*तीन रुम किचनचा एखादा फ्लॅट, दोन चार एकरचे फार्म हाऊस एखादी चार चाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो, "अमक्या- तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं !"*
*म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय. पण सुखी काही दिसत नाही!*
*आपणचं म्हणतो की, आमच्या लहानपणी खूप मजा यायची. खूप करमायचं, घर भरलेलं असायचं. दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही!*
*मग आता काय झालं ?*
*मजा कुठ गेली?*
*एकटं एकटं का वाटतं ?*
*छातीत धडधड का होते ?*
*कशामुळे करमत नाही ?*
*कारण...*
*विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठेतरी चुकली.* *विश्व निर्माण करणं म्हणजे…*
*नाती गोती जपणं*
*छंद जोपासणं*
*पाहुणे होऊन जाणं*
*पाहुण्यांचे स्वागत करणं*
*खूप गप्पा मारणं*
*घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं खळखळून हसणं*
*आणि*
*काळजातलं दुःख सांगून* मोकळेपणाने *रडणं !!!*
*या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर”शून्यातून विश्व निर्माण केलं ” असं म्हणावं.*
*तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली ….. *???*
*तुमचं खर दुःख तुम्ही मोकळेपणाने किती जणांना सांगू शकता *????*
*असे किती मित्र , शेजारी , नातेवाईक आपण निर्माण करू शकलो… *???*
*खूप कमी , किंबहुना नाहीच...*
*"!!! मग आपण ” विश्व निर्माण ” केलं का *???*
*तर नाही….*
*मित्र हो ,*
*रजिस्ट्री च्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व…* *????*
*भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व … *???*
*"लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व….. *????*
*मुखवटा घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व…… *????*
*नाही !!*
*हे समजून घ्यावं लागेल,*
*मोठं बनण्याच्या दडपणा मुळे आणि मग कामाच्या व्यापा मुळे नाती दूर जाणार* *असतील.....इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि* *अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील…...दुःख* *सांगायला , मन हलकं करायला जागाच उरणार नसेल...*
*तर…..*
*आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, की विश्वातून शून्य?*
*वाचा,विचार करा,अहंकार सोडा, माणूसकी जपा. इतरांच्या कामी या.सोबत काहीचं येत नाही.*
*🙂मी वाचलेला एक सुंदर विचार.*👆
🌹👏🌹 🌹👏🌹
