सकते में है।
मैं उसके भूलक्कडपन की कोई बात नहीं भूलता इस बात पर उसे एतराज़ है और मुझे
उसके भूलक्कडपन पर! दंपति जीवन में कुछ
याद रखना पड़ता है कुछ भूला देना पड़ता हैं
मगर भूलाने के लिए भी याद रखना पड़ता हैं।
जोरू के भूलक्कडपन के इतने किस्से,प्रसंग
हैं कि भूलक्कडपन एक दांपतिक समस्या इस
शीर्षक में कोई ग्रंथ लिखा जा सकता हैं मगर
हर सच्ची किताब की तरह उसकी भी होली
कराई जाएगी।
ना.रा.खराद,अंबड
[13/12, 06:23] N.R. kharad: वेड लागावे असे काही..
ना.रा.खराद
सृष्टीचे विविध चमत्कार बघितले की वेड लागायची वेळ येते.एकापेक्षा एक चमत्कार,न
उलगडणारे.जिकडे बघावे तिकडे सृष्टीचे वैभव.मनाला भूरळ घालणारे सर्वकाही.बुद्धी
बंद पडावी असेच सगळे.केवळ नतमस्तक
व्हावे असे अफाट आणि अचाट . डोळ्यांत
सामावू न शकणारे हे दात्याचे दान.जन्माचे
पारणं फेडणारे आहे.एक एक फूल बघून
मन वेडावून जाते.पानांचे आकार तर काळजाला भिडतात.फळांची चव ,त्यांचा आकार ,त्यांचे रंग मानवी मनाला चटक लावतात.सूर्योदय बघितला की नवजन्माचा
भास होतो.त्याचा बदलणारा रंग आणि आकार
न्याहळत बसावे वाटते.विविध प्रकारचे वृक्ष
या सृष्टीची खरी समृद्धी आहे.अनेक वनस्पतींनी नटलेली सृष्टी,त्यावर भिरभिरणारी
रंगबिरंगी फूलपाखरे बघून स्वर्ग यापेक्षा काय
वेगळा असेल असे वाटायला लागते.
कोकीळेचा मधूर स्वर कानावर पडला की
मन तृप्त होऊन जाते.आपल्याशिवाय असलेले
अनेक जीवजंतू सोबतीला आहेत.लपून छपून
घरात शिरणारे मांजर बघा,आपली नजर चूकवून भाकरीचा तूकडा उचलणारा कावळा
बघा.आपल्या समोर शेपूट हालवणारा कुत्रा किती देदीप्यमान हे सर्व.जवळ गेले की भूर्रकन उडणारे पक्षांचे थवे , कुठेतरी मुंग्यांची
रांग बघायला मिळते.सृष्टीच्या या हालचाली,तिचे बदलणारे रंग न्याहाळता आले
पाहिजेत.
सृष्टीचे वैभव आपल्या अवतीभवती आहे.सोबतीला आहे.त्याची सोबत करा.सृष्टी
हाच खरा ईश्वर आहे.तिची उपासना आणि
जोपासना करा.तिच्याशी अधिक एकरुप व्हा.
सृष्टी आपली माता आहे,तिच्या अंगाखांद्यावर
खेळा.तिच्या मायेची ऊब हवी असेल तर तिच्या जवळ जायला शिका.सृष्टीकडे कान
द्या, तिच्याकडे डोळे लावा,तिला स्पर्श करा.
तिच्याशी एकरुप होऊन जा.
