२०१८ मधील संग्रहातून
🚹🚺🚼🚻🚹🚺🚼🚻🚹🚺🚼🚻🚹🚺🚼🚻🚹
आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त खास 🤸🏻♂🤸🏻♀
गुरुदेवांचे प्रबोधन
गुरुदेव श्री श्री रवि शंकर सांगतात की योग जरी भारतात प्रथम उदयास आला तरी त्यावर संपूर्ण मानवजातीचा हक्क आहे.
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न: योग ह्या शब्दाकडे प्रत्येकजण वेगवेगळ्या अर्थाने, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. काहीजण म्हणतात योग म्हणजे आसन. काहीजणांना योग हा एक अध्यात्मिक मार्ग वाटतो. तर काहीजण योग आरोग्यदृष्ट्या कसा फायदेशीर आहे या विषयी बोलतात. म्हणून, तुमच्या मतानुसार योग म्हणजे काय हे कृपया समजावून सांगाल का गुरुदेव?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर
योग म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम किंवा आसन करणे नव्हे. योग हे एक संपूर्ण शास्त्र आहे. शरीर, मन, आत्मा आणि ब्रह्माण्डाला एकत्र करण्याचे काम योगामुळे होते. प्रत्येकाला अत्यावश्यक असलेली शांत-प्रशांत अवस्था केवळ योगामुळेच मिळू शकते. आपले आचरण, आपली वैचारिक पद्धत आणि आपली वृत्ती-प्रवृत्ती यामध्ये योग केल्याने बराच फरक पडतो. माझ्यामते योग प्रत्येकाने करणे अनिवार्य आहे, त्याला पर्याय नाही. तुम्हाला जर सदाचारी, संवेदनशील, विनम्र, सशक्त आणि अंतर्ज्ञानी व्हायचे असेल तर तुम्हाला योग करण्याची सवय व शिस्त लावून घ्यावीच लागेल.
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न: काहीवेळा लोक योगाच्या रहस्यमय तत्त्वांबद्दल बोलतात. काय आहे हे रहस्यमय तत्त्व?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
रहस्य जर उलगडून सांगितले तर ते रहस्य रहात नाही, ती एक अनुभवण्याची गोष्ट आहे. रहस्यात्मक गोष्टी आपल्या जीवनात चैतन्य आणतात, तुमचे जीवन प्रेमाने भारावून टाकतात. यातून जी ऊर्जा मिळते ती आपल्याला संपूर्ण आयुष्यभर पुरते.
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न: ध्यानधारणा हा योगाचाच एक भाग आहे का?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
ध्यानधारणा हा नक्कीच योगाचा एक भाग आहे, एक पैलू आहे. योग ध्यानावस्थेतच करणे आवश्यक आहे. तसे नसेल तर तो केवळ एक शारीरिक व्यायाम होईल.
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न: भगवद् गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की 'योगः कर्मसु कौशलम्'. याचा अर्थ काय?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
याचा अर्थ असा आहे की योग म्हणजे कर्मातील, क्रियेतील कौशल्य. योग आणि कौशल्य समानार्थी आहेत. तुम्ही जर एखादी क्रिया कौशल्याने करत असाल तर त्याचा अर्थच असा आहे कि 'तुम्ही योगाचा सिद्धांत पाळत आहात'. तुम्ही जर योग, प्राणायाम, ध्यानधारणा करत असाल. 'यम आणि नियम' यांना अनुसरून जर तुमची वागणूक असेल तर तुमच्या कर्मात, क्रियेत नक्कीच कौशल्य निर्माण होईल.
