आमच्या बद्दल (About Art of Living in Marathi)
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था १९८१ मध्ये स्थापन केली. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक शैक्षणिक व मानवहितकारी चळवळ आहे, जी तणावमुक्ती आणि सेवा उपक्रमांमध्ये अविरत कार्यरत आहे. ही संस्था जागतिक स्थरावर १५२ पेक्षा देशांमध्ये सक्रिय असून त्यांनी ३७ कोटीहून अधिक लोकांच्या आयुष्यात बदल घडवला आहे.
“जोपर्यंत आपले मन तणावमुक्त आणि समाज हिंसा मुक्त होत नाही, तो पर्यंत आपल्याला विश्व शांती मिळविता येणार नाही”, या श्री श्रींच्या शांतता तत्वाला अनुसरून सर्व कार्यक्रमांना दिशा मिळते. प्रत्येक व्यक्तीला तणावापासून मुक्ती आणि मन:शांती अनुभवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने तणावमुक्तीचे कार्यक्रम सुरु केले आहेत. यात श्वसन प्रक्रियेसह ध्यान आणि योगासनांचा समावेश आहे. या कार्यक्रमांमुळे जगभरातील कोट्यावधी लोकांना तणाव, नैराश्य आणि हिंसक मनोवृत्तीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चळवळीने सर्व सामाजिक स्तरांमध्ये सेवा कार्याच्या माध्यमातून शांतता पसरवली आहे. ज्यामध्ये तंटामुक्ती, नैसर्गिक आपत्ती निवारण, स्त्री सबलीकरण, सर्वशिक्षा अभियान आणि निसर्ग संवर्धन अश्या उपक्रमांचा समावेश आहे.
संलग्न संस्था :
आर्ट ऑफ लिव्हिंगच्याच काही संलग्न संस्थांनी देखील तणावमुक्त आणि हिंसामुक्त जगाच्या दिशेने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्या म्हणजे दि इंटरनॅशनल असोशिएशन फॉर ह्युमन व्हॅलूज (IAHV), वेद विज्ञान महाविद्यापीठ (VVMVP), श्री श्री रविशंकर विद्यामंदिर (SSRVM), व्यक्ती विकास केंद्र इंडिया (VVKI), श्री श्री रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (SSRDP) आणि श्री श्री इंस्टीट्युट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस अँड टेक्नोलॉजी ट्रस्ट (SSIAST) जागतिक पातळीवरील आर्ट ऑफ लिव्हिंग विविध सेवाभावी उपक्रमांचे नियोजन आणि अमलबजावणी या संस्थांव्दारे होते.
संघटनेची रचना :
आर्ट ऑफ लिव्हिंग ही स्वयंसेवकांद्वारे कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी बहुमुखी संस्था आहे. तिचे आंतरराष्ट्रीय केंद्र भारतात बंगळूरू येथे आहे. अमेरिका आणि जर्मनी येथे १९८९ साली स्थापन झालेली ही संस्था जागतिक स्तरावर आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन या नांवाने कार्यरत आहे. तेव्हापासून जगभर स्थानिक केंद्रे सुरु झाली आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या रचनेत दोन वर्षे कालावधी असणारे विश्वस्त मंडळ असते. दर दोन वर्षांनी दोन तृतीयांश विश्वस्त बदलले जातात. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व शिक्षकांना व विश्वस्तांना नवीन मंडळ नेमण्याचा अधिकार आहे. संस्थेच्या कारभारावर देखरेख करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी एका सल्लागार मंडळाची तरतूद केलेली आहे. बाह्य हिशेब-तपासणीसाकरवी सर्व हिशेब नियमितपणे तपासले जातात.विश्वस्तांना प्रत्यक्ष खर्चाव्यतिरिक्त कोणताही लाभ (पगार,मानधन इ.) मिळत नाही. मानवहितकारी सेवा उपक्रमांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमांच्या उत्पन्नातून थेट निधी उपलब्ध होतो. त्याच प्रमाणे आर्ट ऑफ लिव्हिंग प्रकाशने व आयुर्वेदीक उत्पादने यांच्या विक्रीतील निधी देखील सामाजिक उपक्रमांकडे वळविला जातो.
सदस्यत्व :
CONGO काँगो (कॉन्फरन्स ऑफ एनजीओज इन कन्सल्टेटीव स्टेट्स विथ इकोसोक ऑफ दि युनायटेड नेशन्स), जिनिवा व न्यूयॉर्क.इंटरनॅशनल अलायन्स अगेन्स्ट हंगर.युएन मेन्टल हेल्थ कमिटी अँड युएन कमिटी ऑन एजिंग, न्यूयॉर्क.इंटरनॅशनल युनियन फॉर हेल्थ प्रमोशन अँड एज्युकेशन, पॅरीस.एनजीओ फोरम फॉर हेल्थ, जिनिवा.
खालील ठिकाणी आर्ट ऑफ लिविंग-दिवस साजरा केला जातो :
लुईझियाना मध्ये ह्युमन व्हॅल्युज वीक : २३ फेब्रुवारी २००७.बाल्टिमोर मध्ये ह्युमन व्हॅल्युज वीक : २५ मार्च ते ३१ मार्च २००७.कोलंबिया मध्ये ह्युमन व्हॅल्युज : मार्च २००७.सीराक्यूज मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग स्थापना दिवस : ७ मे २००४.
