कुलूप
ज्या निर्जीव वस्तूवर विश्वास ठेवून
आपण निश्चिंत राहतो,ती वस्तू म्हणजे कुलूप.
दरवाजा तोडता येतो मग कुलूप तोडता येणार नाही का? परंतु माणसाचा एक समज
असतो.लोक झोपड्यांना देखील कुलूप लावतात. एवढेच काय ,खेड्यात काट्याकुट्याच्या खळ्यांना देखील कुलूप असते. माझ्या मते कुलूप लावणे हि भाबडी
मानसिकता किंवा अनुकरण आहे. उलट ज्या
ठिकाणी कुलुप असते, ते तोडण्याची मानसिकता असते. कुलुप तोडण्याइतके सोपे
तरी काय असते. तोडणारे तर बैंका तोडतात.
कुलुप सर्वत्र आढळते.लहान मोठी कुलुपे असतात. कुलुप हि खुप तुच्छ वस्तू आहे परंतु
लावणारे त्याच्या भरोशावर रहातात. ज्यास घुसायचे नसते तो कुलुप नसेल तरी घुसणार नाही आणि ज्यास घुसायचे त्यास कुलुप म्हणजे काय लायकीचे!
जिथे पेटी उचलून नेता येते ,तिथे कुलुप काय
करणार. दुकाने वगैरे कुलुपामुळे सुरक्षित नाहीत तर चोर कमी आहेत किंवा धाडसी नाहीत.
कुलुप लावणे विसरले की आभाळ कोसळल्यासारखे.काय असते ते कुलूप?
एका सेकंदात जे उघडते ,त्याची काय लायकी?
कुलुप चावीने उघडते आणि चावी दूर्मिळ नाही. कुणी कशालाही कुलुप लावते .कुलुप
हे मालकीपणा दाखविण्यासाठी किंवा माणसावरचा अविश्वास आहे.
घरातल्या घरात देखील कुलुप लावले जाते.कुणी लाकडी कपाटात एक लाख रुपये
ठेवतो आणि दहा रुपयाचे कुलुप लावतो.
कपाटे वगैरे ह्यास कुलुप असतात. लाखों
रुपयांची उलाढाल असलेले कागदपत्रे त्या कपाटात असतात. कुलुप तोडून ते पळवणे
कठीण नसते. पण तसे कुणाला करायचे नसते. परंतु तुटक्या दरवाजाला लावलेले ते
गंजलेले कुलुप जसे बंदुकधारी रक्षक असते.
कुलुप लावण्याची हि मानसिकता न जानो
कोठून आली आणि कुठपर्यंत राहणार ?
ना.रा.