🎤प्रश्न : अशी कोणती खास गोष्ट आहे, असे कोणते कौशल्य आहे, जे माणसाला योगी बनवते?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
आपल्यातील आत्मविश्वास आणि हिम्मत डळमळीत होऊ न देता कायम जोशपूर्ण राहणे हेच ते कौशल्य आहे. आपण हातात घेतलेले काम न दमता करणे, आणि काम करून झाल्यावर उत्साह कायम रहाणे हेच ते कौशल्य आहे. आणि हे योगामुळेच शक्य होते. सर्वसाधारण माणूस एखादे काम केल्यावर खूपच दमतो, थकतो व आपण केलेल्या कामाचे फळ जेव्हा समोर दिसायला लागते तेव्हा त्याचा आस्वाद घेण्याची शक्तीच अंगात नसते. आपले काम झाल्यावर सुद्धा ही शक्ती कायम ठेवणे, अंगात चैतन्याचा संचार कायम ठेवणे, हे केवळ योग कौशल्यानेच शक्य होऊ शकते.
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न : आपण करत असलेल्या कामाच्या परिणामांपासून (कर्मफलापासून) स्वतःला अलिप्त कसे ठेवावे?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
जेव्हा तुमच्या अंगात उत्साह संचारलेला असतो, जेव्हा तुमच्यात खूप ऊर्जा असते, तेव्हा तुम्ही वर्तमान काळात जगत असता. तुम्ही समोर आलेल्या प्रसंगाला सहजतेने सामोरे जाता, कसलीही अपेक्षा न ठेवता. तुम्ही जी क्रिया करत आहात, त्या क्रियेच्या परिणामांची अपेक्षा न करता, ती एक आनंदाची अभिव्यक्ती समजून करा.
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न: तुम्ही म्हणता की योग म्हणजे व्यायाम नव्हे. परंतु, आजच्या घडीला सर्व जगासमोर योगाचे जे चित्र आहे त्याच्या बरोबर विरुद्ध आहे हे. तर याबद्दल नक्की काय ते कृपया सांगाल का?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
विविध मुद्रा आणि व्यायाम हा योगाचाच एक भाग आहे, यात काहीच शंका नाही. परंतु योग म्हणजे निव्वळ व्यायाम असा गैरसमज करून घेऊ नका किंवा योग म्हणजे निव्वळ शारीरिक कसरत असा मर्यादित अर्थ काढू नका. योग म्हणजे मानवी आयुष्याची जडणघडण आहे, जीवनाचा विकास आहे, एक अभिव्यक्ती आहे, एकमेकांशी वैश्विक ऊर्जेने संपर्क साधण्याचे साधन आहे. एक लहान बाळ सुद्धा योगी असते. योगी माणसाची सर्वलक्षणे एका बाळातून प्रदर्शित होतात. बाळाच्या हालचाली, त्याचे हावभाव, श्वास घेण्याची पद्धत, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याची हुशारी आणि वर्तमान काळात राहण्याची त्याची वृत्ती, ही सर्व योगी माणसाचीच लक्षणे आहेत ना?
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न: तुम्ही म्हणता की प्रत्येक बाळ हे योगी असते. तर मग मोठे झाल्यावर आम्ही असे काय गमावतो की ज्यामुळे योगी होण्यात आम्हाला अडचणी येतात?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
आपण आपली नैसर्गिक वृत्ती आणि आपल्या अंतर्गत असलेली अंतर्ज्ञान क्षमता असते ती गमावतो. प्राणी आणि लहान मुलांमध्ये अंतर्ज्ञानाची क्षमता प्रौढांपेक्षा जास्त असते. कारण आपण प्रौढ माणसे आपल्या मनात प्रत्येक गोष्टीबाबत गोंधळ निर्माण करतो, विविध दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीचा अनावश्यक विचार करतो, प्रत्यक्षात तसे असतेच असे नाही. आपले मन नकारात्मक गोष्टीचाच सारखे विचार करत असते. जर तुमची १० जणांनी प्रशंसा केली व एकानेच अपमान केला, तर त्यातील तुम्ही मनात काय ठेवता? प्रशंसा विसरून फक्त अपमानच मनात ठेवता. अशा नकारात्मक गोष्टी मनात ठेवण्याची वृत्ती बालमनात नसते, आपण मोठे झाल्यावरच ही वृत्ती आपल्यात निर्माण होते. योगामुळे आपण आपल्या मूळ नैसर्गिक वृत्तीकडे वळतो, आपल्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ लागतो व एखादी गोष्ट सहजपणे कशी करता येईल याचा विचार करतो आणि याची आवश्यकता जीवनातील सर्व क्षेत्रात आहे. जेव्हा सगळ्या गोष्टी धूसर दिसायला लागतात तेव्हा योगामुळेच तुम्हाला आवश्यक उत्साह, ऊर्जा आणि अंतर्ज्ञान क्षमता मिळू शकते.
