गर्दी
माणसे समुहाने राहतात.एकमेकांवर अवलंबून असतात. अनेक ठिकाणी माणसांची गर्दी होते. सार्वजनिक ठिकाणी गर्दी बघायला मिळते. पर्यटन
स्थळे,जत्रेत गर्दी होते. लग्नसमारंभ ,सभा ,सिनेमा घर,मंदिरे इथे गर्दी दिसते. काही लोकांना गर्दी आवडते तर काहींना ती नकोसी वाटते. कमी जागेत जास्त माणसे असली त्यासही गर्दी म्हणतात. बसमध्ये ,नळावर,घरामध्ये देखील गर्दी
होते. कुठे बघ्यांची गर्दी. गर्दीत कुणाला सुरक्षित
वाटते तर कुणाला घाबरे होते.गर्दीच्या ठिकाणी चोर
मवाली घुसतात. त्यांच्यासाठी ती पर्वणी असते.
काही शाळेत मुलांची गर्दी असते. बाजारात तर खुप गर्दी असते.
गर्दीमध्ये धक्का वगैरे सामान्य बाब असते. अनेकजन धक्का मारण्यासाठी गर्दीत घुसतात.
काही ठिकाणी गर्दी जमवली जाते. त्यासाठी उपाय
केले जातात. अनेकवेळा गर्दीत मुल हरवते. शोध सुरु होतो. गर्दीला त्याचे सोयरसुतक नसते. अनेकवेळा गर्दी स्वैर होते. एखाद्या अफवेने सुसाट होते. गर्दीमध्ये विवेक हरवतो.दुर्घटना घडतात.
गर्दीमध्ये चेंगराचेंगरीही होते. अनेकवेळा गर्दी पांगवण्याची वेळ येते. गर्दी असली की गोंगाट होतो.राजकीय सभांना होणारी गर्दी हा कळीचा विषय असतो. खुप ठिकाणी एखाद्या स्वार्थासाठी गर्दी जमते.गर्दीमध्ये खोडकरांचे फावते.मंदिरात
दर्शनासाठी गर्दी असते.
एखाद्या खानावळीत, चहाच्या टपरीवर गर्दी असते.
व्यावसायिक ठिकाणी होणारी गर्दी लोकप्रियता
दाखवते.
ग्रामीण क्षेत्रापेक्षा शहरात खुप गर्दी असते. बागेमध्ये ,रेल्वेमध्ये तूफान गर्दी असते. बंद,निषेध, मागण्या ,आंदोलने यामध्येही गर्दी असते. गर्दीला
थोपवणे फार जिकिरीचे असते. गर्दीवरुन आंदोलनाचे मूल्यमापन होते. कुठे भाऊगर्दी तर कुठे खाऊगर्दी असते.
गर्दीमध्ये माणसांचे विविध रुपे बघायला मिळतात. गर्दी अनोळखींची असते. ओळखीचीही असते. एखादा ओळखीचा चेहरा दिसला की गर्दीतही हायसे वाटते. काही देशात गर्दी आहे. कुठे घरात गर्दी. कमी जागेत क्षमतेपेक्षा जास्त लोक जमले की
गर्दी वाटू लागते.
असो.
.......नारायण खराद