[13/12, 09:12] +91 94229 95751: *एक फोटोग्राफ़र ने दुकान के बाहर बोर्ड लगा रखा था।*
*20 रु. में - आप जैसे हैं, वैसा ही फोटो खिंचवाएँ।*
*30 रु.में - आप जैसा सोचते हैं, वैसा फोटो खिंचवाएँ।*
*50 रु. में - आप जैसा लोगों को दिखाना चाहें, वैसा फोटो खिंचवाएँ।*
*बाद में उस फोटोग्राफर ने अपने संस्मरण में लिखा,*
*मैंने जीवनभर फोटो खींचे, लेकिन किसी ने भी 20 रु.वाला फोटो नहीं खिंचवाया, सभी ने 50 रु. वाले ही खिंचवाए....*
*दोस्तों बस कुछ ऐसी ही हक़ीक़त है- ज़िंदगी की...*
*हम हमेशा दिखावे के लिए ही जीते रहे है, हमने कभी अपनी वो 20 रुपये वाली जिंदगी जी ही नही!!!*
*ये दुनिया भी कितनी निराली है!*
*जिसकी आँखों में नींद है …. उसके पास अच्छा बिस्तर नहीं …जिसके पास अच्छा बिस्तर है …….उसकी आँखों में नींद नहीं …*
*जिसके मन में दया है ….उसके पास किसी को देने के लिए धन नहीं* …. *और जिसके पास धन है उसके मन में दया नहीं …*
*जिन्हें कद्र है रिश्तों की … उन से कोई रिश्ता रखना नही चाहता....* *जिनसे रिश्ता रखना चाहते हैं ….उन्हें रिश्तों की कद्र नहीं*
*जिसको भूख है उसके पास खाने के लिए भोजन नहीं….* *और जिसके पास खाने के लिए भोजन है ………उसको भूख नहीं…*
*कोई अपनों के लिए…. रोटी छोड़ देता है…तो कोई रोटी के लिए….. अपनों को….*
🙏🙏🙏🌹🌹🌹
[13/12, 20:36] +91 94040 43444: *रिक्त मरण (Die Empty)*
*वाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तकं आहेत त्यातलंच एक सर्वोत्तम पुस्तक म्हणजे टॉड हेनरी यांचे "Die Empty"*
*हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटींग मध्ये मिळाली.*
*मिटींगमध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की "जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे?"*
*प्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : "तेलाने समृद्ध गल्फ राज्ये."*
*तर दूसर्याने उत्तर दिले : "आफ्रिकेतील डायमंड खाणी."*
*त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाले : नाही, जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी. कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत ज्यांच्याजवळ अनेक मौल्यवान कल्पना होत्या पण त्या कधीच प्रकाशात येऊ शकल्या नाहीत आणि इतरांना त्याचा काहीच फायदा सुध्दा झाला नाही. त्यांच्या या सर्व मौल्यवान कल्पना त्यांच्याबरोबर या दफनभूमीत पुरण्यात आल्या आहेत.*
*याच उत्तराने प्रेरीत होऊन लेखक टॉड हेनरी यांनी "Die Empty" हे पुस्तक लिहले.*
*सर्वात सुंदर जर त्यांनी काही या पुस्तकात म्हटलं असेल तर ते म्हणजे " तुमच्या आतमध्ये जे सर्वात बेस्ट आहे जे तुम्ही करु शकता ते आतमध्येच ठेवुन मरु नका. निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे नेहमी रिक्त मरण निवडा.*
*रिक्त मरण किंवा Die Empty या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये जो काही चांगुलपणा आहे, जे काही चांगले तुम्ही या जगाला देऊ शकता ते सर्व मरण्यापूर्वी या जगाला देऊन जा.*
*जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती सादर करा.*
*जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते इतरांना द्या.*
*जर तुमच्याकडे एखादे ध्येय असेल तर ते साध्य करा.*
*तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा, इतरांना सांगा आणि इतरांमध्ये वाटा आतमध्येच दडवून ठेवू नका.*
*चला तर मग, द्यायला सुरुवात करुया. आपल्यामध्ये जे काही चांगले आणि आपण जे काही चांगले या जगाला देऊ शकतो ते सर्व आपल्यामधून काढून या जगामध्ये पसरवा.*
*शर्यत सुरु झाली आहे.*
*चला, हे जग सोडण्याआधी रिक्त होऊया.*
[14/12, 20:08] N.R. kharad: मूर्ती लहान...
मानवी जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक
वस्तू स्वस्त आणि सुलभ असतात , परंतु त्यांचे
बाजारमूल्य कमी असल्याने त्याविषयी कुणी
विचार करत नाही.आपले जीवन सुलभ आणि
सुखकर करण्यामध्ये या किंमतीने कमी असलेल्या पण नसल्यानंतर आपले अस्तित्व
दाखवणाऱ्या मौलिक वस्तू होत.
घरामध्ये सूई नसेल तर कशी धांदल उडते हे
आपण अनुभवतोच.अगदी आफिसला निघण्याची घाई आणि तितक्यात शर्टचे बटन
तुटले की मग सूईचे महत्त्व कळते.बटन जर
सापडले नाही तर अजूनच पंचाईत.दोन्ही वस्तू
स्वस्त असल्या तरी आपले मोल दाखवून देतात.पेन एक अशीच वस्तू एक रुपयात देखील मिळतो परंतु वेळेवर नसेल तर त्याची
किंमत कळते.रुमाल देखील एक अशीच वस्तू,
चार चौघात नाक गळू लागले की रुमाल आठवतो.पाच दहा रुपयांच्या वस्तू देखील लाखाची अब्रु घालवतात.
