अयोध्या प्रकरणी श्री. श्री. रविशंकरांचा प्रयत्न ठरू शकतो मैलाचा दगड - फिरोज खान
श्री श्री रविशंकर यांचा विश्वशांती साठी स्वतःचा असा अभ्यास आहे सखोल चिंतन आणि मनन करूनच त्यांनी जगभरातील अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. जगभरातील लोक शांती स्थापनेसाठी त्यांच्या कडून मार्गदर्शन घेत आहेत.त्या मुळेच अयोध्या प्रकरणी श्री श्री रविशंकर यांचे प्रयत्न मैलाचा दगड ठरू शकतो असा विश्वास "आर्ट ऑफ लिविंग" मागील बारा वर्षा पासून असलेले प्रशिक्षक योगाचार्य फेरोज खान यांनी पुढारी शी बोलताना व्यक्त केला.
या विषयी बोलतांना फेरोज खान म्हणाले की, एखाद्या घटनेचे विश्लेषण करत असताना आपल्या पूर्वग्रहदूषित सिद्धांता नुसार आपल्या सोयीचा निष्कर्ष काढायचा अशी सवयच काही भारतीय राजकारण्यांना झालेली दिसते. अश्या प्रकारच्या निष्कर्षांतून योग्य दिशा मिळेल अशी अपेक्षाच फोल ठरते.
श्री श्री रविशंकरजी यांच्या शांती आणि एकते साठी चाललेल्या प्रयत्नांवर राजकारण्यांनी दिलेली प्रतिक्रिया अशीच वाटते.
श्री श्री रविशंकर यांचा विश्वशांती साठी स्वतःचा असा अभ्यास आहे सखोल चिंतन आणि मनन करूनच त्यांनी जगभरातील अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. जगभरातील लोक शांती स्थापनेसाठी त्यांच्या कडून मार्गदर्शन घेत आहेत.
प्रज्ञावंत असलेले लोक देखील त्यांच्या प्रयत्नांवर शंका घेत नाही. मात्र काही राजकारणी आपल्या राजकारणासाठी त्यांच्या शांती साठी चाललेल्या कार्यावर नकारात्मक बोलतांना दिसतायेत.
श्री श्री रविशंकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधी जातीयवादी भाष्य केले नाही. तर नेहमीच मानवाच्या सर्वगुनाचा विकास करून 'वसुधैव कुटुंबकम ' ची शिकवण या जगाला दिली. जे काही कार्य सुरू केले ते जगातील सर्व मानव जाती साठी सुरू केले.
पण काही लोकांची त्यांच्या विषयीची मते भन्नाट मनोरंजन करणारी दिसतात जी समाजाची दिशाभुल करण्यासाठी असतात.
एखाद्या समाज घटकाचा विकास करायचा असेल तर अनेक मार्ग आहेत. आज युवकांना शिक्षण व रोजगार मिळवून देण्यासाठी काही संस्थात्मक , विधायक काम उभे करण्याची गरज आहे जेणे करून युवकांचा विकास होईल व भारत महासत्ता बनेल.
अयोध्या प्रकरणी श्री श्री चा प्रयत्न अगदी स्तुत्य आहे. शांतीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी सर्व भारतीय त्यांना साथ देतील अशी अपेक्षा आहे.
आत्ता पर्यंतचा इतिहास पाहता श्री श्री नी जे प्रश्न हाती घेतले ते शांती पूर्वक सोडवलेले आहे.
चांगल्या कार्यासाठी काही लोकांचा विरोध नेहमीच गृहीत धरावा लागतो. फक्त आपली दिशाभूल होणार नाही याची काळजी घेत आपण राजकीय बळी न पडता त्यांच्या प्रयत्नांना साथ द्यावी असे वाटते . पूर्वग्रहदूषित न होता प्रामाणिकपणे त्यांच्या प्रयत्नांवर अभ्यास करणे आवश्यक आहे इतकीच अपेक्षा.