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न : योगामध्ये काही आश्चर्यकारक घटकांबद्दल सुद्धा बोलले जाते. काय आहे ते?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
आश्चर्य ही योगाची प्रस्तावना आहे, किंवा सुरुवात आहे असे समजा. पुरातन काळी ऋषिंनी सांगितले आहे 'विस्मय योग भूमिका' याचा मतितार्थ असा आहे की आश्चर्य म्हणजेच योगाभ्यास आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचे व निसर्गाचे ईक्षण-परीक्षण करतांना आश्चर्यचकित होऊन जाता, तेव्हा एक गूढपणा तुमच्या आयुष्यात येतो. हा जो संयोग आहे किंवा जो योगायोग आहे, तो अलौकिक आहे, खूप सुंदर आहे, ठोस आहे पण तरीही गोंधळात टाकणारा आहे. अशी एखादी घटना जेव्हा तुमच्या आयुष्यात घडते तेव्हा जर तुम्हाला आश्चर्य वाटले नाही तर तुम्ही योगी नाही असे समजा.
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न:योग हे एक मानसिक कौशल्य आहे असे वाटते. तर मग हठयोग म्हणजे काय?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
हठयोग म्हणजे आपल्या सीमा थोड्याश्या ओलांडण्यासारखे आहे. आपण सर्वांनी आपल्या मर्यादा ठरवलेल्या असतात, आपल्या सीमारेषा ठरवलेल्या असतात. सीमारेषा आपल्या क्षमतांवर मर्यादा आणतात. हठयोग म्हणतो "ठीक आहे, थोडी मर्यादा ओलांडा, आपली सीमारेषा हळू-हळू वाढवा." यामुळे आपली शारीरिक क्षमता तर वाढतेच पण त्याच बरोबर आपली मानसिक व भावनिक स्थिरता वाढते. जेव्हा शरीर व मन स्थिर होते तेव्हा भावनांची व्याख्या बदलते आणि आपले आत्मतत्त्व उच्चस्तरावर गेल्याची जाणीव होते.आणि म्हणूनच आपल्या सीमारेषा व आपल्या मर्यादा वाढवण्यासाठी हठयोग नितांत आवश्यक आहे.
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न: ध्यानधारणा पुरेशी आहे का? आपल्याला आसनांची आवश्यकता आहे का? जर आवश्यकता आहे, तर ती का आहे?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
जर एखादा माणूस आजारी असेल किंवा वयस्कर असेल किंवा व्यायाम करण्याची सवय नसेल तर त्याने शारीरिक मुद्रा करण्याची आवश्यकता नाही. असे लोक श्वासोश्वासाचे काही प्रकार व ध्यानधारणा करू शकतात. ध्यानधारणा ही एक वास्तविकता आहे, आत्मतत्त्वासारखी आहे. बाकी सर्वकाही त्यावर घातलेले कपड्यांचे आवरण आहे. आत्मतत्त्वाशिवाय शरीर नाही आणि शरीराशिवाय आत्मतत्त्व नाही. पातंजलींनी योगाची आठ अंगे सांगितली आहेत. आणि ही अंगे एकाच वेळी विकसित होतात, एका मागून एक नव्हे. गर्भाशयात बाळाचे पाय आधी आणि नंतर हात किंवा डोके निर्माण होत नाही. सर्व अवयव एकाच वेळी विकसित होतात. त्याचप्रमाणे योगाची आठही अंगे एकाच वेळी कार्यरत असतात.
