मित्रांनो आपल्या भारत देशात आजपर्यत अनेक महापुरुष,समाजसेवक,समाजसुधारक होऊन गेले आहेत.अण्णाभाऊ साठे देखील अशाच काही थोर समाजसुधारकांपैकी एक आहे.
मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक तर होतेच याचसोबत ते एक साहित्यिक,लेखक,कांदंबरीकार,देखील होते.
अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी,कथा,व्यतीरीक्त पोवाडा,लावणी अशा इत्यादी विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले आहे.
अण्णाभाऊंचे पुर्ण नाव हे तुकाराम भाऊराव साठे असे आहे.त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडे रचले म्हणुन त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते.
याचसोबत त्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवणावर चरित्रलेखन देखील केले.ज्याचे पुढे जाऊन त्यांनी रशियन भाषेमध्ये देखील रूपांतरण केले.
ज्या जमातीवर ब्रिटीश राजवटीच्या काळात अपराधी म्हणुन शिक्का मारण्यात आला होता अशा घराण्यात अण्णाभाऊंचा जन्म झाला.
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट रोजी सांगली जिल्हयामधील वाळवा नावाच्या तालुक्यात असलेल्या वाटेगाव ह्या छोटयाशा गावी एका आदीवासी मांग कुटुंबात झाला.
अण्णाभाऊ साठे यांना आर्थिक परिस्थिति मुळे त्यांचे शालेय शिक्षण पुर्ण करता आले नव्हते.तरी देखील त्यांना अक्षराची ओळख होती.म्हणजेच वाचता यायचे.
अण्णाभाऊ साठे यांना आपण पोवाडे लावणी रचणारा शाहीर म्हणुन ओळखतो पण पोवडया व्यतीरीक्त अण्णाभाऊंनी अनेक उत्कृष्ट कादंबरी कथांचे देखील लेखन केले आहे.
अण्णाभाऊ यांनी त्यांच्या साहित्यिक जीवणात आत्तापर्यत 20 पेक्षा अधिक ग्रंथ अणि 25 पेक्षा अधिक कांदंबरया लिहिल्या.
अण्णाभाऊंनी लिहिलेल्या काही कादंबरींवर चित्रपट देखील तयार करण्यात आले आहेत.
फकिरा ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी ज्यात त्यांनी मांग समाजाचे जीवन चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.
या कादंबरीचा मुख्य नायक फकिरा हा मांग समाजातील शुर व्यक्ती असतो जो दुष्काळात ब्रिटीश राज्यकर्त्यांना लुटतो अणि तीच लुटलेली संपत्ती चोरलेले अन्न गरीबांना वाटुन देतो.
त्यांच्या ह्या कांदबरीस राज्य शासनाकडुन सर्वोत्कृष मराठी कादंबरी म्हणुन गौरविण्यात तसेच सम्मानित करण्यात आले होते.
माझा रशियाचा प्रवास हे प्रवासवर्णन देखील अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले आहे.
अण्णाभाऊंनी त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक साहित्य प्रकारातुन सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी त्यांच्या रचलेल्या सर्व लावणी,पोवाडया मार्फत कष्टकरी जनतेच्या जीवणात सुधारणा घडवून त्यांना प्रेरीत करण्याचा प्रयत्न केला.म्हणून जगाने त्यांनी लोकशाहीर ही उपाधी दिली.
स्वातंत्र्याच्या आधी तसेच स्वातंत्रयानंतर देखील अण्णाभाऊ साठेंनी अनेक महत्वाच्या राजकीय प्रश्नांच्या बाबतीत महाराष्टामध्ये जनजागृती देखील केली.
अण्णाभाऊ साठे यांनी तमाशा ह्या लोककलेस लोकनाटय असा दर्जा प्राप्त करून दिला.
भारत देशाला स्वातंत्रय मिळवून देण्याच्या कार्यात अण्णाभाऊ साठे यांचे देखील विशेष योगदान होते.त्यांनी संयुक्त महाराष्ट चळवळीतुन तसेच गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांचा विशेष सहभाग होता.
अण्णा भाऊ साठे यांची वैजयंती ही कादंबरी ज्या स्त्रिया तमाशामध्ये पहिल्यांदा काम करीत आहे त्यांचे लोकांकडुन कसे शोषण करण्यात येते हे चित्रित करते.
अण्णाभाऊ साठे यांंनी माकडाची माळ ह्या कादंबरीतुन भटक्या विमुक्त जातीचे जीवण चित्रण केले आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नाव वालुबाई अणि वडिलांचे नाव भाऊराव असे होते.अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई अणि तिच्या निधनांनंतर त्यांनी जयवंता हिचेशी विवाह केला.
अण्णाभाऊ साठे यांच्या मुलाचे मधुकर असे होते अणि मुलींचे नाव शांता तसेच शकुंतला असे होते.
अण्णाभाऊ साठे जेव्हा त्यांच्या वडिलांसमवेत लहान असताना मुंबई मध्ये गेले तेव्हा तिथे त्यांनी गिरणीत झाडु मारणे कोळसे वेचणे असे मिळेल ते काम केले.
शेवटी अण्णाभाऊ ह्या थोर समाजसुधारकाचा,लोकशाहीर तसेच साहित्यिकाचा अखेरीस 1969 मध्ये 18 जुलै रोजी मृत्यु झाला.
अण्णा भाऊंच्या लिहिलेल्या प्रसिदध कादंबरीची नावे –
1)फकिरा
2) वैजयंता
3) माकडाची माळ
4) वारणेचा वाघ
5) आबी
अण्णा भाऊंनी लिहिलेले प्रसिदध कथासंग्रह –
1)खुळवाडा
2) कृष्णा काठच्या कथा
3) निखारा
4) पिसाळलेला मनुष्य
5) गजाआड
अण्णाभाऊंनी लिहिलेले प्रवासवर्णन
1)माझा रशियाचा प्रवास
अण्णाभाऊंनी लिहिलेल्या प्रसिदध कविता –
1)माझी मैना राहिली गावावरी
2) मुंबईमध्ये उंचावर
