मरणाचे हे भय कोणाला,
जीवनाची आशा आहे.
मृत्यूत सांगता व्हावी,
जगण्याची अभिलाषा आहे.
जीवन मृत्यूचे संकेत मांडताना,
शब्दाचीच साथ आहे.
या पाठशिवनीच्या खेळामागे,
नियतीचाच हात आहे.
नशीब आज बनले ईश्वर,
काळ ही झाला कातर.
काळाच्या मागे - मागे,
पळावे किती उरफुटोस्तर.
