श्री श्री रविशंकर हे अध्यात्मिक क्रांतीचे प्रणेते - फिरोज खान
21 वे शतक हे विज्ञानाचे शतक आणि या शतकात विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगळ घालून जगाला शांतीचा संदेश देणारे श्री श्री रविशंकर यांचे जीवन एखाद्या दिपस्तंभा प्रमाणे तेज: पुंज आहे. मागील 37 वर्षा मध्ये त्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली.
१३ मे १९५६ रोजी श्री श्री रविशंकर यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील पापनाशम या गावी झाला . वयाच्या १६ व्या वर्षी आधुनिक विज्ञान मध्ये त्यांनी पदवी मिळवली. १९८१ मध्ये त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेची स्थापना केली. " जो पर्यंत आपले मन तणावमुक्त आणि समाज हिंसामुक्त होत नाही , तो पर्यंत आपल्याला विश्वशांती मिळविता येणार नाही "
या श्री श्री च्या शांतता तत्वाला अनुसरूनच सर्व कार्यक्रमांना दिशा मिळते. तत्वज्ञाने जग कसे आहे हे केवळ सांगायचे नसते तर ते बदलून दाखवायचे असते हा विचार श्री श्री नी खरा करून दाखवला . श्री श्री चे सारे जीवन एका ज्ञानयात्रेने संपन्न आहे. ही ज्ञानयात्रा सत्याचा शोध घेणारी आहे. सुदर्शन क्रियेचे ज्ञान प्राप्त करून त्यांनी उभ्या जगाला सत्याचा प्रकाश दाखविला. श्री श्री प्रेम आणि शांतीचा संदेश देत जगभर प्रवास करत आहे. ते आत्मोद्धारा सोबतच जवाबदारीची जाणीव करून देतात. श्री श्री चा हा प्रेम मार्ग ज्ञान, भक्ती आणि कर्माने भरलेला आहे आणि हा मार्ग भारतालाच नव्हे तर उभ्या जगाला परिवर्तनाचा संदेश देणारा ठरत आहे.
शतकानुशतके अंधारात असलेल्या आणि दैन्य दारिद्य्र याशी झुंज देणाऱ्या हजारो युवकांच्या जीवनात योग आणि उद्योग च्या माध्यमातून अपूर्व अशी समाज क्रांती घडविणारे श्री श्री हे अग्रदूत ठरत आहे. केवळ सामाजिक व आर्थिक विषमताच चिंताजनक नसते तर सांस्कृतिक विषमता सुद्धा तेवढिच गंभीर आहे हे लक्षात घेऊन विश्व सांस्कृतिक मोहत्सवाचे आयोजन करून सांस्कृतिक क्रांतीचा मंत्र श्री श्री नी या जगाला दिला.
आर्ट ऑफ लिविंग ही स्वयं सेवकांद्वारे कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी बहुमुखी संस्था आहे. तिचे आंतरराष्ट्रीय केंद्र भारतात बंगळूरू येथे आहे . अमेरिका आणि जर्मनी येथे 1989 साली स्थापन झालेली ही संस्था जागतिक स्तरावर सेवा कार्य करते. आज भारतात श्री श्री च्या प्रेरणेने अनेक नदया पुनर्जिवीत करण्यात आल्या आहेत. गावो गावी व्यसनमुक्ती चळवळ उभी राहिली आहे. महिला सबलीकरणाचे कार्य सुरू आहे. मुलांच्या शिक्षणासाठी
465 शाळा स्थापन करून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य अविरत सुरू आहे.
खरंच श्री श्री रविशंकर तरुणांचे प्रेरणास्रोत आहेत, जेष्ठांचा आधार आहे तर संपूर्ण जगासाठी प्रेमाचे प्रतीक आहे. अश्या या युगप्रवर्तकाला कोटी - कोटी प्रणाम.
