[12/04, 05:42] N.R. kharad: आयुष्याची प्रश्नपत्रिका
आपले आयुष्य म्हणजे प्रश्नांची मालिकाच आहे, कितीही प्रश्न सोडवले तरी नवीन प्रश्न समोर येतात.आयुष्य प्रश्न सोडविण्यासाठीच असते,असेच वाटू लागते.आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेचे प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण आयुष्य इतका वेळ असतो , परंतु कोणते प्रश्न
महत्वाचे हे आपण ठरवायचे असते.
काही प्रश्न जन्मासोबतच असतात,काही इतरांनी निर्माण केलेले असतात तर काही आपण स्वतः च निर्माण केलेले असतात.
या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न तातडीने सोडवायचे
असतात, पर्याय असलेले प्रश्न सोडवणे सोपे जाते.मरेपर्यंत देखील न सूटणारे प्रश्न असतात.
आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेचे किमान प्रश्न तरी सोडवता आले पाहिजेत.
कधीकधी एखादा सोपा प्रश्न सोडवता येत नाही.
अनेक उत्तरे वेळ संपल्यावर सुचतात.आयुष्याची
प्रश्नपत्रिका प्रत्येकाची वेगळी असते , त्यामुळे
नक्कल करता येत नाही.
आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेचे काही प्रश्न 'एका वाक्यात उत्तरे द्या' अशा स्वरूपाची असतात.
हि उत्तरे फार जपून द्यायची असतात.ती वस्तूनिष्ठ असतात,चूकीला माफीच नसते.एका
चुकीच्या उत्तराने अनेक प्रश्न निर्माण होतात.
एका वाक्यात जो प्रश्न सुटतो तिथे दोन वाक्यामुळे उत्तर चुकत असते.अचुकता हे सुत्र
हवे.वाक्य एक असले तरी ते अचुक असावे लागते.
आयुष्यात योग्य जोड्या जुळवणे हे एक कसब
असते.जुळवतात सगळेच पण योग्य जुळवणीवर यश अवलंबून असते.घाईने जुळवलेले चुकण्याची शक्यता असते.योग्य जोड
लावणे हा प्रश्न वाटतो तितका सोपा नसतो.जोडी चुकली की गोडी संपली.आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेचा हा आयुष्याचा
प्रश्न असतो.
रिकाम्या जागा भरण्यासारखे अनेक प्रश्न असतात.उत्तर नसले की कायम रिकाम्याच राहतात.मागचे पुढचे संदर्भ कळल्याशिवाय ही
जागा भरता येत नाही.चुकीच्या उपायाने दोन अजून दुरावतात.
आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत ,'कारणे द्या' हा प्रश्न
फार भेडसावतो.काहीही करा त्याची कारणे
विचारली जातात,ती पटली तर ठीक नसता फार
नुकसान सोसावे लागते.ही उत्तरे बरोबरच असावीत असे नसते परंतु बरोबर वाटावीत अशी असावीत.हा प्रश्न सोडवावाच लागतो,कारण कारणाशिवाय काहीच नसते असे
समजले जाते.
'नको ते खोडा' हा प्रश्न आयुष्य पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असतो.आयुष्यामध्ये नको असलेले खुप काही असते ते खोडण्याचे
काम करावयास हवे.नको ते खोडल्याविना हवे
ते लाभत नाही.नको असलेले बाजुला सारता
आले पाहिजे.नको ते वर आले की हवे ते खाली
राहते, म्हणून वेळीच त्याचा बंदोबस्त केला
पाहिजे.नको त्यापासून दूर राहिले पाहिजे.
आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत ,'योग्य पर्याय निवडणे '
हा प्रश्न कसोटीचा असतो.जिथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तिथे योग्य पर्याय निवडणे हे
जोखमीचे काम असते.निवडीचे स्वातंत्र्य असले
तरी निवड चूकू शकते.निवड चुकली की परवड
झाली समजा.सारखे वाटणारे अनेक पर्याय असतात पण ते सारखे नसतात.त्यामधील सुक्ष्म
फरक ज्यास कळतो तोच हा प्रश्न सोडवू शकतो.
चुकीचा पर्याय फार मोठी चूक ठरते.
आयुष्याची वेळ संपते, काही प्रश्न अनुत्तरित राहतात.या परीक्षेचा निकाल मृत्यूनंतर घोषित
होतो ,जो बघायला आपण नसतो.
ना.रा.खराद
[12/04, 05:48] N.R. kharad: लबाड लांडगे
समाजात खुप लोक लबाडी करतात,इतरांची फसवणूक करतात.काहींची लबाडी उघडी पडते तर काही ती लपवण्यात यशस्वी होतात.लबाड लोक फार ढोंगी असतात,ढोंगीपणामुळे त्यांना ओळखणे सोपे नसते.
लबाडी करणारी माणसे सर्व क्षेत्रात असतात,लबाडीच्या बळावर घबाड मिळवलेले असतात.
उद्योग, व्यापार, व्यवसायामध्ये तर लबाडी कौशल्य समजले जाते.नोकरी तर लबाडीनेच टिकून असते.राजकारण तर त्याशिवाय होतच नाही.फसवणूक करणे म्हणजे लबाडी, खालपासून वरपर्यंत बिनदिक्कत
चालणारी गोष्ट असते लबाडी.सर्वच करत असल्याने ती
सर्वमान्य असते.
