स्त्री
स्त्रीला ईश्वराने नाही तर स्त्रीने जन्माला घातले आहे. स्त्री आणि पुरूष दोन जाती.
एकमेंकांची गरज असलेले दोन जीव.
स्त्रीचा देह जसा पुरुषाला भूरळ घालतो तसे
तिचे मन देखील मोहात पाडते. तीने नुसते स्मित केले तरी भूरळ पडते. स्त्रिच्या डोळ्यात
असे काय असते की पुरुष वेडावून जाते. इवल्याशा डोळ्यात हरपून जातो.सारे काव्य स्त्री सौंदर्य या विषयावरच थांबते. स्वप्नातही स्त्रीच दिसते. सर्वच नात्यात ती आवडीची असते.मुलगी,बहिण, पत्नी .पात्र कोणतेही असो,मुख्य नायिका असते. दाढी आणि मिशा
नसलेली,निसर्गाची हि अप्रतिम कलाकृती आहे. स्त्री जन्म देते,संगोपन करते.आपल्या
ऊरातले दूध पाजून बाळाला वाढवते.पुरूषाला खिळवून ठेवते. त्याच्या जगण्याला अर्थ देते. सात फेरे घेतांना मागे असते.पाठराखण करते.नशीबाने मिळाला तशा नवऱ्या सोबत आयुष्य काढते.घरातील हजार प्रकारची कामे विनातक्रार करते.जसे ती फक्त नवरा,मुलगा,सासरा यांच्यासाठीच जगते.आपले आई वडील सोडून परक्या ठिकाणी रमते.जुळवून घेते.मनातली खंत मनात ठेवते.तीचे मन माहेरच्या आठवणीत
रमते.
स्त्री अनेक बंधनात वावरते.मर्यादा पाळते.
संस्कार स्त्री कडून होतात. स्रीचं सौंदर्य जसं
मोहक तसे तिचा स्वरही कोमल असतो.
इतिहासात काही कजाक स्त्रिया आढळतात.
पण त्या अपवाद.
स्त्री बुद्धी पेक्षा भावनेने प्रबल असते. स्त्रीचं प्रेम लाभलेला पुरुष देखील भावनिक असतो.
स्रीचं प्रेम लाभणे हि कुठल्याही पुरुषाकरिता एक प्रेरणा ठरते. स्रीमुळे जसा जन्म आहे.जगण्याचे आकर्षण देखील स्त्री आहे. स्री शिवाय घराला घरपण राहत नाही. जिथे स्त्रियांचा वावर तिथे प्रसन्न वाटते.
अनेक स्रिया वीर होत्या.स्री मध्ये वीरत्व असते. गरजेच्या वेळी ते प्रगट होते. त्याग हा
तिचा धर्म आहे. स्रिला स्पर्शाचा अर्थ कळतो.
वडील,भाऊ,मुलगा,नवरा यांच्याशी तितक्याच कुशलतेने ती वागते.
सगळ्याच्या आवडी निवडी जपत ती खाऊ घालते.आपल्या लहान बाळाला घास भरवते.
आई,बहिण, पत्नी,मुलगी वेगवेगळ्या नात्यात
ती विसावते. ज्यांना हे स्त्री सुख लाभले ते भाग्यशाली आहेत.
नारायण खराद