फोडणीसाठी वापरले जाणारे जिरे,मोहरी किती स्वस्त , नसते तेव्हा जाणीव होते.चवीसाठी कोथिंबीर,कढी पत्ता किती वाजवी दरात पण चव त्याशिवाय नाही.मीठ
तर कमाल करते.दहा पाच रुपयांत महिनाभर
पुरते पण त्याच्याविना जेवणात आणि जीवनात देखील चव नाही.थंडीच्या दिवसांत
👂 कानाला मफलर नसेल तेव्हा पंचवीस रुपयांची वस्तू ,किती मोलाची आहे.छत्री
तर पावसाळ्यात आपले महत्त्व दाखवते.अचानक निर्जन ठिकाणी सुरु झालेला पाऊस ☔ छत्रीविना कशी फजिती
करतो.शंभर दोनशेला मिळणारी छत्री ,जवळ
नसेल तर तीची गरज कळते.
चप्पल ही एक अशीच वस्तू.चप्पल हरवलेल्या
माणसाला विचारा ,चप्पल काय असते.मनुष्य
कावराबावरा होतो.चप्पल नसलेला मनुष्य
पाय नसलेल्या माणसांपेक्षा विद्रुप दिसतो.
नेलकटर,डिंक,ब्लेड या अशाच उपयोगी वस्तू.
अडकळीला पडल्या तरी कधीतरी उपयोगी पडतातच.कंगवा एक अशीच वस्तू.असल्या
शेंकडों वस्तूंनी आपले जीवन समृद्ध केले आहे.गरीबांनाही परवडतील अशा या वस्तू फार मोलाच्या असतात.टार्च दहा रुपयात देखील मिळते, अंधारात चाचपडत बसले की
मग आठवते.लवंग,इलायची आकाराने किती
लहान.एक तोंडात टाकली की किती छान वाटते.सुपारी,बडीसोप किती स्वस्त पण चघळण्याची मजा किती असते.
वस्तूंप्रमाणे लहान माणसे , अशिक्षित असो वा
गरीब आपल्या उपयोगी पडतात.सहज लाभतात म्हणून त्यांचे मोल आपण जानत नाही.वस्तू असो वा मनुष्य त्याची किंमत नाही
तर मोल बघितले पाहिजे आणि मोल केले पाहिजे.इतके कृतज्ञ तर आपण असलेच पाहिजे.
ना.रा.खराद,शिक्षक
अंबड
[18/12, 08:10] N.R. kharad: लायक
नालायक ,हा शब्द लहानपणापासून अनेकवेळा कानी पडला आहे.कधी स्वत:च्या तर कधी इतरांच्या बाबतीतही, परंतु तो शब्द समजुन घेण्याची त्यावेळी लायकी नव्हती.
पुढे समजले की लायक नसणे म्हणजे नालायक.आई वडील देखील एखादी चूक केली की नालायक म्हणायचे.अर्थ कधी शोधलाच नव्हता, फक्त कळायचे की राग आहे.
पुढे मात्र लायक आणि नालायक या शब्दांचा
ससेमिरा कायम पाठीशी आहे.असे लक्षात आले की प्रत्येक मनुष्य लायक आणि नालायक दोन्हीही असतो.एका ठिकाणी एक तर दूसऱ्या ठिकाणी दूसराच कुणी लायक असतो.ज्या कामासाठी आपण योग्य असतो,तिथे आपण लायक असतो,जिथे पात्र
नसतो तिथे नालायक असतो.नालायक असणे
चूकीचे नसते.कुठेतरी आपण लायक असतोच.प्रत्येक दगड देखील प्रत्येक ठिकाणी
लायक नसतो.माणसाची किंमत देखील प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला नसते.कधी आपण
लायकीचे नसतो तर कधी आपणास ओळखण्याची इतरांची लायकी नसते.आपण
जिथे नालायक आहोत तिथे दोन पावले मागे
राहिले म्हणजे नालायक ठरत नाहीत.
मोर नाचतो म्हणून लांडोराने नाचू नये.आपली
लायकी इतरांनी ओळखण्याची वाट बघत बसू
नये.स्वत:ची लायकी ओळखता आली पाहिजे.
आणि ती सिद्ध करता आली पाहिजे.इतरांनी
घोड्यावर बसवून घोडेस्वार होता येत नसते.
कोणतीही कार्य उत्तम होण्यासाठी लायकीची
माणसे लागतात.संत वचन आहे,'इथे पाहिजे जातीचे,येरागबाळ्याचे काम नव्हे.'
आपण आपल्या कामात अधिक योग्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.अनेक कामात
लायक असले पाहिजे आणि ज्या कामात
नालायक आहोत त्यामध्ये नाक खुपसण्याचा
नालायकपणा जर नाही केला तर ती एक लायकी ठरु शकते.
आपण अधिक लायक बनण्याचा प्रयत्न करुया !
ना.रा.खराद,अंबड
