विद्यार्थी जीवन
जीवनाचा सुरुवातीचा काळ 'विद्यार्थी जीवन' असतो.जीवनाची पायाभरणीचा हा काळ असतो.जगण्याची तयारी या काळात केली जाते.विद्या ग्रहन किंवा प्राप्त करण्यासाठी आयुष्याचा काही काळ खर्ची घालावा लागतो.पात्रता प्राप्त करण्याचा हा महत्त्वाचा काळ असतो.या दशेत दिशा मिळत असते.
गुरुजन व वडीलधारी मंडळी मार्गदर्शन करत असतात.आपल्या अनुभवाची शिदोरी वाटप करत असतात.विनम्रपणे स्विकारत पुढील वाटचाल करावयाची
असते.
या काळात बहुतेक वेळ शाळा, महाविद्यालय ,शिक्षक, मित्र यांच्या सानिध्यात जातो.जीवनाचा हा अत्यंत मोलाचा काळ असतो.या संधीचे सोने करता आले पाहिजे.जिज्ञासू वृत्ती असल्याखेरीज नवीन शिकायला
मिळत नसते.अंगी नम्रता असल्याशिवाय कुणी माहिती
देत नसते.सतत शिकण्याचा ध्यास असेल तर आयुष्यभर
पुरुन उरेल इतके कमावता येते.
पुस्तक रुपाने ज्ञानाचा खजिना ग्रंथालयत उपलब्ध असतो.विद्यार्थ्यांची पाऊले सतत ग्रंथालयाकडे वळली
पाहिजे.पावलांना वळण लावण्याचा हा काळ असतो.
विद्यार्थी स्वावलंबी असला पाहिजे.स्वत:ची सर्व कामे
स्वतः करणारा पाहिजे.या वयातील सवयी पुढे कायम राहतात.आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनले पाहिजे.
या वयात मैत्रीचा निखळपणा जपला पाहिजे, मित्र कमावले पाहिजे.मित्रांसी कधीच द्रोह करु नये.या वयातील मित्र हे आयुष्यभर पुरतात.विद्यार्थी जीवनात
इतरांसोबत राहण्याचे कौशल्य प्राप्त होते, पुढे सामाजिक
जीवनात त्याचा उपयोग होतो.या वयात अंगी असलेली
कला जोपासली गेली पाहिजे.पुढे 'कलाकार' म्हणून नाव
कमावता आले पाहिजे.
अनेक लहान लहान गोष्टीं शिकता आल्या पाहिजेत.विद्यार्थी जीवन म्हणजे शिकण्याचा काळ, खुप
काही शिकले पाहिजे.जीवनाची भक्कम इमारत उभारायची असेल तर विद्यार्थी जीवन मजबूत केले पाहिजे.ज्ञान कणाकणाने मिळवावे लागते.मिळेल तेथून
मिळेल ते घेता आले पाहिजे.
विद्यार्थी आळसी असू नये.आळसाने कार्यभार बूडतो.
विद्यार्थी तत्पर, उत्साही असला पाहिजे.जोमाने कामाला
लागला पाहिजे.विद्यार्थी विवेकी असावा,खुळचट गोष्टींचे
उच्चाटन केले पाहिजे.गुरुजनांचा आदर करुन ,त्यांचे आशीर्वाद मिळवले पाहिजेत.आई वडीलांच्या कष्टाची आणि प्रेमाची जाणीव ठेवली पाहिजे.योग्य तो मानसन्मान देता आला पाहिजे.
शरीराच्या मजबूतीचा हा काळ असतो.पोहणे वगैरे या
वयात शिकून घेतले पाहिजे.शरीर बळकट आणि निरोगी
राखता आले पाहिजे, त्यासाठी थोडासा व्यायाम केला पाहिजे.
विद्यार्थी जीवनात व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.या वयात जडलेले व्यसन आयुष्यभर सूटत नाही, आयुष्य
उद्ध्वस्त करु शकते.व्यसनाने आत्मनाश होतो.धुम्रपान
करु नये.नशेचे पदार्थ सेवन केल्याने आरोग्य धोक्यात
येते, आयुष्याचे मातेरे होते.
ध्येय निश्चित करण्याचा हा काळ असतो, त्यासाठी कष्टाची तयारी हवी.स्वप्न बघुन पूर्ण होत नाहीत, त्यासाठी
झोप उडाली पाहिजे.झपाटून गेले पाहिजे.
ना.रा.खराद
