तुलना
सुखाच्या, समाधानाच्या बाबतीत अनेकांकडून आजपर्यंत मला जे मत ऐकायला मिळाले ते असे," आपल्यापेक्षा खालच्याकडे बघून समाधानी रहायचे,वरच्यांकडे बघायचे नाही."
लोकांच्या या मतांशी मी अजिबात सहमत नाही. त्याचे कारण असे की इतरांचे दुःख हे
आपल्या सुखाचे कारण कसे होऊ शकते?
खालच्या लोकांकडे बघत स्वतःला वरचे समजायचे हि मानसिक योग्य आहे असे मला
वाटत नाही. बरे आपल्या सुखाचा संबंध इतरांशी जोडण्याचे काय कारण? दूसरे असे
समाधान मानणे म्हणजे काय, समाधानी
नसल्याचे मानण्यासारखेच आहे.
मुळात तुलनेचे सुख हा मानसिक विकार आहे." आमच्या बंड्याला पस्तिस टक्के गुण मिळाले म्हणून काय झाले तो शेजारचा बाळू
तर नापास झाला." तितक्यात मेरिटमध्ये आलेला संजु पेढे घेऊन येतो."काका मी पहिला आलो." आता काय करायचे?
ज्यावेळेस आपण कुणाला तरी खालचे समझतो त्याच वेळी आपल्यासारखी माणसे
वर पण असतात हे लक्षात घ्यावे.अशावेळी
आपण ना वरचे रहातो ना खालचे ,सरळ मधले होऊन जातो.
तुलना हि महाभयंकर बीमारी आहे. आपल्या कडे काय आहे याचे सुख समाधान अवश्य
असावे परंतु त्याच वेळी इतरांकडे ते नाही हे
सांगणे चुकीचे आहे. माझ्या विहिरीत पाणी आहे पण त्याच्या विहिरीत नाही. हा तो जो आहे. सतत तुलनेसाठी बाळगावा लागतो.भावकीतले लोक म्हणतात,"आता त्यांच्याकडे काही राहिले नाही."
आपण पास झालो याचा आनंद तेव्हाच होतो
जेव्हा जवळचे कुणीतरी नापास झालेले असते. मी पास झालो हे तो नंतर सांगतो ,अमूक नापास झाला हे अगोदर सांगतो.
जिथे तिथे तुलना बघायला मिळते.लोक आपणास कमी लेखण्यासाठी कायम आपल्यापेक्षा वरचढ लोकांचा उल्लेख करतात. माझ्याकडे येणारे कित्येक लोक मला मोठे,चांगले घर बांधा असा सल्ला देतात. माझे घर मोठे आणि चांगले नाही असा तिरकसपणा त्यामध्ये असतो.मी म्हणतो,"मला तर याची जाणीव होत नाही."
मग ते म्हणतात,"इतरांची घरे बघा ,मग कळेल." मी म्हणालो,"इतरांची घरे मी तर नेहमी बघतो,खुप शानदार आहेत.बघून आनंदही होतो ." परत ते म्हणतात "बघून दुःख होत नाही का ,की आपले घर असे नाही." मी म्हणालो," चांगले घर बघून दुःख कसे होणार? ते आपले नाही हे बघून दुःख होते." आणि मी दूसरा विचार करत नाही.
मी तुलना करत नाही. माझ्या घरात मी आनंदाने रहातो.मला इतरांचे काय ?
मी खालच्याकडे बघून रोगीट सुख मिळवित नाही आणि वरच्याकडे बघून मन जाळवित
नाही, मी माझ्याकडेच बघतो.
ना.रा.खराद
मत्स्योदरी विद्यालय,अंबड
