[23/07, 08:00] N.R. kharad: प्रिय एस.टी. बस,
गोड आठवण.
कित्येक दिवसांपासून तू रस्त्यावर
दिसत नाहीस ,त्यामुळेच हे पत्र.
'लालपरी ' म्हणून तुझी खरी ओळख
आमच्या लहानपणी हिरव्या वनराईतून
काळ्याभोर सडकेवरुन ,वळणे घेत तू
जेव्हा दूरुन दिसायची तेव्हा आमची
मने आनंदाने डोलायची
तुझ्या अंगाखांद्यावर आम्ही वाढलो आहोत
अगदी आईच्या मांडीवर होतो तेव्हापासून
कुतूहल वाटायचे ,किती मोठी माणसे घेऊन
तू पळायची ,आमच्या चिमुकल्या नयनांना
तुझे ते लालपरीचे रुप खुप आवडायचे
तुझा तो आसमंतात घुमणारा नाद
आमच्यासाठी दैवी संगीत होते
तुझ्या येण्याची चाहूल लागली की
आम्ही कसे तयार रहायचो
तुझा तो मजबूत दरवाजा
रोज शेकडों लोकांचे धक्के सहन करत
कसा अभेद रहातो
तुझ्या पायरीवर पाय ठेवला की
मंदिरात प्रवेश केल्यासारखे वाटते
क्षमतेपेक्षा कितीतरी गरजवंताना
सामावून घेण्याची तुझी उदारता
आम्हा मानवांना प्रेरणादायी आहे
अनेक खोडकर मुल,तुला इजा पोहचवितात
तरीही तू त्यांना हाकलून देत नाहीस
आई प्रमाणे त्यांचे तू लाडच करते
ज्या सीटवर बसतात ,तिचे रबर काढतात
हे बघून मला वाईट वाटते पण तू
तो मानवी स्वभाव समजून
तू दुर्लक्ष करते
वाहक आणि चालक, तुझे खरे सोबती
तुझी साथ सोडत नाहीत
तुझी काळजी घेतात
तुझ्या भरवशावर दूर दूर जातात
तू कुठेही गेली तरी ,तुझे अनेक नातेवाईक
तुला भेटतात ,संकटात कामे येतात
तु बलशाली असल्याने ,कशाही रस्त्यावर
तू धावते,लहान संकटाना तू जुमानत नाही
तुझी वाट बघणारे, तु दिसली की
कशी तुझ्याकडे धाव घेतात
लाडक्या लेकरा प्रमाणे
तूही त्यांना अंगाखांद्यावर घेते
अनेकजन तुला नियमित भेटतात
तुझा विरह आता सहन होत नाही
तू लवकर ये..तू लवकर ये..
तुझा
सहप्रवासी
ना.रा.खराद, अंबड
[24/07, 09:22] N.R. kharad: कौतुक
लहान मुलांची भाषण स्पर्धा होती.अनेक मुले बोलली.प्रथम,द्वितीय असे स्पर्धक निवडले गेले.तिसऱ्या क्रमांक पटकावलेली मुलगी शहरातील नामांकित माणसाची होती.सर्व उपस्थित लोकांनी तिचे अभिनंदन केले.सेल्फी काढली.तिच्या पालकांना फोन केला. परंतु प्रथम आलेला विद्यार्थी हातात ,प्रमाणपत्र घेऊन बाजुला उभा होता.मळलेला,फाटलेला गणवेश ,खिन्न चेहरा.माझे लक्ष गेले .मी विचारपूस केली."तुझे भाषण मला खुप आवडले,हे घे दोनशे रु.तुला माझ्याकडून बक्षीस." त्याने
नकार दिला."माझी आई म्हणते ,फुकटचे पैसे चांगले नसतात." मी म्हणालो,"फुकटचे नाहीत, तुझ्या भाषणाचे आहेत." तो उत्तरला
"भाषणाचे पैसे घ्यायला ,मी काय नेता आहे?"
नेत्यांबद्दलचे त्याचे मत ऐकून ,लोकशाही किती रुजली आहे हे लक्षात आले."
उत्सुकता म्हणून मी अजुन काही प्रश्न केले.
विचारले,"कुठे राहतो,वडील काय करतात?"
या प्रश्नावर त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या
झाल्या होत्या."सर,मी झोपडपट्टीत राहतो,माझे वडील माझ्या जन्माअगोदरच...
मी समजलो.त्यास धीर देत विचारले,"भाषणाची तयारी कशी केली,कुणी
शिकवले,कुणी लिहून दिले.?" "नाही, कुणी नाही." मग इतके छान कसा बोललास?"
"आई,हा विषय होता,सत्य ते बोललो." मी जिंकण्यासाठी नाही, तर आईसाठी बोललो"
त्याचे ते बोल कौतुके ऐकून मी तर स्तब्ध झालो.
असे कितीतरी रत्न उपेक्षित राहतात आणि दगडगोटे भाव मारुन जातात. एखाद्याच्या
गुणाची अवहेलना, उपेक्षा करणे म्हणजे त्यास अस्विकार करणेच आहे. गुणवंत खितपत पडलेले असतात. हिरे उपेक्षित
राहतात मात्र गारगोटी हीरा म्हणून मिरवली
जाते. बालकांना शाळेतून समानतेची वागणूक देणे गरजेचे आहे. उपेक्षित, वंचित, गरीब विद्यार्थी आपल्या केन्द्रस्थानी असावयास हवा.तेव्हा शिक्षणाचे उदिष्ट साध्य
होईल.
ना.रा.खराद
म.वि.अंबड