चोरी ही लबाडीची सख्खी बहिण असते.चोरी लबाडीने व
लबाडी चोरीने साधली जाते.लबाडाचे घबाड दिसून येते.
खोटेपणा लबाडीसाठी आवश्यक कौशल्य आहे, जितके
चांगले खोटे बोलता येईल तितकी लबाडी साफल्य होते.
लबाडाच्या मागे खुप समर्थक असतात,अनुयायाशिवाय
लबाडी फळाला येत नाही.
लबाड पाताळयंत्री असतात, आपले मनसुबे जगाला कळू
देत नाहीत.साधे,सरळ,सज्जन लोक त्यांचे शिकार असतात.
लबाड आश्वासने देण्यात पटाईत असतात, इतरांना झुलवत ठेवणे त्यांना चांगले जमते.तत्वहीन असल्याने
कोणत्या वेळी काय करतील ह्याचा नेम नसतो.जिथे लबाडाची दृष्टी पडते तिथे काहीतरी विपरीत घडतेच.
लबाडाचा मेंदू राक्षसाचा असतो,तो सतत नवनवीन शक्कल लढवत असतो.
लबाड हा स्वार्थी असतो, आपल्या फायद्यासाठी इतरांचा वापर करतो.तो धोकेबाज असतो, कोणत्या वेळी धोका देईल सांगता येत नाही.
लबाडाचे दूकान लहान आणि मकान मोठे असते.लबाडांना मध्यस्थी फार आवडते.दलालीचा धंदा
ते उत्तम करतात.दोन्हींचा पैसा खाता येते हे लबाडीशिवाय शक्य नसते.
लबाडाची वाणी मधुर असते.त्याचे ऐकावेसे वाटते कारण
त्याने लोकांना ओळखलेले असते.विश्वास संपादन केल्याशिवाय लबाडी करता येत नाही.दलाली लबाडीचे यश आहे.
लबाडाच्या तावडीत सापडणे धोक्याचे असते,लबाडावरचा विश्वास मूर्खपणा ठरतो.
लबाडी आपण तर करुच नये आणि इतरांच्या लबाडीपासून सावध असावे.
ना.रा.खराद
[12/04, 08:23] N.R. kharad: स्वाभिमान
- ना.रा.खराद
स्वाभिमान हा माणसातील सर्वोच्च गुण आहे.स्वाभिमानी असणे म्हणजे लाखात एक असणे होय.अत्यंत गरीब व्यक्तीहीस्वाभिमानी असू शकते तर अत्यंत श्रीमंत स्वाभिमानी नसू
शकते.स्वाभिमानी कुणापुढे हात पसरत नाही.कुणाच्या कृपेने त्यास काही मिळवायचे नसते.अकारण कुणाची स्तुति किंवा निंदा तो
करत नाही.स्वाभिमानी व्यक्ती स्वत्वाचा आदर करते.स्वत:ला कमी लेखत नाही.लाचारीची भाषा करत नाही.नम्रता बाळगूनअसतेपरंतुभयानेझूकतनाही.गरीबीतही इज्जतीने जगते.फायद्यासाठी कुणाच्या मागे धावत नाही.
स्वाभिमानी व्यक्ति सगळे गमावू शकते परंतु स्वाभिमान नाही.अशा व्यक्तिला नमवणे सोपे
नसते.लाचार,हूजरे लोक स्वाभिमानी व्यक्तिचा तिरस्कार करतात.स्वाभिमानी व्यक्ती नीडर असते.मोडेल पण वाकणार नाही अशा बाण्याची ही माणसे असतात.स्वाभिमानी व्यक्तीला फूकटचे काही
नको असते.कष्टाची भाकरी खाणे त्यास आवडते.स्वाभिमानी व्यक्ति लालची नसते,कपटी नसते.सडतोड असते.असली व्यक्ति दब्बू नसते.स्वार्थासाठी कुणाच्या चपला उचलणे ते कदापि करु शकत नाही.
त्यांचा करारी बाणा असतो.इतरांच्या सन्मानाची त्यास गरज नसते.स्वत:चा सन्मान
करणे हाच खरा सन्मान असतो तोच खरा
स्वाभिमान असतो.
जिथे अनादर होतो तिथे स्वाभिमानी व्यक्ति जात नसतो.कुणाच्या मागेपुढे फिरणे त्यास जमत नाही.ताटाखालचे मांजर तो होऊ शकत नाही.कुणाचे उपकार त्यास नको असतात.स्वाभिमानी व्यक्ति स्वतंत्र विचारांची
असतात.भाऊगर्दीत सामिल होणे त्यास पटत
नाही.स्वाभिमानी व्यक्ति उणे बोलणेे सहन करु शकत नाही.उपमर्द केला तर खपवून घेत
नाही.जिथे मान नाही तिथे जात नाही.
कुणाकडून काही अपेक्षा बाळगत नाहीत.
फूकटचे काहीच नको असते.स्वार्थासाठी कुणाची आरती ओवाळणे त्यांच्या रक्तात नसते.इज्जत प्राणापेक्षा प्रिय असते.खरेपणा हा या व्यक्तिचा स्वभाव असतो.ज्याच्याकडे
स्वाभिमान आहे,त्यांच्याकडे सर्वकाही असल्यासारखे आहे.स्वाभिमान नसेल तर सर्वकाही असून नसल्यासारखे आहे.