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न : योग ह्या विषयावर वादावादी, कट्टर मतभेद वगैरे भरपूर आहेत. यातून लोकांना बाहेर कसे काढावे ?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
वाद-विवाद, मतभेद, चर्चा आपण थांबवू शकत नाही. वैज्ञानिक स्तरावर, सामाजिक स्तरावर तसेच राजकारण व इतर क्षेत्रात सुद्धा कट्टर मतभिन्नता, वाद-विवाद आहेतच. लोकांना यापासून तुम्ही फक्त सावध करू शकता. लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्यावरच हे मतभेद वगैरे दूर होतील. म्हणूनच मी म्हणतो की हिंसा मुक्त समाज, आजार मुक्त शरीर, गोंधळ मुक्त मन, ठराविक कोंदणातून मुक्त अशी बुद्धिमत्ता, विसराळूपणापासून मुक्त स्मृती, आणि दुःख मुक्त आत्मा, अशी आदर्शवत परिस्थिती मानवाच्या जीवनासाठी आणि त्याच्या उत्कर्षासाठी आवश्यक आहे. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये अशा दिशेने शिक्षण दिले पाहिजे की जेणेकरून माणूस आपल्या ठाम मतांपासून आणि पूर्वग्रहांपासून स्वतःची मुक्तता करेल. अथवा जर कोणी उत्तम योगी झाला तर तो आपले जीवन व हे जग, याकडे एका संपूर्ण वेगळ्या नजरेने बघेल आणि त्यामुळे त्याचे स्वतःचे जीवन व हे जग यासंबंधी त्याचा दृष्टिकोन बदलून जाईल.
🎤📡💻🎥 👑🎤📡💻🎥
🎤प्रश्न: समाजातील काही घटकांची अशी समजूत आहे की योगाचरणामुळे ते त्यांच्या धर्मापासून दूर जातील. योग हा धर्माच्या विरुद्ध आहे का?
👑गुरुदेव श्री श्री रवि शंकर:
कुठलेही तंत्रज्ञान धर्माच्या विरुद्ध आहे का? योग हे एक तंत्रज्ञान आहे. एक तंत्र आहे, की ज्यामुळे तुम्ही उत्साही, आनंदी, आणि दयाळू कनवाळू व्हाल. कुठला धर्म सांगतो की तुम्ही दयाळूपणा सोडा म्हणून? कुठला धर्म सांगतो की तुम्ही आनंदी राहू नका? कुठला धर्म सांगतो की तुमचे आचरण मैत्रीपूर्ण व तुमची वागणूक प्रेमपूर्वक नसावी? योग हे एक तंत्रज्ञान आहे जे तुम्हाला मानसिक तणाव, राग-द्वेष, मोह आणि इतर नकारात्मक भावनांपासून मुक्ती देते. योग हा धर्माच्या विरुद्ध किंवा तुमच्या श्रद्धेच्या विरुद्ध आहे असे कोण आणि कसे म्हणू शकतो? असा विचार जरी कोणी केला तर ते त्यांचे अज्ञान आहे. कारण लोकांबद्दल, समाजाबद्दल विचार करण्याची मोकळीक व स्वातंत्र्य तुम्हाला योगामुळे मिळते. विचार स्वातंत्र्य धर्माच्या विरुद्ध आहे का? तुम्हाला धर्मामुळे स्वातंत्र्य मिळत नाही का? विचार स्वातंत्र्य, आत्म स्वातंत्र्य ह्याला जर धर्माकडून प्रोत्साहन मिळत नसेल तर तो माणुसकीवर व त्या धर्माच्या अनुयायांवर अन्याय आहे. शांतता प्रस्थापित करणे, माणसा-माणसात प्रेम निर्माण करणे, विचार स्वातंत्र्य देणे, आपुलकीची भावना वाढवणे, बंधुभाव भगिनीभाव आपापसात निर्माण करणे हाच धर्माचा उद्देश आहे, ध्येय आहे. आणि हा उद्देश व ध्येय साध्य करण्यासाठीच योग हे तंत्रज्ञान आहे.
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
🌎🌼🌎🌼🌎🌼🌎🌼
